मी माझी खंबीर .........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

हा लावलास तो शेवटचा, परत हात लावशील तर याद राख, आशुतोषकडे जळजळीत कटाक्ष टाकत उदिता म्हणाली.तसा आशुतोष थोडासा वरमला, पण तरी धिटाईने म्हणाला, ठिक आहे ना, एवढं काय कळतंय कुणाला? ही मुंबई आहे इथे हजारो प्रकरणं चालू असतात अशी. असतील!! मला नाही त्या हजारोतलं एक व्हायचंचय. मी इथे माझ्या बहिणीच्या मदतीला आलीये, तिला बरं नाही म्हणून पाच-सहा दिवस तिला आराम दयायला आलीये. मी तिच्यासाठी आलीये, तुझ्याबरोबर कुठलं प्रकरण करायला नाही, उदिता एकदम कणखरतेने म्हणाली.चान्स मिळाला तर काय हरकत आहे? तशीही तू घटस्फोटीत तर आहेस. ना मूल ना बाळ. कुठल्याही स्त्रीला आधार तर हवाच असतो ना पुरुषाचा??, आशुतोष अगदी निर्लज्जपणे म्हणाला.पण तू हे कशावरून गृहीत धरलस आशुतोष, की मला तुझा आधार हवाय? मी वागले कधी अशी? माझ्या नजरेत दिसलं तुला कधी असं? का मी आले तुझ्याकडे स्वतःहून? तुझं तूच ठरवलंस का, हिला आधार हवाय म्हणून? आधार मला हवाय की तुला? तू जे करत होतास त्याला आधार देणं म्हणतात का? आणि का असं वाटतं तुम्हाला स्त्रीला पुरुषाचा आधार हवाच असतो म्हणून? किती पुरुष असे खरोखर आधार देतात?, बोलतानाच अंगाची लाही लाही होत होती उदिताच्या. आता बोलतीयेस खरी; कधी तरी करशीलच कुठल्या तरी पुरुषाला जवळ, आशुतोष दात ओठ खात म्हणाला. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); करेन तेव्हा करेन, पण चांगले डोळे उघडे ठेवून करेन. तुझ्यासारख्याला तर नक्कीच नाही करणार.पुरुषाला जवळ केलं पाहिजेच, असंही काही नाही.माझी मी मानसिक खंबीर आहे चांगलीच. तुझ्यासारख्या लंपटांना चांगलीच पुरून उरेन मी.बरेच बघितलेत तुझ्यासारखे जखमेवर फुंकर मारल्याचं नाटक करून स्वतःचा स्वार्थ साधायला मिळतोय का पाहणारे!!पुरुष माझ्या जीवनात हवाच आहे असं पुरुषांनाच वाटतं, त्यांची स्वतःची सोय म्हणून वाटत असावं तुझ्यासारखंच, उदिता कुत्सितपणे म्हणाली.ठिक आहे राहिलं, पण आता आपलं जमलं नाही ते तुझ्या बहीणीच्या कानावर मात्र घालू नकोस. उगाच त्रास होईल तिला. नाहीतर काही तरी करून बिरून घ्यायची जीवाचं ती, आशुतोष स्वतःला सावरून घेत म्हणाला, तशी उदिता ओरडूनच म्हणाली, त्रास होईल तिला? ओह, म्हणजे हे कळतंय तर तुला? तरीही........??चालतं ग, तुला चालत नाहीये फक्त. चाललं असतं तर चैन असती तुझी!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); उदिता त्याच्या बोलण्याला धुडकावून लावत म्हणाली,हट, असली फालतू चैन हवीये कुणाला. ती माझ्या जीवावर करायला मी समर्थ आहे. कोण कशाला हवंय मला चैन करायला?आपली काही डाळ शिजत नाही बघून आशुतोष तिच्या खोलीतून साळसूदपणे बाहेर पडला.उदीताला वाटलं, हा माझ्या बहिणीचा नवरा नसता ना तर चपलेनं हाणायला मागपुढं बघितलं नसत मी त्याला.तिच्याकडे बघून गप्प बसावं लागतंय, त्यात आत्ता आहे आजारी, उगीच कशाला तमाशा करा. पण नंतर तिला सांगावच लागेल. नाहीतर म्हणेल, मला सांगितलं का नाही? तिचं ती ठरवेल मग, काय करायचं असल्या नवऱ्याचं ते. कुठलीही वेळ आली तरी मी तिच्या पाठीशी असेन हे नक्की.पुढे आठवडाभराने उदिताची बहीण चांगली बरी झाल्यावर तिथून निघायच्या दिवशी उदिताने तिला आशुतोषबद्दल जेव्हा सांगितलं, तेव्हा तिच्या बहिणीला तर ते खरंच वाटलं नाही. आपल्यावर एवढा प्रेम करणारा नवरा असं वागू शकतो, यावर तिचा विश्वासच बसला नाही.तिने उदितालाच खूप काही सुनावलं. स्वतःचा संसार तुटलाय म्हणून माझा बघवत नाही तिथपासून ते अगदी तूच भुलवलं असशील इथपर्यंत.एका क्षणी उदिताला वाटलं, ही आपली बहीणच आहे ना? माझ्याबरोबर वाढली, आणि मला ओळखत नाही? या दोन वर्षांपूर्वी भेटलेल्या माणसाला एवढं ओळखते की याच्यापुढे बहीण खोटी वाटायला लागली?का मुद्दाम सर्व माहीत असून आधारासाठी म्हणून पांघरूण घालतीये त्याच्यावर?तरी बघतेय ती मला, पुरुषाच्या आधारविनाही मी खंबीरपणे जगतेय, तरीही??का खरंच एवढा विश्वास आहे त्याच्यावर, की तो आपला गैरफायदा घेतोय, आपल्याला फसवतोय हे ही लक्षात येऊ नये? का आहे हे आंधळं प्रेम? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पण हे जे काही आहे, त्यात सगळीकडून  नुकसान तिचंच आहे, तिला आत्ता ते कळत नाहीये, इतकंच.जाऊ दे, मी सांगण्याचं काम केलं. सोंग कधी न कधी बाहेर येईलच त्याचं, तेव्हा तरी निदान तिने डोळयांवरच्या सगळ्या पट्ट्या बाजूला सारून त्याला वठणीवर आणावं. नाहीतर बाहेर तरी पडावं असल्या फुसक्या नात्यातून. मला नाही आवडणार माझी स्वतःचीच बहिण सतत असा आत्मसन्मान वेशीला टांगून बसली तर.........मग वाईटपणा आला तरी चालेल, पण मी तिला असल्या फुसक्या आधाराविना राह्यला भाग पाडणारच ..........!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!