नक्षत्र दैनंदिनी

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

श्रीराम ????????????नवीन वर्ष सुरु झाले की आपण बरेच जण डायरी / रोजनिशी लिहितो. जानेवारी २०२० पासून ही  अनेक जण प्रत्येक दिवशी रोजनिशी लिहीतच असतीलही संकल्पना घेऊन ज्योतिष अभ्यासक  किंवा साधारण या विषयाची माहिती असणा-यांसाठी एक नवीन गोष्ट सुचवतोय . आवडली तर अमलात आणा नाही आवडली तर सोडून द्या. यासाठी तुम्हाला  ३६५ पाने नसली तरी चालतील २७ पाने पुरतील.प्रत्येक पानावर एका नक्षत्राचे नाव लिहा  ( अश्विनी ते रेवती )आता जेव्हा आयुष्यात एखादी महत्वाची घटना सुरु कराल, किंवा घडली असेल  मग ती व्यावसायिक असू दे कौटूंबिक असू दे किंवा वय्यक्तिक यश अपयश  काही ही असू दे . ज्या गोष्टीची विशेष नोंद ठेवावी असं वाटेल अशी घटना   मग भले अगदी एकादा देवदर्शनाचा योग आला असू दे , परदेशात जायचा योग आला असू दे. , तुम्हाला जे महत्वाचे वाटते ते सर्वतर अशी कुठलीही घटना घडली की ती कुठल्या नक्षत्रावर घडली आहे  त्या नक्षत्राच्या पानावर ते लिहून ठेवायचे. (काही अडचणी आल्या असतील तर त्या लिहायच्या )आता ते नक्षत्र ( रास ) तुमच्या स्वतः: च्या पत्रिकेत कुठल्या भागात आहे  हे तुम्हाला माहीत असतेच .  यावरून तुमचा तुम्हालाच काही अभ्यास करता येईलउदा. उद्या  पुनर्वसू नक्षत्रावर ( पुनर्वसू नक्षत्रावर  - त्यातही मिथुन रास आणि कर्क रास  वर घटनांची वेगळी नोंद करून ठेवलेली असावी ) अमुक वाजे पर्यंत मिथुन रास आहे आणि काही महत्वाची मिटींग आहे तर , पुनर्वसू नक्षत्राचे आपण लिहिलेले पान  काढायचे.  त्या नक्षत्रावर आत्तापर्यत काय काय काम झाली आहेत / काय काय घटना घडल्या आहेत यावरून साधारण अंदाज घ्यायचा  ( कर्क / मिथुन रास तुमच्या पत्रिकेत  कुठल्या स्थानात आहे यावरूनही काही गोष्टी समजू शकतील )अर्थात एक विचार मांडलाय.मी अशी सुरवात केली आहे. अगदी फार छोट्या  गोष्टी लिहायची आवश्यकता नाही पण  महत्वाच्या गोष्टींची तरी नोंद ठेऊन बघायला काय जातंय ?मला वाटतंय पूर्वजांनी नक्षत्राबद्दल संपत, विपत, क्षेम,  प्रत्यर , साध्य , मैत्र हे जे लिहून ठेवली त्याचा अभ्यास या ' नक्षत्र दैनंदिनी ' मधून मिळू शकतो .शुभेच्छाअमोल केळकरa.kelkar9@gmail.comLoading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!