रानभाज्या खा, अन तंदुरुस्त रहा

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

रानभाज्या खा, अन तंदुरुस्त रहा-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)पावसाळ्यात आपल्याला निसर्गाची विविध रूपं पहायला मिळतात. या रुपांपैकीच एक रूप म्हणजे हिरव्या रंगाच्या विविध छटा असणाऱ्या रान भाज्या. क्वचित एखादी दुसरी भाजी लाल, शेंदरी नाहीतर तपकिरी रंगाची असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापराशिवाय आपोआप डोंगरावर, पहाडावर उगवलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांमधील पौष्टिक गुणधर्मात दुपटीने वाढ होते. परिणामी, या रानभाज्या विविध आजार विकारांवर गुणकारी ठरतात.पावसाच्या दिवसात पोकळा, केनी, मायाळू, मोहाची फुलं, राजगिरा, आपट्यांच्या पानांसारखी मऊ पण लुसलुशीत कोरलाची पानं, गवताप्रमाणे दिसणारी फोडशी, चिंचेच्या पानाप्रमाणे दिसणारा कोवळ्या पानांचा खुरासन, तेलपट, शेवळी, रानटी माठ, लाल माठ,  तोरणा, कोरळ, नारायणवेल, हिरवा माठ, टाकळा, अंबाडी, शेवगा, कंटोळी, शेवगा, अळू, आघाडा, बाफळी, मायाळू यासारख्या विविध भाज्या भरपूर प्रमाणात खाण्याचा हा महत्त्वाचा ऋतू आहे. या सर्व भाज्या पावसाळ्यात रानावणात, डोंगरावर उगवलेल्या असतात. या भाज्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या रासायनिक खतविरहित असल्यामुळे उपवासालाही खाता येतात. आणि विशेष म्हणजे मांसाहारी मंडळी या भाज्यांमध्ये ओली किंवा सुकी कोळंबी सुके बोंबील टाकूनही या भाज्या खातात. रानभाज्या मध्ये असणाऱ्या तंतुमय (फायबर) घटकांमुळे पावसात मंदावलेली पचनक्रिया अधिक गतिमान होते.ज्या ऋतूंत ज्या भाज्या, फळे जे जे उपलब्ध होते ते प्रत्येकाने आवर्जून खाल्ले पाहिजे असं आयुर्वेदात म्हटले आहे. पावसाळ्यात शरीरात वातदोष वाढतो. पित्त आतल्या आत साचून राहतं. अशावेळी रानभाज्या आवर्जून खाव्यात. आपल्याला रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही कित्येकजण त्या विकत घेत नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना शक्यतो स्थानिक आदीवासींकडून विकत घ्याव्यात. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांना त्या भाज्यांविषयी अचूक माहिती असते.यांतील काही पावसाळी रानभाज्यांचे गुणधर्म आपण जाणून घेऊया.टाकळा: महाराष्ट्राच्या काही भागात खास करून कोकणात ही भाजी टाकला म्हणून ओळखली जाते टकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. कारण कोवळ्या पानांची भाजी पचायला हलकी असून ती तिन्ही दोष कमी करते. रक्तात रक्त-पीत यांसारखे रक्ताचे आजार तसेच नायटा रोगातही ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. पावसात होणारा खोकला शरीराला सुटणारी खाज, पोटात जंत होणे, दमा लागणं याही त्रासात ही भाजी जरूर खाल्ली जाते.कंटोळी: करटुल, कंटोळ या नावानेही ही भाजी ओळखले जाते. झाडाझुडपात वाढलेल्या कंटोळीची भाजी कांदा, खोबऱ्यासोबत परतवून खाल्ली जाते. संधिवाताच्या तसंच पित्ताचे विकार यावर ही भाजी लाभदायी ठरते.सुरणाचा कोंब: पहिला पाऊस पडल्यावर जमिनीत सुरणाचे कोंब रुजून येतात. जमिनीच्या वरच्या बाजूने हिरव्या रंगाचे नाव पाण्यात चोरण्याच्या पानांच्या तंतुमय भाजीत लोह आणि क्षार मोठ्या प्रमाणात असतात लाल तिखट कढीपत्ता टाकून केलेली सोडण्याच्या कोंबाची भाजी अप्रतिम लागते.शेवगा: या वनस्पतीच्या पानाफुलांनी शेंगांच्या भाजीसाठी उपयोग केला जातो शेवग्याला लाल पांढरा आणि नसेल काळपट अशा रंगाची फुले येतात त्यापैकी लाल फुले येणाऱ्या शेवगा आरोग्य दृष्टी गुणकारी समजला जातो फुलांची भाजी खाल्ल्याने येणारा उग्र दर्प जडपणा कमी होतो मात्र जास्त घाम येणे चक्कर येणे नाकातून रक्त अशी लक्षणे दिसतात तेव्हा या फुलांची भाजी खाऊ नये.अंबाडी: अंबाडीची कोवळी पाने आणि फळांची भाजी करण्याचा प्रघात आहे आळूची भाजी करताना अंबाडीचे फळ तसेच पाण्याचा वापर केला जातो फळांपासून सासव किंवा कुठल्याही भाषेत आंबटपणा आणण्यासाठी उपयोग केला जातो.बाफळी: हे एक प्रकारचे बी असते आणि कुळीथ यासारखे चपटे असते ही भाजी चोरून उघडून त्यात हरभऱ्याची डाळ घालून बनवले जाते या भाजीच्या फळांच्या तेलही काढतात पोटदुखी जंत होणे यासारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन करतात.आघाडा: या भाजीमध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते ही भाजी पाचक असून मुतखडा मुळव्याध व पोट दुखीवर गुणकारी आहे आघाडा रक्त वर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!