बाप्पा बोलला आज....

बाप्पा बोलला आज....

By prafulla-s on from prafulla-s.blogspot.com

     गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि तितक्यात लाइट् गेली ,स्पीकर वर वाजनारी गाणी बंद झाली आणि एक अद्भुत शांतता पसरली . माझ लक्ष बाप्पा कड़े गेल ,बाप्पा  स्वता:शीच काहीसा पुटपुटताना दिसला...मनात विचार आला काय बर बोलत असेल बाप्पा स्वता:शी ?...आजुबाजुला कोणी नसल्याच पाहत विचारायच धाडस केल..."काय झाल बाप्पा?" पण बाप्पा काहीच न ऐकल्या सारखा बघत होता मी पुन्हा प्रश्न केला...तेव्हा बाप्पा नि माझ्या ओठांची हालचाल पाहिली आणि कानात हात घालून कापसाचे बोळे बाहेर काढले...धक्काच बसला मला बाप्पा ला विचारल काय रे हे बाप्पा तू कानात कापसाचे बोळे घालून बसलास? आणि काय पुटपुटतोयस स्वता:शिच? नाराजीच्या सुरात बाप्पा नि उत्तर द्यायला सुरुवात केलि, "काय करू रे,वैताग आलाय,किती आनंदाने तुमच्या कड़े यायला निघालो होतो,किती खुश होतो काय सांगू तुला...पण इथ येवून सारा हिरमोड झालय बघ.     वाटल होत तुमच्याशी संवाद साधता येईल...तुमच्या चेहर्यावरचा निरागस आनंद पाहता येईल पण  इथे येईपर्यन्तच नको नकोस वाटायल लागल होत मला...येताना रस्त्यावरुण माझी मिरवणुक काढत इथपर्यन्त आणल ...रस्त्यातल्या खड्ड्यातुन येताना पूर्ण पाठ दुखायला लागली आणि त्यात ह्यांचा धांगडधींगा...मोठ्यानी गाणी,ढोलताशा चा गजर,त्यावर ह्यांचे वेडेवाकडे डांस, बस वर चढून नाचण ,रस्ता आडवूण,इतराना त्रास देवून मला कस काय प्रसन्न करणार ? बरं...मला चार-चार हात दिलेत,पण त्यापैकी तिन्ही हातात काहीना काही दिलय मग काय आशीर्वादाचाच हात मी स्वताच्या कपाळा वर मारून घेतला...मग आशीर्वाद कुणाला कसा काय देवू?ते हि कमी की काय म्हणून मला इथ येवून बसवलं आणि माझ्या दोन्ही काना शेजारी दोन स्पीकर आणून ठेवलेत....त्यावर सतत जोरजोरात गाणी सुरूच असतात...पहिल्यांदाच मला माझ्या ह्या मोठ्या कानांचा पश्चाताप होतोय. म्हणून मी कानात बोळे घालून बसलोय आणि त्यामुळे माझ्या दर्शनाला आलेल्यांच म्हननं ही मला ऐकायला येत नाहिये ,तुम्हाला तरी तुमच स्वताच म्हनन ऐकायला येतय का? नाही ना ? तरी नंतर तुम्हीच म्हणता की बाप्पा आमच ऐकतच नाही..आता तूच सांग मला कस काय तुमच म्हणन ऐकू येईल?      ही तर सार्वजनिक मंडळा मधली माझी अवस्था पण घरगुती गणपति मधली ही अवस्था वेगळी नाही...आधी मी आलो की घरातले सगळी माणस एकत्र यायची,गोतावळा जमा व्हायचा,घरातली सारी माणस कशी खुश, उत्साहित असायची,एकमुखाने आरती गायची. आता मात्र कुटुंब विभक्त झालीत, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा गणपति...मग काय सर्वानी एकत्र यायची प्रथा बंदच झाली,एकमुखाने गायली जाणारी आरती ही आता CD /कैसेट्स लावून गायली जाते,भक्तीचा ओलावा राहिलाच नाही कुठे. माझ्या नावाने स्पर्धा सुरु झाल्यात, ह्यानी 5 फुट उंच मूर्ति आणली की तो 10 फुट आणतो, ह्याने इतक्या रुपयाची सजावट केलि की दूसरा त्याच्या पेक्षा जास्त खर्च करायला लागतो.पण ह्याना का कळत नाही मला नको ही असली सजावट, नको हां मोठेपणा,तुमचा साधेपणा,त्यात असलेली निखळ,निरागस भक्ति चा भुकेला आहे मी,लाडू-मोदक नसले तरी मी रागवत नाही रे.आजकल तर माझा उपयोग  फक्त सेल्फ़ि घेण्यासाठी, आणि तो सोशल साईट वर टाकण्या साठीच उरला आहे. एक-एकदा वाटत निघून जावं तुमच्यातुन ,पुढच्या वर्षी ही न येण्यासाठी पण काय करू काही जन आहेत जे मनापासून मला बोलावतात त्यांच्या साठी मला यावच लागत...हे तर वर्ष गेल पण पुढल्या वर्षी तरी असल काही करू नका...सण करा रे पण त्याचा त्रास होउ देवू नका.           बाप्पा बोलत होता पण अचानक त्याचा आवाज माझ्यापर्यन्त येनं बंद झालं,लाइट्स आल्या होत्या आणि स्पीकर मधली गाणी पुन्हा जोराने वाजायला लागली होती, मी बाप्पा कड़े पाहत तसाच उभा होतो , बाप्पा मात्र पुन्हा कापसाचे बोळे कानात घालून स्वताशिच पुटपुटायला लागला.तितक्यात मागुन कोणीतरी आवाज दिला.."चला पुढे,लोकाना दर्शन घ्यायचय"...आणि मी तिथून बाहेर पडलो ते बाप्पाच्या म्हणन्याचा विचार करतचं.-प्रफुल्ल शेंड्गे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!