मोबाईल मम्मीच्या नावाचा........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

आज काय बाबा, आमच्या मम्मीकडे नवीन फोन येणार!!, श्वेताची मुलगी तिला चिडवत म्हणाली तसा तिचा छोटा मुलगा श्वेताच्या जवळ येत लाडाने म्हणाला; मम्मी, मी माझे सगळे गेम टाकू शकतो का त्यात?त्यावर श्वेता हसत म्हणाली, अरे हे काय विचारणं झालं? मीच तुला विचारायला हवं खरंतर, बाळा मी माझ्या कामाच्या दोन तीन गोष्टी टाकू शकते का त्यात? मम्मीच्या नावाने फोन येतो फक्त, पण मूळ मालकाला सऱ्हाईतपणे बाजूला ढकलून त्यावर डल्ला मारायला कोणी दुसरंच टपलेलं असतं!!हा समोर डबडा पडलाय ना त्याला माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच पिळवटून काढलाय. अवघ्या आठ महिन्यात शेवटच्या घटका मोजायला लावल्यात तुम्ही त्याला!!श्वेता सुरू होताच तिची मुलगी म्हणाली; मम्मी, मी तर फक्त ऑनलाईन क्लासेससाठीच वापरते बरं का!! माझ्याकडे अजिबात बोट दाखवू नकोस.हो हो, ऑनलाईन क्लासेससाठी, मग कसले कसले रेफरन्स शोधण्यासाठी, मग मैत्रिणींच्या ग्रुपवर हाय बाय करण्यासाठी, मग एकदा नाक मुरडून, एकदा डोळा मारून, एकदा चम्बु पोझ देऊन, आणि त्यानंतर सगळ्या बाजूने मान आणि तोंड होता होईल तेवढं वाकडं करून, दिवसातून किमान दहा वेळा सेल्फी काढण्यासाठी, वापरणारं भूत कुठून आलेलं असतं?हो मम्मी, ताईमुळे मला नीट गेम पण खेळायला नाही मिळत. तिच सारखी घेऊन बसते, छोटा  टिंग्या ओव्हरस्मार्टगिरी करत बोलला तशी श्वेता डोळे मोठे करून म्हणाली,हो ना आणि तिने सोडला की तू घेऊन बसतो, मम्मीला मोबाईल मिळतो कधी? मोबाईल नावाला माझा, बाकी त्यावर सदानकदा सत्ता तुमचीच!!माझाच मोबाईल असून एखाद्याला फोन करण्याकरता तुम्हाला आर्जव करावे लागतात. ते सुद्धा दहा वेळा, त्यातल्या पाच वेळा तर मम्मी नावाचा कुणी बापडा जीव आपल्या बाजूला येवून  काही भुणभुणतोय, हेच तुमच्या कानापर्यंत पोचत नाही. एवढे रमरमाण झालेले असता तुम्ही त्या विश्वात!!मला चंण्डिकेचा अवतार धारण करायला लावता आणि नंतर म्हणता, एवढं पॅनिक काय व्हायचं ते मोबाईलसाठी?आख्ख्या दिवसांत दहा मिनिटं एखाद्याला फोन करायला मागणारी मम्मी पॅनिक वाटते तुम्हाला. मग तुम्ही दोघं हमरीतुमरीवर येऊन त्यासाठी भांडत असता, खेचाखेची करून जमिनीवर आपटून त्याची आतली बाहेरची सगळी हाडं खिळखिळी करून टाकता, तेव्हा तुम्ही काय गोगलगायीचे अवतार असता? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  ओ मम्मी, एवढा नको हा सीन क्रिएट करुस. आता तुला किती सांगतो आम्ही, टॅब घेऊन दे एखादा, म्हणजे तुझी तू बरी आणि आमचं आम्ही. दोघात एकमेकांचा पाय नको ना अडकायला. एक मोबाईल तिघांनी वापरायचा म्हणजे असे मानहानीचे प्रसंग वेळोवेळी उदभवणारच!! आम्ही ऍडजस्ट करतोय त्याचं तुला काहीच नाही!!, तिची मुलगी हे बोलताच श्वेता तिचा कान पकडून म्हणाली, कन्यके, तुम्ही विद्यार्थी आहात. त्या दशेत मोबाईल वर्ज्य असला पाहिजे खरंतर तुम्हाला. आणि मी माझ्या या दशेत मनसोक्त आनंद घेतला पाहिजे त्याचा. पण माझ्या हातात जरा दहा मिनिटाच्या वर असला तर तुमच्या मनात मत्सर जागृत होतो लगेच. बघवत नाही तुम्हाला मम्मी मोबाईलसहित सुखरूप नांदताना. भले तो कुठे निवांत पडून राहिला तरी चालेल, पण मम्मीच्या हातात नको. इकडून तिकडून मोजून चार नातेवाईक, दोन मैत्रिणी काय त्या कधीमधी फोन करतात, त्यांनाही तुम्ही तुमच्या व्यासंगात विघ्न आणतात, म्हणून माझ्यापासून नकळत दूर ठेवता. मला किती ऐकावं लागतं, बघावं तेव्हा मोबाईल मुलांकडे कसा? बोलणं राहतं बाजूला, लेक्चरच चालू होतं. तेही बरोब्बर मुलांच्या हातात मोबाईल असलेली वेळ कशी शोधून काढतात फोन करायला कुणास ठाऊक?आणि म्हणे माझा मोबाईल? छोटा टिंग्याला तिची कणव आल्यासारखी झाली, म्हणून तो श्वेता जवळ आला, आणि मिठी मारत तिला सॉरी म्हणाला.त्यावर श्वेता आनंदाने म्हणाली, वा!! म्हणजे तू सोडणार का मोबाईल?तसा तो म्हणाला, सोडेन!!पण खाता पिताना द्यावा लागेल तुला? नाहीतर मी नाही खाणार हा!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हो, अन्नग्रहण करता ते केवढे थोर उपकार नाही का मम्मीवर तुमचे!! मम्मीच्याच शरीराला तर लागतं ते?, श्वेता उफाळून बोलली तशी, टिंग्या रुसून म्हणाला, मम्मी तू अशी बोलणार असशील तर मी काहीच नाही खाणार!! मोबाईल दिल्यावर पण नाही ना?, तिने बोलताच टिंग्या उडी मारून म्हणाला, मग खाईन हवं तेवढं.........बघा आणि म्हणे मम्मीचा मोबाईल!! तो आता नवीन येणार आहे आज, त्याचं तरी काय होणार ते माहीत आहे ना मला. माझी लाडकी लेक तो बॉक्स फोडणार, मग सगळं सेट करून देईपर्यंत हा टिंग्या जीव खालीवर करत बसणार. सेट झाला, सगळं ट्रान्सफर झालं की तो जवळजवळ सर्व गेम नीट चालतात का हे तपासून बघणार. मग माझी लाडकी मुखकमलावर विविध भाव आणून कॅमेरा क्वालिटी तपासून त्यावर रेटिंग देणार, मग तुमचा पप्पा आला की किमान तासभर फोनचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चेकिंग करणार. आणि हे सगळं होईपर्यंत रात्र होणार. मग तुमचं सगळं उरकून तुम्ही झोपलात की त्याला हात लावायला माझ्यात जीवच नाही उरणार..........कुठल्या तोंडाने बोलता रे मम्मीला नवीन मोबाईल मिळणार........!!????©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!