नवीन PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे मागवावे - महा माहिती
By rahul2205 on तंत्रज्ञान from https://www.mahamahiti.in
आधार कार्ड आपण सगळेच वापरत असणार कारण आज सर्व कामांसाठी आधार कार्ड ची गरज लागते. कोठेही जाताना आधार कार्ड सोबत ठेवावे लागते. तुम्हाला माहीतच असेल कि आधार कार्ड हे साध्या कागदापासून बनवलेले आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांनी आधार कार्डला प्लास्टिक लॅमिनेशन सुद्धा करून घेतले असेल, कारण कागदाचे आधार कार्ड खराब होऊ शकते, त्यात पाणी जाते किंवा दुमडले जाते. आधार कार्ड सुरक्षितपने राहावे आणि हाताळता यावे यासाठी सरकारने PVC आधार कार्ड देण्याची घोषणा केलेली आहे.