फराळाचं ताट.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळ सकाळीच दिवेकरांची नवीन सून फराळाचं ताट घेऊन घरात आली तेव्हा सुलेखा तिच्याकडे बघतच राहिली.मोरपंखी रंगाची अन् केशरी काठांची नारायणपेठी साडी काय, गळ्यात कोल्हापुरी साज काय, नाकात नथ काय, दंडात वाकी काय, केसात गजरे काय, दोन्ही हातात डझन डझन बांगड्या काय, त्यामागे पाटल्या अन् पुढे तोडे काय!! कंबरेत तेवढं काही दिसलं नाही, तेव्हा तिला कशाला मोकळं सोडायचं, असा विचार आलाच सुलेखाच्या मनात. शिवाय घातलंय ते सारं खरं की खोटं हे ही फार विचारावं वाटलं तिला, हल्ली फरक समजत नाही ना. दोन्ही एकच वाटतं, माणसासारखं.पण त्या सगळ्या विचारांना बाजूला ढकलून ती म्हणाली, नवीन जोडा फिरून आलेला दिसतोय वाटतं!!नाही हो, संध्याकाळी जाणार आहोत, असं बोलून फराळाचं ताट सुलेखाच्या हातात देऊन जराशी लाजून हसत पैंजणांची छुम् छुम् करत ती परत निघून गेली.दोन मिनिटं काय ती आली असेल, पण तेवढ्यात तिने सुलेखाला भारावून टाकलं. ती गेली तरी तिच्या गजऱ्याचा सुगंध सुलेखाच्या घरात अजूनही दरवळत होता.किती बाई हौशी सून मिळालीये दिवेकरांना!! हल्ली मुली कुठे घालतात एवढं सगळं? आणि ही तर फक्त फराळाची ताटं वाटायला इतकी नटून थटून आली??काही असो, पण ती आली आणि एखादी गार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं किती छान वाटलं आपल्या मनाला. तिचा प्रसन्न चेहरा बघून मरगळ सगळी निघून गेली मनातली. ती आली आणि वाटलं खरंच दिवाळीचा मोठा सण आहे आज!!ती आली आणि मलाही तिच्यासारखं नटावं वाटतय आता!! शेवटची कधी मी एवढी नटले होते बरं...... छे, आठवतही नाही आता. एवढा साजशृंगार लग्नानंतर कित्येक वर्षांत केलाच नाही.मुलींनाच काय ते नटवतो आता आपण!! सगळं सोडून देण्याएवढं काही वय नाही झालं आपलं अजून........ (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); आई, भूक लागली. खायला दे पटकन....बाहेर फटाके उडवायला गेलेल्या मुली ओरडतच आत आल्या तेव्हा कुठे सुलेखा तिच्या तंद्रीतून बाहेर आली.दोघींनी हात पाय धुतले, आणि बघू कोणा कोणाची ताट आलीयेत करत दिसणाऱ्या ताटांमधले एकेक पदार्थ उचलू लागल्या, तेव्हा सुलेखा त्यांना ओरडत म्हणाली, अरे हे खाऊनच पोटं भरतील तुमची. मी केलेलं कोण खाणार मग?अगं आई तुझ्या हातचं तर नेहमी खातोच ना आम्ही.   ही अशी डायनिंग टेबलावर फराळाची ताटं समोर आहेत तर किती वेगवेगळे पदार्थ कोणी आपल्यासमोर मांडल्यासारखं वाटतय ग. अगदी राजेशाही थाटासारखं !!मग मी आपल्या घरचं पण मांडते की त्यात, थाट वाढेल आणखी थोडा!!आई नंतर तर दिवसरात्र तेच खायचंय ना संपेपर्यंत, आता आस्वाद घेऊ दे जरा दुसऱ्या हातांचा, मोठी चट्दिशी म्हणाली.दोघींना त्या ताटावर तुटून पडलेलं पाहून सुलेखाला  बालपणातली ती आणि तिची ताई डोळ्यासमोर आली. त्याही अशाच होत्या अगदी, फराळाची ताटं आली की तुटून पडायच्या त्यावर, आणि सारखं स्वतःच्या हातचं खाऊन कंटाळलेली आईही!!आणि त्याहून आवडायचं फराळाची ताटं वाटायला. दोघी बहिणींचा अगदी सारखाच ड्रेस असायचा. नट्टापट्टाही सारखाच. पाच घरं होती जवळची बाजूला. त्या पाच घरी ताट देणं, त्या घरातल्यांशी गप्पा गोष्टी करणं, कधी कुणी लाडाने चॉकलेट देणं, कधी झाडावरचं ताजं फळ हातावर ठेवणं, कधी ड्रेस छान आहे म्हणून कौतुक करणं, कधी कुणी थट्टा मस्करी करणं सगळं सगळं आवडायचं सुलेखाला. ही ताटं वाटतानाच तर तिचं अन् त्याचं जमलं होतं. नुकतीच अकरावीत गेलेली सुलेखा दोन घरं सोडून राहणाऱ्या आपट्यांच्या घरात फराळाचं ताट द्यायला म्हणून गेली अन् शिक्षणासाठी बाहेर असणाऱ्या तिच्या बालमित्राशी घरात शिरता शिरताच नजरानजर झाली. अन् डोळ्यांनी, मनानी, स्वप्नांनी त्याच क्षणात ठरवूनच टाकलं सगळं काही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  हे सगळं आठवलं आणि मन शहारून आलं सुलेखाचं. तेवढ्यात तोही आतून बाहेर आला, पुन्हा नजरानजर झाली. सुलेखाच्या ह्या नजरेने त्यालाही ती पहिली नजर आठवली. तो तिला हाताला धरून आत घेऊन गेला. तिची कळी खुलली खरी, पण लटक्या रागात ती म्हणली, काय रे तुझं? त्यावर तो म्हणाला, एवढी काय निरखत होतीस ग त्या दिवेकरांच्या सुनेला? मी बाहेर येत होतो फराळाला, तेवढ्यात तुझ्याबरोबर ती दिसली म्हणून आत गेलो परत.