बिझनेस वास्तूचा अनुभव: रिअल ईस्टेट एजंटस् साठी फायदेशीर उपाय. वर्षभर पडून राहिलेली प्रॉपर्टी पंधरा दिवसात विकली गेली.

बिझनेस वास्तूचा अनुभव: रिअल ईस्टेट एजंटस् साठी फायदेशीर उपाय. वर्षभर पडून राहिलेली प्रॉपर्टी पंधरा दिवसात विकली गेली.

By vedicjyotish on from vedicjyotishmail.blogspot.com

Vastu Remedies for Real Estate Agentsबिझनेस वास्तूच्या गंमती-जम्मती काही थांबायला तयार नाहीत. रोजच वेगवेगळे अनुभव ऐकायला व पहायला मिळत असतात. या आधी मी अनेक वेळा वेगवेगळ्या ठि़काणच्या लिखाणात नमूद केलंय कि माझ्याकडे रिअल ईस्टेट मधले अनेक क्लायंट्स् विचित्र केसेस घेऊन येत असतात आणि त्यात मी जे काही उपाय सुचवतो त्याचे रोमांचक अनुभव ऐकायला मिळतात. तशीच जरा अलीकडे घडलेली एक गोष्ट सांगतो.माझ्या फेसबुकच्या पेजवर अमेरिकेहून एक मेसेज आला. त्या माणसाचा तिथे एक बंगला होता तो काही केल्या विकला जात नव्हता. नावं ठेवायला जागा नव्हती जागेत, पण तरीही विकला जात नव्हता. तिकडे "ओपन हाऊस' नावाचा प्रकार असतो, म्हणजे ज्यांना ती जागा खरेदी करण्यात रस आहे असे सगळे लोक एकाच दिवशी येऊन ती जागा प्रत्यक्ष पाहून जातात. असे सगळे प्रकार करूनही ती जागा विकली जात नव्हती म्हणून त्याने मला मेसेज केला.मी त्याला नेहमीप्रमाणे जागेचा नकाशा ईमेल करायला सांगितला, थोडे जागेचे फोटो काढून पाठवायला सांगितलं. मग त्याचा व्यवस्थित अभ्यास करून माझ्या लक्षात आलं कि त्याच्या घरातल्या लोकांचा खूप जीव गुंतला आहे त्या घरात. जोपर्यंत ते लोक मनापासून जागेला निरोप देत नाहीत, तोपर्यंत कितीही प्रयत्न केले तरी ती जागा काही विकली जाणार नाही.अमेरीकन माणूस तो. त्याला हसू आलं या प्रकारावर. मी कधीही कुणाला माझ्या अभ्यासाचं फारसं स्पष्टीकरण देत बसत नाही. कारण लोक नसत्या शंकाकुशंका काढत बसतात, आणि समजा स्पष्टीकरण दिलं तरी ते त्यांना पटत नाही. लॉजिकल माईंड, म्हणजे तर्कानुसार चालणारं त्यांचं मन त्यांना हवं असलेलं स्पष्टीकरण शोधत बसतं. मी ते कुठून आणू? माझं म्हणणं असं असतं की, तुम्ही आंबे खा, झाडं कशाला मोजता?तर मी त्याला काही उपाय सांगितले, आणि कुठल्याही प्रकारची कटकट न करता त्याने ते केले, आणि वर्षभर पडून राहिलेली जागा पंधरा दिवसात विकली गेली.प्रत्येक जागा वेगळी, त्यामुळे त्याचे उपायही वेगळे. एकच उपाय सगळ्या जागांना सरसकटपणे वापरू नये. राहत्या घराच्या जागेचे नियम बिझनेसच्या जागेला लावणं चूक आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. त्यामुळे मी त्या माणसाला नेमके कुठले उपाय सांगितले हे मी इथे सांगत बसत नाही. पण एक उपाय आहे जो सरसकट सगळ्या जागांना लावला तर चालतो, तो मी इथे देतो,  तुम्ही जर एखादी जागा विकणार असाल तर हा उपाय तिथे करा. तो उपाय म्हणजे:- "व्हाईट-वॉश."  माझ्याकडे रिअल इस्टेट एजंट्स् जेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीच्या डिल घेऊन येतात, तेव्हा त्यांना मी जे काही खात्रीचे ५-६ उपाय देतो, त्यातला हा एक उपाय आहे. व्हाईट-वॉश म्हणजे जी जागा विकायची आहे, त्या जागेला आतून संपूर्णपणे पांढरा रंग देणे. उपाय खर्चिक आहे थोडा, पण फायदेशीर आहे. उपयोग होतो याचा. करून बघा आणि अनुभव कळवा. याच्याबरोबर अजूनही ४-५ उपाय असतात. पण जसं मी वर नमूद केलं तसं, सरसकटपणे ते वापरू नये. जागेचा अभ्यास करून मगच वापरावं.आपल्याला जर वास्तू सल्ला हवा असल्यास, ईमेल करा. [vedicjyotishmail@gmail.com]  पुढील प्रकारच्या परिस्थितीत वास्तू सल्ला उपलब्ध आहे:- जागा विकायची आहे. (बंगला, फ्लॅट, दुकान, ऑफिस, कारखाना, गोडाऊन, शोरूम, हॉटेल, बार, हॉस्पीटल, इ.)जागा खरेदी करायचं ठरवलं आहे, तर ती विकत घेऊ का नको? विकत घेतल्यास लाभेल का नुकसान होईल? प्रॉपर्टी लिटिगेशन मध्ये आहे, इतर कोर्ट केसेस चालू आहेत. धंदा नीट चालत नाही, आलेला पैसा कुठे जातो कळत नाही, सेव्हिंग होत नाही. मालाच्या ऑर्डर परत येतात, पैशाचे व्यवहार आयत्या वेळी कॅन्सल होतात.हाताखालचा स्टाफ सांगितलेलं ऐकत नाही, जोडीदाराने धंद्यात फसवलं.कारखान्यात व इतरत्र ऑफिसमध्ये अनावश्यक खर्च होत रहातो, नुकसान होतं, इ. धन्यवाद !शुभम् भवतु !
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!