पैसा फक्त साठवण्यासाठीच........??

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

तुकाराम- ताई, तुमच्या येवड्या मोट्या तीन खोल्या हायेत, तरी जागा नाई म्हनताय व्हय, आमची खोली बगाल तर काय म्हनाल मंग?श्रुती- का, केवढी आहे तुमची खोली?तुकाराम- ह्यो तुमचा हाल हाये ना, त्येच्या बी निम्मी. त्यामंदी आमी राणारी चार डोकी. आमी दोगं नवरा बायकू आsन आमची दोन पोरं, येक पोरगा हाय बारका आनी पोरगी हाय थोरली!!श्रुती- काय म्हणता भाऊ? काल तर सांगत होता, एकामागोमाग कामं मिळतात मला. आणि हे घरातलं रंगकाम, दुरुस्ती, नूतनीकरण ह्या कामात पैसा मिळत असणार चांगला, तुमचाही अनुभव मोठा आहे, मग काय करता पैशाचं?तुकाराम- हा तसा पैसा सुटतो की. मी काय येवढा शिकला- सवरलेला नाई, पन ह्या कामात मुरलेला हाय. छक्के पंजे काय बी येत नाईत, तसं बगा जेवडी कामं करतू त्या मानानं कमवत न्हाई.तरी गावाला घर बांधून ठेवलं हाय चांगल्या चार खोल्यांचं.श्रुती- गावाला? कोण आहे का तिथं?तुकाराम- न्हाई कोनी बी नाई, आई बाप दोघं बी गेले, दोन वर्ष झाली त्येला. वर्षभर व्हते नवीन घरात.श्रुती- मग आता कोण तिथं?तुकाराम- कोनी न्हाई..... कुलूप.श्रुती- तिथे चार खोल्यांचं घर बांधून कुलूप लावून ठेवलंय. आणि इथे अडचणीत राहता होय?तुकाराम- मंग इतं घ्यायला कुनाच्या बापाला तरी परवडतय व्हय? पोराचं शिक्ष्यान हाय, पोरीचं लगीन हाय. पैसा साटवायला नगं व्हय?श्रुती- भाऊ पण मला सांगा, तुम्ही जाणार कधी राहायला तिथं.तुकाराम- सुट्टीमंदी जाती की बायकू, पोरांना घिऊन. झालं तर मी बी दोन दिस ऱ्हावून येतो. आमची कामं तवा जोमानं असत्यात नव्हं का?श्रुती- म्हणजे सुट्टीत गावी राहण्यासाठी बांधलय का घर? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  तुकाराम- न्हाsई.....पोरीचं लगीन लावून दिलं, पोरगं कामधंद्याला लागलं की जावू आमी नवरा बायकू तिकडच.श्रुती- भाऊ, मग तुम्हाला तर त्या मोठ्या घराचा उपभोग म्हातारपणीच घ्यायला मिळणार!! तोपर्यंत काय असंच राहणार एका खोलीत. ऐपत असूनही, कष्ट करुन पैसे कमवत असूनही?दिवसभर काम करून थकून गेल्यावर निवांत टेकायला तरी मिळत का हो तुम्हाला? तुकाराम- बायकू बी अगदी ह्येच म्हनती माजी, कावकाव बी करत असती सारकी. ह्या टिचक्या खोलीतच आविशभर राह्यचं का, म्हनती. तिचं बघून पोरगी बी किरकिरती. व्हसकून गप करतू बगा त्यांना.श्रुती- काय चुकतं त्याचं भाऊ? कष्ट कोणासाठी करता तुम्ही एवढे? त्यांच्यासाठी ना? मग आपल्या परिवाराला व्यवस्थित मोकळं राहिलेलं बघून आवडणार नाही का तुम्हाला? तुमची परिस्थिती चांगली असूनही का त्यांना चांगल्या ठिकाणी निवारा देत नाही तुम्ही? त्याचा हक्क आहे तो. आमच्याच सोसायटीमधली किती कामं केली तुम्ही या वर्षभरात. आमच्या सगळ्यांची घर एवढी चांगली केलीत, आणि स्वतःच्या घराकडं बघायला वेळ नाही तुम्हाला? आणि वाटतही नाही का आपलंही असं एखादं घर असावं. इतरांचं सजवतो तसं आपलंही घर सजवावं?