रॅगिंगला आळा घाला

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

-दादासाहेब येंधे(dyendhe1979@gmail.com)मुंबईतील नायर रूग्णालयात तीन वरिष्ठ महिला डाॅक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून डाॅ. पायल तडवी या पदव्युत्तर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. तारूण्याला पोखरून टाकणारी ही भीषण कीड किती वाढत चालली आहे- याचे ते द्योतक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.नायर रूग्णालयातील डाॅ. पायल तडवींची आत्महत्या ही सर्वसाधारण नाही. किंबहुना ती आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे. ती सुद्धा महिला डाॅक्टरांनी केलेली. डाॅ. तडवींचा छळ सुरू होता.  तीन सहकारी महिलांकडून. त्यांची नावेही प्रसिद्ध झालीत. मुंबईतील आग्रीपाडा पोलीसांकडून त्या तीन महिला डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. डाॅ. पायल तडवी हिस सहकारी तीन महिला तिला सतत त्रास देत होत्या. तिच्या अभ्यास आणि कामात अडथळे आणत होत्या. डाॅ. तडवी ही कनिष्ठ जातीय. मागासगर्वीय. तिच्या जातीवरूनच तिचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. यालाच रॅगिंग असे म्हणतात. जात नाही ती जात. असे म्हटले जाते. जातीभेदाची भीषणता दर्शवण्यासाठी ही उक्ती वापरण्यात येते. यात काही खोटे नाही. जातीभेद हा नष्ट  होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. इतका की डाॅक्टरसारख्या पवित्र पेशालाही जातीयतेने मतिभ्रष्ट केले आहे.महाविद्यालयात येणारे विद्यार्थी हे आपल्या स्वप्नांचे, अपेक्षांचे ओझे घेऊनच प्रवेश करत असतात. इथे त्यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ अर्थात सिनिअर आणि ज्युनिय अशा दोन वर्गांचा सामना करावा लागतो. परंपरागत चालत आलेल्या तथाकथित रॅगिंगचा रथ तो पुढे चालवत असतो. सिनिअर विद्याथ्र्यांनी नवीन विद्याथ्र्यांची ओळख विचारण्यापासून सुरूवात झालेल्या या गोष्टीचा शेवट मात्र किती टोकाचा असू शकतो याचा अनुभव अख्खा महाराष्ट्र घेतोय. रॅगिंगची सुरूवात ही अगदी लहान-सहान गोष्टींपासून  होते. समोरच्याचं म्हणणं ऐकून न घेणं, मनात राग धरणं, मस्करी केली म्हणून जातीवाचक शिवीगाळ. या गोष्टी कधी-कधी एवढं भीषण रूप धारण करतात की, शेवटी विद्यार्थी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात. आपला दरारा दाखविण्यासाठी, ज्युनिअर विद्याथ्र्यांना भीती दाखविण्यासाठी रॅगिंगसारख्या चुकीच्या गोष्टींचा  अवलंब केला जातो. जोे कायद्याने गुन्हा ठरतो.       रॅगिंगच्या विरूद्ध महाराष्ट्र शासनाने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरूद्ध समिती आणि अन्य उपाययोजना असतानाही रॅगिंगच्या घटना विविध व्यवसायिक प्रशिक्षण संस्थांमधून उघडकीस आल्याचे दिसते. जेवढया घटना घडतात त्यातील अतिषय थोडया घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोडया घटनांमध्ये कारवाई होते. आपल्या कुटुंबाची बेअब्रु होऊ नये म्हणून भीतीने व व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये या भावनेने नवीन विद्यार्थी-विद्यार्थींनी त्याविरूद्ध तक्रार करत नाहीत. कारण कुणालाही पंगा घ्यायचा नसतो. तक्रार करूनही पुन्हा इथेच राहायचं आहे. छळात दुप्पट वाढ होईल. ही भिती त्यांना वाटत असते.       राज्यातच नव्हे तर देषभरात रॅगिंगच्या घटनांची संख्या पाहिली तर समाजाला लागलेली हि एक किड असल्याचे समोर येते. कारण याचे मूळ हे शिक्षणासारख्या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात रूजलेले असल्यामुळे याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. यासाठी प्रत्येक घटकांनी चिंतन करण्याची गरज आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता तयार होण्यास कोणकोणत्या प्रवृत्ती, कौटुंबिक, सामाजिक आणि सामूहिक व्यवस्था कारणीभूत असतात याचा नव्याने विचार होण्याची गरज आहे. महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्यांकडून होणारे रॅगिंग बंद व्हावे यासाठी महाविद्यालयांच्या स्तरांवर समित्या नेमणे.  विद्यार्थ्यांना प्रवेश देताना  त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे गरजेचे आहे.       रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे व ते महाविद्यालयांमध्ये खपवून घेतले जाणार नाहीत हे विद्याथ्र्यांना प्रवेश देताना स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. हाॅस्टेलमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये केवळ सीसीटिव्ही लावून रॅगिंगच्या घटना थांबणार नाहीत तर त्यासाठी हाॅस्टेल प्रमुख, सल्लागार, शिक्षक यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क करून त्यांना होणाÚया त्रासाबददल सहानुभूतीने चौकशी करणे आणि त्याची कडक अंमलबजावणी गरजेचे आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापक, शिक्षक,  वरिष्ठ विद्यार्थी नवीन प्रवेश केलेले ज्युनियर विद्यार्थी यांच्यात वारंवार चर्चा, सभा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना घडणार नाहीत असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!