किती नटलेली सजलेली बघितलस ना ती? खूप सुंदर दिसत होती......सुलेखा, मला तर तूच आठवलीस तिला बघून!! तू ही अशीच तर मिरवत होतीस आपल्या पहिल्या दिवाळीला. आठवतं देवळात गेलेलो आपण? पुरुष तर पुरुष, बायकाही तुझ्याकडे वळून वळून बघत होत्या. अशीच नखशिखांत नटली होतीस की!!तिथून आल्यावर लगेच आजूबाजूला फराळ वाटायला गेलीस. आज तुझ्या मनात आलं ना त्या दिवेकरांच्या सुनेला पाहून, अगदी तेच वाटलं  असणार त्या घरातल्या बायकांना त्यावेळी तुझ्याकडे पाहून. तो हे म्हणाला, तसं सुलेखा मनातून सुखावली.इतकं सगळं आठवतंय तुला?, नवल वाटून तिने विचारलं.का तू नटणं मुरडणं सोडलं म्हणून गोड आठवणी सुटतात का अशा? बघ तुझे ते दागिने अजूनही घरात आहेत. दर दिवाळीला बँकेच्या लॉकर मधून काढून आणतेस, घालत मात्र नाहीस. तुझ्या पसंतीने घेतलेली नवी कोरी खणाची साडीही आहे. गजरे मी आणून देतो. हो ना तशी तयार पुन्हा!!चल रे, गजरे बिजरे मी कुठे घालते हल्ली........ (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मग घाल की!! लग्नाच्या पहिल्या वर्षात असतो तसा उत्साह तुम्ही बायका कायम का टिकवू शकत नाही ग? सोडून का देता हळूहळू सगळं? तुम्ही तुमच्या मनाच्या राण्या असता, कोण तुम्हाला अडवणार असतं?हो रे पण येतो कंटाळा. आणि कधी वाटलं तरी ते इतर जबाबदाऱ्यात मागे ढकललं जात. आता तर मुलींना सजवता सजवता माझं सजणं धजणं पार विसरूनच गेलीये मी!! एवढं बोलून सुलेखा मुलींना काय हवं नको बघायला उठली, तोच त्याने तिचा हात पकडून तिला पुन्हा थांबवलं आणि म्हणाला, आजही आपट्यांची सून दिवेकरांच्या सुनेला कॉम्प्लेक्स देऊ शकते बरं का!!सुलेखा गोड हसून उठली आणि मुलींकडे निघून गेली.संध्याकाळी मुलींना नटवताना मात्र आपणही आज छान तयार होऊया, असं तिला मनापासून वाटायला लागलं. त्याने मुद्दामच आणून ठेवलेले गजरेही खुणावत होतेच.तिने नवीन साडी काढली, कपाटातले नवे जुने आवडते दागिने काढले. मुली आवरून बाहेर गेल्या तसं तिने शांततेत स्वतःचं आवरायला घेतलं. आज कितीतरी वर्षांनी ते दागिने तिच्या अंगाला लागत होते. घालता घालता किती गोष्टी आठवत होत्या तिला. हा बकुळहार पहिल्या दिवाळीला सासूबाईंनी दिलेला. ह्या पाटल्या आईकडून आलेल्या. हे तोडे लग्नाच्या पाचव्या वर्षी त्याने हौसेने केलेले. सगळं घालून सुंदर सजली ती, अगदी चांदीचा मेखला सुद्धा आठवणीने लावला कंबरेला. त्याने आणलेले गजरेही माळले. आरशात स्वतःलाच ओळखू न येण्याइतपत देखणी दिसत होती ती. तिला वाटलं, हे रूप इतके वर्ष कुठे सोडून दिलेलं आपण?? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मग ठेवणीतलं चांदीचं ताट तिने मुद्दामच बाहेर काढलं. चकली, लाडू, करंजी, चिवडा, शेव, कडबोळी, शंकरपाळ्या सगळं सगळं त्यात मांडलं. ते घेऊन कॉम्प्युटर रूममध्ये ती गेली, आणि म्हणाली, हे फराळाचं ताट कुठे ठेवायचं आपटे?त्याने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, आपटे पार बेहोष झाले आता..........किती छान वाटलं तुला असं बघून, साक्षात लक्ष्मी जणू!!थोडं लक्ष दे ग स्वतःकडे, एक तपच झालय लग्नाला, अजून खूप तपं आहेत बाकी. एवढ्यातच उत्साह घालवून कसं चालेल?आता खरी दिवाळी वाटतेय, तुझ्याकडे बघून!!काही पण म्हणा, त्या दिवेकरांच्या नव्या सुनेपेक्षा आपट्यांची जुनी सून जरा जास्तच चमकतेय बरं का!!!हातातलं फराळाचं ताट त्याच्यासमोर ठेऊन, नव्या नवरीसारखी लाजून सुलेखा तिथून बाहेर सटकली. मात्र तिच्या पैंजणांच्या नाजूक छुमछुमीत अडकलेल्या मनाने त्याला तिथून उठवून तिच्या मागे जायला भाग पाडलच........!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!