प्रेमम- एक सिनेमा

प्रेमम- एक सिनेमा

By prafulla-s on from prafulla-s.blogspot.com

एक मल्यालम सिनेमा पहायचा योग आला...प्रेमम (Premam) ...2015 ला प्रदर्शित झालेला मल्यालम सिनेमा. नावावरून तुम्हाला लक्षात आलेल असेलच की हां प्रेमावर आधारलेला सिनेमा आहे. तस मला मल्यालम समजत नाही..पण टाइम पास म्हणून बघत होतो...सुरुवातीचे 10-15 मिनिट काहीच समजत नव्ह्त काय चाललय ते.बोर व्हायला लागल पण त्यानानंतर मात्र कहानिने एक वेगळाच वेग पकडला..सिनेमाचा हीरो.. जॉर्ज अर्थात नीवीन पौली...जॉर्ज ची दहावीची परीक्षा झालीय आणि ह्या वयात जे बहुतेक जनांच्या बाबतीत घडत तेच त्याच्या बाबतीत ही घडायला लागल होत..प्रेमात पडायला लागला होता तो..पडायला काय पडलाच होता प्रेमात...मेरी तीच नाव...दिसायला इतकी सुंदर की कुणी ही तिच्या प्रेमात पड़ाव अस...अनेक जनांच्या कालजाचा ठोका चुकायचा तिला पाहून ...त्यात हां जॉर्ज ही होता...तिच्या वरच प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला प्रेमपत्र द्यायला तिच्या मागे जानारा तो आणि त्याचे दोन मित्र...मेरीच्या वडिलाना समोर पाहून कशी धूम ठोकतात ते पाहून हसू कण्ट्रोल करन मुश्किल.  त्याची तिला सांगण्याची धडपड अविरत सुरु असतेच पण शेवटी पहिल प्रेम ना ते ,पूर्ण कस होणार? वर्ष पुढे सरकत जातात...कहानी सुरु होते ती  कॉलेज च्या दिवसातली..सुरुवातीला एकदम शांत, सज्जन वाटणारा जॉर्ज आता कॉलेज मधला एक टपोरी मुलगा झालाय. जुनिअर्स ची रैगिंग करणारा, राडे घालणारा,पण अगदीच खुप सीरियस वगेरे नाही...त्या वेळी पहिल्यांदा भेटते ती "मलर" अर्थात सई पल्लवी...मलर जॉर्ज च्या कॉलेज मध्ये एक शिक्षिका म्हणून नव्याने रुजू होते..अगदी पहिल्या भेटीत नाही पण तिला पाहून जॉर्ज च्च्या हृदयाची धडधड वाढायला लागते....तिच्या अभिनया इतकी तिहि तितकीच सुन्दर...तिला पाहून कुणाचीही दांडी गुल होइल अशी...तिहि हळुहळु जॉर्ज च्या प्रेमात पडायला लागते...तो प्रेमात पडण्याचा अलगद प्रवास खुप छान मांडलाय आणि दाखवला सुद्धा आहे...त्यांची जुळत जानारी केमिस्ट्री तर अप्रतिम...शांत,प्रेमळ,बिनधास्त अस एक वेगळ कॉम्बिनेशन पहायला मिळत ते मलर च्या व्यक्तिरेखेत...पण इथ ही काही अनपेक्षित घडतच...तो सारा प्रसंग तुम्हाला थोडाफार सुन्न करूँ जातो...काही वर्षानी कहानी पुढे सरकते...जॉर्ज चा बिज़नेस, सोबतीला असणारे त्याचे मित्र आणि जॉर्जला पुन्हा प्रेमात पाडन्यासठी एंट्री होते ती सेलिन ची...अनपेक्षित झालेली ओळख भूतकाळातल्या अनेक गोष्टींची सांगड़ घालून जाते.पण ह्या कहानित ही एक ट्विस्ट येतोच...सेलिन च आधीच ठरलेल लग्न...मग जॉर्ज काय अणि कस मैनेज करतो ते पाहताना हसू आवरत नाही .पण त्याच वेळी आपल्याच मनात भीती सुरु होते ती जॉर्ज ची ही प्रेम कहानी तरी पूर्ण होणार की नाही ह्याची.शेवट गोड जरी केलेला असला तरी शेवटी अस काही घडत की उगाच मनाला चटका लागल्यासारख वाटत राहत...आणि ह्या एंड पेक्षा ...तो दुसरा एंड हवाहवासा वाटायला लागतो...पण काहीही असल तरी हां सिनेमा इतर प्रेम काहनी पेक्षा नक्कीच खुप वेग्ळा आहे..डोक्यातच काय मनात एक वेगळीच जागा निर्माण करतो...सिनेमात भरपूर जन नव्खे असले तरी अभिनय सर्वांचाच उत्तम...पहिलाच सिनेमा करणारी सई पल्लवी तर कायम लक्षात राहते. जॉर्ज..अर्थात निविन पौली बद्दल तर काय बोलायच, ला..ज..वा..ब. सुरुवातीचा, मधल्या भागात आणि शेवटी जो जॉर्ज तुम्ही पाहता ना तेव्हा सारख वाटत राहत हां आधिचाच आहे की हां कुणी दुसरा हीरो तर नाही ना? अभिनयासोबत सिनेमातल संगीत ही तितकच सुंदर, आणि कैमरा मध्ये कैद केलाल दक्षिण भारतातल निसर्ग सौंदर्य वेगळाच फिल देतो.पूर्ण सिनेमा बघून समजत का हां माल्याल्म मधला 2015 चा सर्वात जास्त कमाई केलेला,तर मल्यालल्म मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा सिनेमा का ठरला आहे ते.एका शब्दात जर सिनेमाच वर्णन करायच असेल तर खरच " कट्यार काळजात" घुसवानारा सिनेमा असच म्हणता येईल.भाषेची बंधन तोडून आपलासा करायला लावणारा हा सिनेमा तुम्हाला कधी पहायला मिळाल तर नक्की पाहा...प्रेमम-प्रफुल्ल शेंड्गेHttp://prafulla-s.blogspot.in
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!