राजकारणात उतरताय? निवडणुका जिंकून सत्ता मिळण्यासाठी हे ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत असायला हवेत

राजकारणात उतरताय? निवडणुका जिंकून सत्ता मिळण्यासाठी हे ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत असायला हवेत

By vedicjyotish on from vedicjyotishmail.blogspot.com

Astrology For Political Success राजकारण गल्लीतले असो वा दिल्लीतले, ज्योतिषशास्त्र फार पूर्वीपासून राजकारण व राजकारणी यांच्याशी जोडले गेले आहे. जगभरातल्या मोठमोठ्या राज्यकर्त्यांनी ज्योतिषाचा आधार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. आजही अनेक दिग्गज नेते महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ज्योतिष सल्ला घेतात, पण जाहीरपणे ते बोलून दाखवत नाहीत. असो. आपण आजूबाजूला अनेक नेते बघतो जे राजकारणात खूप यशस्वी होतात. पण कधी कधी प्रचंड 'अनुभव' असलेले नेते 'शक्य ते सगळे प्रयत्न' सुद्धा निवडणुकीत मोठ्या फरकाने पडतात, आणि अजिबात अपेक्षा नसलेले, नवखे उमेदवार अगदी सहजपणे निवडून येतात. वर्षानुवर्षे नेटाने कामं करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकिटं मिळत नाहीत, आणि मागाहून आलेल्यांना किंवा पक्षांतर केलेल्यांना संधी मिळते. काही काही लोकांची अशी अवस्था असते, कि त्यांनी काम केलेलं असतं, पैसा असतो, कार्यकर्ते असतात, तिकिट सुद्धा मिळालेलं असतं, तरी ते पडतात. कितीहि वेळा निवडणूकीला उभे रहा, दरवेळी ते पडतातच.हे असं का होतं आणि नेमक्या कुठल्या ग्रहांमुळे, सामान्य माणसाला राजकारणात करीयर करायला संधी आहे का? त्यासाठी ज्योतिष कशाप्रकारे मदत करू शकतं ते बघूयात...सूर्य, शनी, राहू, मंगळ आणि गुरू हे ग्रह मुख्यत्वेकरून आपण राजकारणाशी संबंधित गोष्टींचा विचार करताना लक्षात घेतो. यापैकी सर्वांत जास्त म्हणजे शनी आणि राहू. जगातील तसेच भारतातील अनेक मातब्बर नेत्यांच्या जन्मतारखा व कुंडल्या जर तुम्ही अभ्यासल्या तर त्यात तुम्हाला स्पष्टपणे शनी आणि राहूचं प्राबल्य दिसून येईल.त्यामुळे तुमच्या पत्रिकेत हे पाच ग्रह कुठकुठल्या स्थानात आहेत, कुठल्या ग्रहांबरोबर आहेत, कुठल्या नक्षत्रात आहेत आणि त्या नक्षत्रांचा स्वामी कुठल्या स्थानात बसलेला आहे, असे अनेक प्रकार अभ्यासावे लागतात. स्थानांविषयी बोलायचं तर ३ रे स्थान (वैयक्तिक पराक्रम), ९ वे स्थान(भाग्य, धर्म), १० वे स्थान(कर्म, करीयर, शासन, प्रसिद्धी), आणि ११ वे स्थान(सर्वप्रकारचे लाभ, केलेल्या प्रयत्नांचं चीज होणे, हे स्थान जर दूषित असेल तर तुम्ही आयुष्यात कितीही कष्ट केले तरी त्यापासून तुम्हाला काहीही फायदा/लाभ होत नाही), हि स्थाने मी आधी बघतो. आणि मग इतर स्थाने जसं कि ६ वे स्थान (शत्रू स्थान, स्पर्धक, विरोधक, हितशत्रू, धोका, वगैरे).ज्योतिषा बरोबरच अंकशास्त्र सुद्धा राजकारणाविषयी बरंच काही सांगतं. अंकशास्त्रानुसार १, ३, ५ व ६ या अंकांवर नावं असलेल्या व्यक्ती राजकारणात खूप यशस्वी होतात, असा अनुभव आहे. आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यापैकी ४१ (४+१=५) ५ अंकाचे आहेत.  ५ हा अंक बुध ग्रहाचा आहे, जो संभाषणाचा, लोकप्रियतेचा कारक आहे. (लोकप्रियतेच्या बाबतीत ५ अंकाची बरोबरी करणं फक्त ६ अंकाला शक्य आहे, ते सुद्धा जोडीला शनी व राहूची मदत असेल तर.) म्हणून तुम्ही बघितलं असेल देशात मोदी लाट आली तर त्यात जवळपास सगळ्या राज्यातले मोठे पक्ष व नेते वाहून गेले पण जयललिता(२३, म्हणजे २+३=५) आणि ममता बॅनर्जी (४१, म्हणजे ४+१=५) यांनी त्यांची सरकारं राखली, त्या दोघी सुद्धा ५ अंकाच्या आहेत.महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राज ठाकरे हे २८ म्हणजे, २+८=१ . अजित पवार २५ म्हणजे,२+५=७. शरद पवार ३४, म्हणजे ३+४=७. हे कुणीही टिकले नाहीत. पण उद्धव ठाकरे ५०, म्हणजे ५+०=५, हे टिकले, आणि आपले उमेदवार निवडून आणू शकले.भविष्यात जर कधी ५ अंकाच्या मालिकेतील इतर कुणी मोठे नेते, स्वतःच्या मनातले विचार घेऊन उघडपणे नरेंद्र मोदीच्या विरोधात उभे ठाकतील, त्यांच्या पक्षातील 'इतर मेंदू'च न ऐकता स्वतः निर्णय घेतील, तर ते लोकप्रियतेच्या बाबतीत मा. नरेंद्र मोदीं पेक्षा सरस ठरण्याची चिन्हे खूप दाट आहेत. पैकी ५० अंकाच्या नेत्यांना जास्त संधी आहे, कारण ५ अंकाच्या मालिकेत ५० हा सर्वात जास्त लोकप्रियता देणारा अंक आहे. (सचिन तेंडूलकर सुद्धा ५० याच अंकावर येतो. त्याची लोकप्रियता सगळ्यांना माहिती आहे.) आता तुमच्या विषयी बोलायचं तर तुम्हाला सुद्धा राजकारणात यायचं असेल तर असंच ज्योतिष आणि अंकशास्त्र दोन्ही बाजूने पाठबळ असायला हवं. तुमच्या विरोधात जे कुणी उभे राहतील त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे राहू व शनिचं बल जास्त असायला हवं, सूर्याचं तेज असायला हवं, मंगळाची ईच्छाशक्ती असायला हवी, बुधाची लोकप्रियता हवी आणि गुरूचं शहाणपण असायला हवं.ज्यांच्या पत्रिकेत आणि नावात हे असतं, ते फारसे कष्ट न करता सुद्धा राजकारणात यशस्वी होऊ शकतात, त्यांना पैशाची मदत पटकन मिळते, कार्यकर्ते लगेच मिळतात, तिकिटं मिळतात, आणि ते अगदी सहजपणे घरची निवडणुक असल्याप्रमाणे भरघोस मतांनी निवडून येतात. कधी कुठल्या घोटाळ्यात नाव येत नाही. कसली बदनामी होत नाही. प्रत्येक प्रकरणातून सहिसलामत सुटतात.तुमच्या पत्रिकेत आणि नावात यापैकी काय आहे?तुम्हाला काही शंका असल्यास वा सल्ला हवा असल्यास, इथे संपर्क करा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!