रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

उन्हाळा संपला की दरवर्षी पाऊस न चुकता येतो. त्याचं येणंजाणंजरा लहरी असतं. कधी कमी तर कधी जास्त असं त्याचं प्रमाण असतं. पावसाशी निगडीत अनेकांच्या अनेक आठवणी असतात, जो तो आपल्या परीने त्यांना उजाळा देत जगतो. कुणी कविता करतो, कुणी कथा लिहितो तर कुणी पावसात मनसोक्त भिजतो. तर कुणी एक आपल्या डोळ्यातल्या पावसास वाट करून देतो. पाऊस कधी मातीला भिजवतो तर कधी काळजात वेदनांच्या आठवांना कर्दमून टाकतो. मनातले मेघ कुंद दाटून आले की उदास करवून जातो तेंव्हाचापाऊस उगाच कुरतडून जातो. प्रत्येकाच्या पावसाच्याअनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातलीधग म्लान चेहऱ्यावरनिखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूसकरताना तिच्या डोळ्यातल्यावेदनांच्याखाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....          दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरात एक फेरी मारून झाली की शांतव्वाचीसकाळ पुरी होई. शांतव्वाचं मूळ गाव तिला अखेरच्या काळात आठवत नव्हतं. पण ती कर्नाटकच्या बिदर जिल्हयातली होती इतकं तिला माहिती होतं. डोक्यात जट आली म्हणून तिच्या बालपणीच तिला देवाला वाहिलेलं होतं. पण यल्लमाचाजग तिच्याकडे नव्हता. परडी, कोटंबा वागवत होती ती. घामटलेल्याकपाळावर हळदीचा मळवट भरून फिरायची. गळ्यात कवड्याचीमाळ अन चरबटून गेलेल्या केसांच्यातेलकट, मळकट जटा. वेडेवाकडे दात, फेंदारलेलं नाक, मोठाल्या नाकपुडया, ओठावर किंचित केसांची लव, वर आलेली गालफाडे, खोल गेलेले मिचमिचे डोळे, जाड भुवया, सदा हलत असणाऱ्याकानाच्याजाड पाळ्या, नाकातल्याछिद्रात कसल्या तरी काडीचा बारीक तुकडा टोचलेला, कवडयाच्या माळेचे गळयावर पडलेले वळ, रंग फिकट झालेल्याहिरवट बांगड्या, तेलकट डाग पडलेलं खांद्यावरून ओघळणारं सैलसर पोलकं, अंगाभोवती कशी तरी गुंडाळलेलीजुनेर साडी, लोकांनी टाकलेल्या काहीबाहीतेलकट गुळचट पदार्थांनीलडबडलेलीपरडी हातात घेतलेली शांतव्वा अजूनही डोळ्यापुढून हलत नाही. शांतव्वा किती तरी वर्षे बिदरमध्येच होती. तारुण्य संपलं आणि देवाच्याभक्तांचातिच्यातलारस गेला. तिचे खायचे प्यायचे वांदे होऊ लागले, भीकही मागता येईना आणि पोटाला मिळेना अशा अवस्थेत ती राहू लागली. ज्या देवळाजवळती चोवीस तास बसून असायची ते देऊळ रस्ता रुंदीकरणातपाडलं गेलं आणि ती अक्षरशः सडकेवर आली. इकडं तिकडं झोपावं म्हटलं तर त्या त्या भागातले भिकारी तिला झोपू देईनासे झाले, हिच्यामुळेत्यांच्याघासातला एक घास कमी होईल अशी त्यांना भीती होती. सगळीकडून तिला हाकललं जाऊ लागलं. डोक्यावरफाटक्या लुगडयात बांधलेलेगाठोडे अन काखेत झोळी घेऊन फिरत फिरत सहाव्या सातव्या दिवशी ती रेल्वे स्टेशनजवळआली. तिथल्या काही किन्नरांनी तिला सोबत घेतलं आणि त्यांच्याबरोबर पुण्यात आणलं. बुधवारातत्यांच्यागल्लीत आणून सोडलं.पुण्यात आल्यावर शांतव्वाच्या पोटाचा प्रश्न मिटला. पण तिची अवहेलना सरली नाही. तिला कुणी काळजाशी धरलं नाही की कुणी तिच्या गालावरूनमायेचा हात कधी फिरवला नाही. तिचे डोळे कुणी पुसले नाहीत की तिच्या पायाला पडलेल्या भेगा कुणाला दिसल्या नाहीत. बघता बघता तिला पुण्यात येऊन दोन दशकं लोटली. तिला आता आसरा होता, गल्लीच्याकोपरयावरअसणाऱ्यामरीआईच्याछोट्याशादेवळाजवळचारात्रीचाठिय्याहीपक्का झाला होता. भारतीच्या खोलीत एका ट्रंकेत तिच्या सामानालाजागा मिळाली होती. तिचे दिवस पाय खरडत खरडत जात होते अन अंधाररात्री वेदनांच्यागाळात सरपटत जायच्या. एका रात्री ती मरीआईच्याछोट्याशादेवळापाशीती बसून असताना तिथली कुत्री भुंकू लागली, त्यांना काही तरी सुगावा लागला