मनातल्या भावना | एक गूढ कोडे

मनातल्या भावना | एक गूढ कोडे

By davbindoo on from chitrakshare.blogspot.com

मनातल्या भावनांचं खरं तर काही सांगताच येत नाही. कधी कधी एवढ्या #हायपर होतात तर कधी खूप शांत. एखादी गोष्ट आपण स्वतःच्या मनात किती काळ दडवून ठेवावी, आपल्या भावना किती काळ दाबून ठेवाव्यात याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतीलच, मन हे काही शेवटी #यंत्र नाही ना, कारण कधीतरी हा #ज्वालामुखी उफाळून वर येतो, आणि मग त्याचे बरेच #चांगले #वाईट पडसाद उमटतात.एखाद्यावर प्रेम जरी केले तरी ते त्या व्यक्तीला सांगावं की नाही हा बऱ्याचदा यक्ष प्रश्न असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल? ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल? तिच्या मनातला आपल्याबद्दलचा #आदर तर कमी होणार नाही ना ? हा विचार यामागे असतो. बरीच वर्षे या भावना दाबून ठेवल्या जातात, आणि मग एखाद्या #नाजूक क्षणी मन #हळवे होते आणि नकळत आपण त्याच व्यक्तीला काहीतरी बोलून जातो आणि तिला दुखावतो. हेतू मात्र दुखावण्याचा नसला तरी ती व्यक्ती दुखावली जाऊ शकते हे मात्र खरं. ती व्यक्ती जर #समजूतदार असेल तर ती दुखावली गेली असली तरी सर्व विसरून आपल्याला #सांभाळून घेते. तिच्या चांगुलपणामुळे आपल्याला मग अपराधी वाटू लागते.आणि मग सुरु होतो खेळ, आपल्या मनातलं त्या व्यक्तीला सांगावं कि सांगू नये या #द्विधा मन:स्थितीचा.आणि मग आपण ती वेळ #टाळायचा प्रयत्न करू लागतो, पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागतो, #योग्य #वेळ येण्याच्या #प्रतीक्षेच्या #भ्रमात.(एका #अप्रकाशित पुस्तकातून साभार.........)
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!