धर्मराज...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

तिच्या काळ्या पाठीवरचे सिग्रेटचे जांभळेकाळे व्रण तिला पाहायचे होतेकरकचून चावलेला मांसल दंडाच्या मागचा भाग बघायचा होता दात उमटलेलं कोवळं कानशील चाचपायचं होतंउपसून काढलेल्या डोक्यातल्या केसांच्या बटांना स्पर्शायचं होतंब्लीड झालेल्या पलंगाच्या कन्हण्याचा आवाज ऐकायचा होता. वळ उमटलेल्या गालाचा फोटो हवा होताबुक्की मारून फाटलेल्या ओठांचे रक्त पुसायचे होतेजांघेत आलेले वायगोळे मुठी वळून जिरवायचे होतेपिरगळलेल्या हातांची सोललेली त्वचा निरखायची होतीघासलेल्या टाचांच्या छिललेल्या कातड्यावर फुंकर मारायची होतीछातीवरच्या चाव्यांना जोजवायचं होतं थिजलेल्या अश्रूंचे कढ प्यायचे होते.या सर्वांची तिला असीम आस होती. आता ती जून झालीय, सरावलीय.आता तीच सिग्रेट पीतेधुराची नक्षी काढतेमांसल दंड ढिले झालेत,कानशीलाच्या निर्जीव पाळ्या लोंबतातआता ब्लीड होत नाहीपिशवी काढून टाकलीयती पक्की सराईत झालीय.गाल, ओठ, काया, टाचा, वक्ष सगळं बधीर झालंयइतकेच काय अश्रूही नुरले आताजांघेतले वायगोळे तिच्या मेंदूत आता पुरते विरघळलेतदशकांपूर्वी तिला इथं आणून विकणाऱ्या धर्मराजाच्या शोधात आहे मी...तोवर यल्लमेच्या पूजेत तिचेच सरण सजवावे  म्हणतो... - समीर गायकवाड.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!