असावा. त्यांचं भुंकणं ऐकून त्याच रस्त्याने पळत जाणाऱ्या दोन पाच टारगटांनीरस्त्याच्याकडेला पडलेले दगड उचलून मारले. त्यातले दोन दगड शांतव्वालालागले. एक डोक्यात कानामागे वर्मी बसला तर एक कपाळावर बसला. डोळा जाता जाता राहिला. तिच्या कपाळातून भळाभळा रक्त येऊ लागलं. कानामागंवर्मी लागलेल्या घावाने ती जीवाच्याआकांतानेओरडू लागली. त्या गल्लीत तिची कुणी दखल घ्यावी असं काही विशेष त्यात नव्हतं. जोरात फेकून मारलेला दगड लागल्याने एक कुत्रंही तिथंच केकाटत होतं. त्या अंधाररात्रीएक जखमी कुत्रं आणि एक जखमी बेवारस वयस्क स्त्री निपचित पडून होते. अखेर मध्यरात्र झाल्यावरकचरा उचलणाऱ्या लोकांनी म्युनिसिपालटीच्या लोकांना कळवलं. शांतव्वालाससूनमध्येभरती केलं गेलं. घावाच्या निमित्तानेतिच्या जटा कापल्या गेल्या. एक मोठं ओझं अकस्मात उतरलं.... शांतव्वा शुद्धीवरआली आणि त्या दिवसापासून खेळणं हरवलेल्या लहान मुलासारखी ती भांबावून गेली. आपल्या जटा गेल्या याचा तिला आनंद झाला नाही, उलट आपलं काहीतरी हिरावून घेतलं असंच तिला वाटू लागलं. भारती आणि तिचे सहकारी दोन तीन वेळा दवाखान्यात तिला भेटायला आले तेंव्हा ती धाय मोकलून रडली होती. बरी होऊन परतल्यावर ती मूक राहू लागली. तिचं फिरणं कमी होऊ लागलं. काहींनी तिची सोय लावता येईल का याचे प्रयत्न करून पहिले. अनाथाश्रमात, वृद्धाश्रमातजायला ती नको म्हणायची. ‘इथंच गल्लीतल्याउकिरडयाजवळच्या मरीआईच्यादेवळाजवळमला मरायचंय’ असं म्हणायची. खरं तर तिची देवावर तीळमात्रश्रद्धा नव्हती. ‘मला देवाला अर्पण केलं त्याच दिवशी सगळे देव माझ्यासाठी मेले’ असं ती सांगायची. आपण असे कोल्हयाकुत्र्यागत मेल्यावरतरी जगाला काही कळेल असे तिला वाटायचे. देवाच्या नावानं जगलेल्या लोकांचे हालही देव कुत्र्यासारखेच करतो हे तिला जगाला दाखवून द्यायचे होते, त्यासाठीच हा आटापिटा होता. कुणी तिच्या पुढ्यात काही टाकलं तर तितकंच ती खायची. तिच्या ओळखीतले लोक एकेक करून गल्ल्या, शहर बदलून निघून गेले होते त्यामुळे तिची विचारपूस करणारं खास कुणी नंतर उरलं नव्हतं. कधीकधी भारतीच तिच्यासाठीकाहीतरी खायला पाठवून द्यायची. शेवटच्यावर्षभराततर तिच्या अंगावरच्याकपडयांच्याचिंध्या झाल्या. हातापायाचीलांबसडक बोटे कसनुशी दिसत होती, दंडाचे मांसल कातडं लोंबू लागलं होतं. डोळ्याखालची वर्तुळे दाट काळी झालेली, हाडाचा सापळा उरलेला होता फक्त. त्या भेसूर चेहऱ्यावरही ती तेव्हढ्यात हळद लावायची, ‘आणखी अभद्र दिसायचं होतं का तिला’ या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही. शेवटच्यादिवसांत तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आभाळ भरून आलं की छातीतला भाता बंद होतो की काय असं वाटायचं. पाऊस पडू लागला की लाख गोष्टी आठवायच्या तिला. डोळ्यातून धारा वाहायच्या. फाटक्या पदराने डोळे पुसत शून्यात नजर लावून बसायची ती. ‘हा पाऊसच आपली सुटका करून जाणार आहे’ हे तिला पक्के ठाऊक होते.....एका पावसाळी पहाटे तिचे प्राणपाखरू उडून गेले. एकदाची सुटली बिचारी. तिनं किती भोगलं अन काय काय भोगलं याला न अंत ना पार. आयुष्यात तिनं काय कमावलं याच्या बेरजेसाठीएकही अंक काबील नव्हता अन तिनं काय गमावलं नाही हे सांगायलाहरेक शब्द कमी पडत होता. दुःखात सुख शोधताना खरं सुख काय असतं हेच ती विसरून गेली होती म्हणूनच की काय मेल्यावरहीतिच्या चेहऱ्यावर हास्याचीएक छटा पहिल्यांदाचउमटली होती. तिची मयत झालेलं बुधवारातल्या गल्लीत कळलं, अनेक जीव तळमळले. तिच्या कलेवरालादहन देऊन झालं. त्या नंतर जग तिला विसरून गेलं. जो तो आपल्या दुनियेत गर्क झाला. सामन्यांच्या दुनियेत जिथं कमालीचा रुक्षपणा येत चाललाय तिथं या बाजाराचीकाय कथा ? तरीही काही लोकांनी तिला आपलं मानून तिच्या आयुष्यातलेकाही सुखदुःखाचे क्षण वाटून घेतले होते. आता तिच्या पश्चात तिची आठवण निघणे कठीण होते. पण म्हातारपणाकडे झुकलेल्याभारतीला एका दुपारी तिची तीव्रतेनेआठवण झाली त्याचं कारण म्हणजे भारतीच्या खोलीतली सफाई करताना ट्रंकेच्या ढिगाऱ्यातठेवलेली शांतव्वाची मोडकळीस आलेली ट्रंक !