नाना मास्तर

नाना मास्तर

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

सदानंद परवा पुण्यात भेटला. म्हणाला, नाना मास्तर गेले. मी हळहळलो. गप्प झालो. भर गर्दीत अख्खा नाना मास्तर डोळ्यापुढं उतरला. शहरातल्या सिमेंटच्या रस्त्यावरून मी आयुष्याला पळवीत असताना दूर गावाकडची कितीतरी माणसं आजवर अशी गळून पडलेली. काही कायमची नजरेआड होत गेलेली. नाना मास्तर त्यापैकीच. नाना मास्तर म्हणजे एकेकाळी गावची शान. निदान आमच्यासाठी तरी. नाना मास्तरचा केवढादरारा. स्वातंत्र्याचीपहाट व्हायच्या आसपास नाना मास्तरचा सूर्य आमच्या गावात उगवलेला. गरिबीत जन्मला. गरिबीत वाढला. शिकलासुद्धा गरिबीतच. . निस्वार्थी माणूस. दिलदार मनाचा. गरिबांची पोरं मास्तरनं पदरमोड करून शिकवली. न शिकणारी सुद्धा ओढून नेऊन शाळेत बसवली. आडल्या नडल्याला मदत करावी तर मास्तरानच. आखाडात पावसाची उभी धार सुरु असावी. नदीचं पाणी पुलाला लागलेलं असावं आणि अशावेळी गरीबाघरच्या अवघडलेल्या बाईला कळा सुरु व्हाव्यात. कुणीतरी मास्तरचं दार वाजवावं. आणि मास्तरनं क्षणात गाडीजुंपूनतालुक्याचादवाखानागाठावा. कुणाचा भांडण तंटा मिटवावा तर  मास्तरानीच. अथवा कुणाच्या वाटपात मध्यस्ती करायची असो. मास्तरला बोलावणं गेलं नाही असं कधी झालं नाही. पांढरा नेहरू सदरा, धोतर आणि डोक्यावर टोपी चढवून मास्तर हजर असायचे. सुखात हजर असायचे तसे एखांद्याच्या दुःखात सुद्धा असायचे. दिवाळी आली कि भावकीतली एखांदी नवीन लग्न झालेली लेक दिवाळीला आणायची असायची. मग मास्तरांचा मुराळी व्हायचा. बैलगाडी जुंपायचे. दुरड्या गाडीत चढवलेल्या जायच्या. वेस ओलांडून मास्तरची गाडीबाहेरपडायची. तिकडे नव्या लेकीचे डोळे मुराळ्याच्या वाटेकड लागलेले असायचे. मास्तर या सगळ्या कसरती अगदी सहजपणे करायचे. मास्तर कधी पंढरपूरला जाऊन आले कि घरी बारस घालायचे. हातात पिशवी घेऊन गल्लीभर बुक्का लावीत फिरायचे. दारात पंक्ती उठवायचे. शाळेच्या पोरांनाही जेवायला घालायचे. पण उभ्या आयुष्यात गावाचं राजकारण कधी मास्तरांना समजलं नाही. आणि मास्तरचं समाजकारण कधी गावाला समजलं नाही.मास्तरांनी काय नाही शिकवले. इतिहास शिकवला, भूगोल शिकवला, टिळक, फुले, गांधी,  शिवाजी, बाबासाहेब शिकवले. किती महापुरुषांच्या गोष्टी मास्तरांनी शिकवाव्यात. एकनाही हजार गोष्टी. शेकडो आठवणी. आपल्या हाताखाली शिकलेली पोरं शहरात नोकरी करतात याचा किती अभिमान मास्तरला वाटावा. कुणी रस्त्यात आपला विद्यार्थी भेटला तर  त्याचा किती आनंद व्हावा मास्तरला. मागच्या वेळी वाट वाकडी करून मास्तरांना भेटायला गेलो. तर मास्तर जुन्या घरात नव्हतेच. साऱ्या गावाच्या वाटण्या करणाऱ्या मास्तरांची पोरांनीच वाटणी केल्याचं समजलं. थोरल्या सुनेच्या घरात एका कोपऱ्यातल्या कॉटवर मास्तर झोपलेले. मी जवळ गेलो. आवाज दिला. ओळख सांगितली. मास्तरांना केवढा आनंद व्हावा. पण अंगाची सगळी रया उडून गेलेली. आवाज क्षीण झालेला. धरपड्त उठलेले. जुन्या नव्या आठवणी हळुवार उकरून झाल्या. नव्या जुन्या पिढ्यांची सांगड घालताना मास्तरांची दमछाक स्पष्ट जाणवलेली. माझ्या अगोदर त्यांनीच विचारलं, "बरं हाय न्हवं तुझं!" मी हो म्हंटल्यावर “तुमचं बरं हाय म्हणजे आम्ही सुखी बघा!" असं मास्तर म्हणाले. असल्यासमाधानावरमास्तरकसे काय जगत होते. दुसऱ्यांच्या सुखावर सुद्धा माणसं कशी काय जगत असतील. पडलेला प्रश्न डोक्यात घेऊन मी जायला निघालो. शुन्यात बघत मास्तर म्हणाले, "आता परत नाय भेट व्हायची!" होय! अखेरचेच शब्द होते ते......सदानंदचा निरोप घेऊन मी रात्री घरी परतलो. अंथरुणावर कलंडलो. रात्रभर नुसती तळमळ. डोळाच लागेना. काहीमाणसांचंमोठेपणकळायलात्यांचा मृत्यूचका व्हावा लागत असावा. काही केल्या मास्तर डोळ्यापुढून जाईनात. अनेक प्रश्नांनी डोकं उठलं होतं. पण उत्तरे होती कुठे? मास्तरांनी शिकवलेलीकितीतरीपोरं डॉक्टर, वकील, इंजिनिअर झाली असतील. ध्येयपोटीकाही बिनपगारीमास्तरसुद्धाबनली असतील. जगण्याच्या जीवघेण्या धरपडीत सगळी मास्तरला आता विसरून गेली असतील का? शेवटच्या काळात मास्तरला काय काय आठवलं असेल? साऱ्या दुनियेची पोरं आपण शिकवली. पण स्वतःची पोरं शिकली नाहीत याची खंत शेवट्पर्यंत मास्तरला छळत राहिली असेल का? कित्येक जणांनी आपल्या व्यावहारिक भोळेपणाचा फायदा घेत हातउसने करून बुडवलेले पैसेयाबद्दलमास्तरलाकाहीचवाटलेनसेल का? अमुक तमुक विकास केला म्हणून चौकाचौकात ब्यानरवर झळकणाऱ्यामिसरूडन फुटलेल्या पोरांसारखं मास्तर मृत्यूनंतरही पोस्टरवर का झळकले नसावेत? अनेक प्रश्न आहेत पण उत्तरे नाहीत.  शेवटी, "इथून पुढे गावात कुणाचं चांगलं उदाहरण द्यायचं झालंच तर नव्या पिढ्यांना ते नाना मास्तरचं दिलं जाईल का? #ज्ञानदेवपोळप्रतीकात्मक फोटो
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!