नीट वाचा आणि स्त्रीयांचा आदर करायला शिका...!!

By djsaurabhk on from www.sadhsopa.com

रात्री ११ ची वेळ. ती दादर च्या स्टेशन वर लोकल ची वाट बघत होती..कानात हेड फोन घालून मस्त गाणी ऐकत होती.नेहमीची १०.५० ची लोकल तिला चुकलेली. त्यामुळे आतापुढच्या लोकलची वाट बघण्याखेरीज तिच्याकडे दुसरा पर्याय देखील नव्हता.जसा जसा वेळ जात होता तसं तसं तिला काळजी वाटत होती..तसं लहानपणापासून मुंबईत राहणारी. दादर ते डोंबिवली रोज चा प्रवास ठरलेला. पण तिला काळजी वाटत होती कारण आज तिला बारा च्या आधी घरी पोहोचायचं होत.तिच्या आई चा वाढदिवस होता ना...!!सुरेखा...!! सुरेखा नाव तीच. जेमतेम २५ वय असेल तीच..पण वयाच्या मानाने तिने खूप काही सोसलं होत.मध्यम वर्गातील टिपिकल मराठी पोरगी.दिसायला नावाप्रमाणेच सुरेख होती.बापाची नोकरी गेलेली..त्यात तो बेवडा !! आई थोड काम करून पैसे जमवायची आणि बाप ते पैसे दारू मध्ये घालवायचा..सुरेखा खूप शिकली चांगला जॉब पण मिळाला.अन नुकताच तीच लग्न पण ठरलेलं ,२ महिन्यानंतर चा मुहूर्त होता.थोड्या वेळात लोकल आली. ती लगेच गाडीत चढली. आज गाडी रिकामीच होती.२,३ मुली होत्या.त्या पण थोड्या वेळाने पुढच्या स्टेशन वर उतरल्या.अन अचानक…ट्रेन मध्ये ३-४ तरुण चढले, तोंडावरूनच ते टपोरी वाटत होते.सुरेखा थोडी शी बावरली पण तिने गाण्यांचा आवाज वाढवला आणि मस्त गाणी ऐकत बसली. हळूहळू गाडीनेही थोडासा वेग वाढवला.एवढ्यात ते ४ जण तिच्या जवळ येउन बसले.आता मात्र ती चांगलीच घाबरली. त्यातल्या दोघांनी शेरेबाजी सुरु केलीत्यांच्या तोंडातून अश्लील शब्द ऐकून तिला खूप विचित्रच वाटला.ती उठली …अन दरवाजा कडे जाऊन उभी राहिली. तिने मनात सर्व देवांची विनवणी केली. पुढे काय घडणार आहे ते तिला चांगलंच कळून चुकलं होत. तेवढ्यात तिला तिच्यापाठीवर स्पर्श जाणवू लागला.आता मात्र ती बिथरली. डोळ्यातून आसव गळू लागली.तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या दणकटहातांसमोर तिच्या कोमल हातांचा प्रतिकार म्हणजेहत्ती ला मांजराने प्रयत्न करण्यासारखे होते.त्यांचे वासनेने बरबटलेले हाथ तिच्या पूर्ण शरीरावरून फिरत होते.तिच्या छातीवरचीओढणी दरवाज्यातून उडून गेली होती.ती नुसती थरथरत होते. अचानक तिची हालचाल बंद पडली.तिचे शरीर थंड पडले. तिने मनाशी एक निर्णय घेतला आणि त्या धावत्या लोकल मधून तिने स्वताला झोकून दिले.या कुत्र्यांच्या हाती लागण्यापेक्षा तिला हा मार्ग जास्त सोयीस्कर वाटला.दगडांवर आपटून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले होते.त्या नराधमाना याची काही काळजी नव्हती.त्यातल्या एकाने खिशातली सीगारेट पेटवली आणि म्हणाला…"...मेली कर्माने….आमच्या कामी आली असती ते पण नाही..."तिच्या आई ला रात्री बारा वाजता फोन आला.वाढदिवसाच्या शुभेच्छांचा नव्हे तर एकुलत्या एक  कमावत्या लग्न ठरलेल्या मुलीच्या मृत्युच्या बातमीचा तिच्या समोर सुरेखाचा हसरा चेहरा उभा राहिला..!!पुढे मी काही लिहिण्याची गरज नाहि कि त्या मुलांनी अस का केल,तिच्या आई च काय होणार. . . .??तुमच्या वाचकांपैकी सर्व चांगल्या घरातून असाल आणि तुम्ही असे काही करणार नाही याची मला खात्री आहे…आणि “त्या” लोकांनी जर हे वाचले तर त्यांच्यात काहीही फरक होणार नाही हे देखील मला माहित आहे...!!जाता जाता एवढंच........देवा तुझ्या गाभा-याला उंबराच नाही, कुठ सांग ठेऊ माथा.. कळेनाच काही...देवा कुठं शोधू तुला, स्त्री जन्म घेतला एवढंच रे माझा गुन्हा !!जर तुम्हाला वाटत असेल ही गोष्ट Share करण काळाची गरज आहे तर नक्की करा....!!!
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!