पेटीएम मॉलवर दर मिनिटाला १० दुचाकींची विक्री

पेटीएम मॉलवर दर मिनिटाला १० दुचाकींची विक्री

By atharv on from feedproxy.google.com

पेटीएम मॉलवर सध्या सुरू असलेल्या महोत्सवाच्या काळात दर मिनिटाला १० दुचाकी वाहनांची विक्री होत असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.पेटीएम मॉलने आपल्या ऑनलाइन-टू-ऑफलाइन (ओ-टू-ओ) मॉडेलच्या अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या मंचावरून पसंतीची दुचाकी निवडल्यानंतर त्यांच्या जवळच्या स्टोअरमधून याची डिलीव्हरी मिळवण्याची सुविधा प्रदान केली आहे. पेटीएम मॉलने यासाठी सुजुकी, यामाहा, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस, महिंद्रा, वेस्पा आणि एप्रिलिया यासारख्या प्रमुख ऑटोमोटिव्ह ब्रॅण्डसह करार केला असून ५०० शहरातील २००० हून अधिक अधिकृत दुचाकी विक्रेत्यांना आपल्या यादीत समाविष्ट केले आहे. मेरा कॅशबॅक सेलच्या अंतर्गत, कंपनीने २०० पेक्षा अधिक प्रकारच्या दुचाकीवर रु. ५,००० पर्यंत कॅशबॅक देत आहे. याशिवाय ग्राहकांना लकी लिफाफाही प्रदान करण्यात येत असून दुचाकींच्या खरेदीवर पेटीएम गोल्ड आणि १००% कॅशबॅक जिंकण्याची संधी देखील उपलब्ध आहे.या संदर्भात पेटीएम मॉलचे मुख्य संचालन अधिकारी अमित सिन्हा यांनी सांगितले की, “वाढीव मागणी असलेल्या सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आमच्या क्यूआर कोड प्रणालीने महत्वाची भूमिका बजावली आहे. येणार्‍या आठवड्यांमध्ये, आम्ही शेकडो नवीन डीलरशिप जोडणार आहोत.” याशिवाय पेटीएम मॉलचा लहान शहरांमध्ये विस्तार करण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!