तुकाराम- ताई वाटतं, लाख!! पन व्हायाला तर पायजे. निसतं वाटून काय उपयोगाचं?? तुमी म्हनता त्ये बी चुकीचं न्हाय तसं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  श्रुती- मग घ्या की मनावर. नुसतं व्याज घेत ठेवले असतील कुठं तर प्रॉपर्टीत गुंतवा की. पोरं मोठी होईपर्यंत किती किंमत होईल त्याची?नंतर पाहिजे तर ठेवा ते घर, नाहीतर टाका विकून गावाला जाताना. पण आत्ता ऐन उमेदीत तुम्हीही सुख घ्या अन् बायको पोरांनाही घेऊ द्या की!!घरासाठी पोटासाठी तर वणवण करतो ना आपण?घरात अंधार, अन् पोटाला चिमटा लावायचा, तर काय उपयोग त्या कष्टाचा? पैसा काय फक्त साठवून ठेवायला कमवायचा? रागावू नका भाऊ पण विचार करा यावर. तुम्ही बोललात म्हणून आम्हाला कळलं तरी, मी तर समजत होते, एवढे कमावताय तर तुमचं पण घर चांगलच असणार.तुकाराम- ताई, बघतू आजच बायकूशी बोलून. ती तर लैच खूष व्हईल बगा. मी तर न्हाई कदी येवडा विचार केला, पन तुमच्यासारकी शिकलेली मानसं बोलत्यात म्हंजी बराबरच असनार......तुमच्यावानी नाई जमलं तरी हाये त्याहुन मोटं बायको- पोरीच्या पसंतीनं शोधतू बगा एकांदं.....मला बी आरामात टेकाय मिळल. तितं लय किचकीच व्हती डोक्याला.पैसा काय कितीबी कमवू शकन मी.तेचा आजाबात वांदा न्हाई. तुमी म्हनताय तसं बायकू पोरांचा अन् सोताचा इचार बी गरजेचा हाय......बगतू आता कसं जमतं ते.श्रुतीच्या घराचं नूतनीकरणाचं काम करणारे तुकारामभाऊ आणि श्रुती यांच्यातला जरी हा संवाद असला, तरी हे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. खूपजणं शहरात मरमर कष्ट करतात, अगदी पै पै साठवून गावाला घरं बांधून ठेवतात. उमेदीच्या वयात, अंगात जोश, उत्साह असताना भविष्याचा सतत विचार करून आपलं भविष्य सुंदर व्हावं याचीच तरतूद करतात, मात्र वर्तमानातला आनंद हातातून निसटतोय, हे त्यांच्या लक्षातही येत नाही.........सर्वात आश्चर्य तेव्हा वाटलं, जेव्हा आम्ही एका फुगेवाल्याच्या मुलीला कपडे द्यायला त्याच्या नेहमीच्या जागेवर शोधत होतो, तेव्हा तिथल्या नेहमीच्या दुकानवाल्याला विचारलं असता, तो म्हणाला, अहो हा दिसतो तसा नाही. इथं भीका मागतो, गावाला जमीन जुमला आहे याचा. शॉक बसला ऐकून खरंतर, कारण तो फुगेवाला अतिशय दयनीय अवस्थेत छोट्या मुलीला सायकलवर घेऊन फिरताना आम्ही रोज बघायचो.......!!घरादाराचे एवढे हाल करून तो जमीन जुमला प्रदर्शनात मांडून ठेवणार की काय त्याचा तोच जाणे!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!