भारतीने पुढे होत ती ट्रंक बाहेर खेचून काढली. त्यावर लागलेली जाळ्या जळमटे पुसून काढली. धूळ झटकली. कडी कोयंडे कधीच तुटून गेलेले होते. आत काही मौल्यवान ऐवज असण्याची कसलीही शक्यता नसल्यानेतिला कधी कुणी हात लावलेला नव्हता. तरीही ट्रंक उघडताना भारतीला थोडीशी धाकधूक वाटत होती. पत्रा गंजून गेलेल्यात्या ट्रंकचं झाकण तिनं मागे लोटून दिले. काही क्षण भयाण शांततेत गेले आणि भारतीच्या डोळ्यांनाधारा लागल्या. त्या ट्रंकेत लहान बाळाच्या हातात घालायचे गिलटाचे वाळे होते, चांदीचे पाणी दिलेलं एक काळपट पैंजण होतं जे बहुधा कधी पायात घातलेलं नव्हतं. बेन्टेक्सचेखोटे दागिने होते. छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्यापदरावरचीनक्षी उडालेल्या दोन साड्याही होत्या. काळपट डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर होते. समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले, वीण उसवलेले दोन ब्लाऊज होते. एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण एकाच जागी ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडीही होती. गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला पिवळट पडलेला यल्लम्माचाफोटो, कुठली तरी जुन्या जमान्यातलीबहुधा कुण्या मायलेकींचीफिक्कट झालेली धुरकट तसबीर होती. हातात बांधायचेकाही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी, स्पंज निघालेलीदोरे तुटलेली बेरंग झालेली राखी होती. ब्लाउजपीसच्या पुरचुंडीतबांधून ठेवलेल्या कचकडयाच्याहिरव्या बांगडया होत्या. मणीमंगळसूत्र आणि न वापरलेलीघडीव जोडवी होती. काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम होती. बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे होते. कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती होती. वरचे अस्तर खरवडून गेलेली, पैसे ठेवण्याचीजुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स. फाटलेल्याजुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी, मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे होते ज्यात तिची विस्कटलेले मन वसले होते. इतकं सारं सामावून घेणारी पत्र्यावरील  फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची ती ट्रंक पाहून भारतीचं मन गलबलून गेलं होतं. खरं तर शांतव्वाचीशिल्लक तेव्हढीच नव्हती अजूनही काही होतं. देशी दारूच्या गुत्त्यातलंदेणं बाकी होतं,  टपरीमधल्या चहा कँटीनची किरकोळ उसनवारी होती. करपून गेलेल्याइच्छा होत्या, चक्काचूरझालेली स्वप्ने होती. मरून गेलेल्यावासना होत्या,  घुसमटुन गेलेलं मन होतं, खंगलेलं कलेवर सडकेवर टाकून बुधवारातलीशांतव्वावार्धक्यानेपहिल्या पावसाच्या दमट हवेत तडफडून मरून गेली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती पण कोणा कोट्याधीशाच्या शिलकेपेक्षाअधिक नीती त्यात होती, सच्चेपणाहोता. त्यात उदासताहीहोती पण काळीज चिरणारा टोकदार नियतीचा सलही होता...अजूनही कधी मंद धारात कोसळणारा तसा पाऊस आला की शांतव्वाडोळ्यापुढेयेते आणि काळजातूनतिच्या वेदनांचा झंकार होत राहतो...- समीर गायकवाड.(छायाचित्र प्रातिनिधिक आहे, जालावरून साभार ) 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!