लवकरच येणार एयरटेलचा स्वस्त स्मार्टफोन..

लवकरच येणार एयरटेलचा स्वस्त स्मार्टफोन..

By atharv on from feedproxy.google.com

जिओचा सामना करण्यासाठी एयरटेल येत्या काही दिवसांमध्ये अल्प मूल्य असणारा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत मिळाले आहेत.गेल्या काही दिवसांपासून एयरटेल कंपनी अत्यंत स्वस्त मूल्यात स्मार्टफोन सादर करण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत खुद्द एयरटेल कंपनीतर्फे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, जिओने आपल्या स्वस्त स्मार्टफोनची डिलीव्हरी सुरू केल्यानंतर काही दिवसातच एयरटेल कंपनी याच प्रकारातील अत्यल्प मूल्याचा स्मार्टफोन सादर करण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे. या संदर्भात विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एयरटेलचा हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून याची रॅम एक जीबी इतकी असेल. यातील बॅटरी १५०० मिलीअँपिअर क्षमतेची असण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश फिचर्स हे जिओफोनप्रमाणेत असतील असे मानले जात आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे याचे मूल्य दोन हजार रूपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!