धन्य धन्य हो

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

धन्य धन्य हो ...????????????खुप दिवस झाले मंडळी कुलदेवतेला गेलो नाही. एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन यायचंय तसंच शिर्डी ही करता येईल ना?   ते अंबेजोगाईला जायचे राहूनच जातय बघा. अशा प्रकारचे अनेक संवाद आपण वेळोवेळी ऐकत असतो. घरातील मंगल कार्य असेल, परंपरा असतील, किंवा श्रध्दा-भक्ती म्हणून असेल, प्रकट दिन-समाधी किंवा काही विशेष जत्रा, उत्सवाच्या निमित्याने वेळोवेळी आपण एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देत असतो.तिथे एकदा गेलो की अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. स्थानमहात्म्या प्रमाणे रांगेत लागणारा वेळ गृहीत धरून भक्त जेंव्हा आपल्या देव/देवतांचे मुख दर्शन घेतो तेंव्हा त्याला तिथे येण्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते.मंडळी, दर्शन घेतले,तीर्थ- प्रसाद घेतला, अंगारा लावला, इतरांसाठी पुडीत बांधून घेतला तरी एक गोष्ट केल्याशिवाय या सोहळ्याची ख-या अर्थाने सांगता झाली असे म्हणता येणार नाही ,जोपर्यत तिथे आपण त्या चैतन्यरुपी वास्तूस *प्रदक्षिणा* मारत नाही.*धन्य धन्य हो  प्रदक्षिणा सद्गुरु रायाची*...मंडळी, आज याच विषयावर मंथन. दर्शन झाले की आपण अगदी सहज प्रदक्षिणा मारतो. पण किती मोठं अध्यात्म यात दडलंय ना? आठवतीय स्पर्धा  बाल गणेश आणि कार्तिकी मधील? पृथ्वीला सगळ्यात पहिला प्रदक्षिणा कोण मारतो ही स्पर्धा आणि बाल गणेशाने शंकर-पार्वती अर्थात आई- बाबांना प्रदक्षिणा मारुन पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य तात्काळ प्राप्त केले. कुठल्याही देवळात आपण त्या देवतेला माऊली/ पालनकर्ता या नात्याने बघतो. तेंव्हा दर्शन झाल्यावर जेंव्हा आता प्रदक्षिणा माराल तेंव्हा ही फार मोठी कृती तुमच्याकडून होत आहे हे लक्षात असू दे. आता प्रदक्षिणा १,३,५,७,११,२१ किती मारायच्या हा ज्याचा त्याचा श्रध्देचा प्रश्ण. ( ज्यांना ' प्रश्न ' असे लिहावेसे वाटते त्यांनी असे लिहावे हरकत नाही)प्रत्येक देवस्थानातील/ देवळातील प्रदक्षिणा  मार्ग हा विशेष असतो.साक्षात डोंगररुपात स्थित गणपतीला प्रदक्षिणा घालण्याचा नैसर्गिक अनुभव ब-याच जणांनी गणपतीपुळेला घेतला असेलच.सांगलीच्या गणपती मंदीरात प्रदक्षिणा मारताना, तिथे दगडात असणाऱ्या कड्या वाजवून दर्शन घेण्याची प्रथा अनेक सांगलीकरांना परिचयाची असेल.कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळातील प्रदक्षिणा मार्ग म्हणजे भूयारातून जातोय का काय असे वाटायचे लहानपणी. थोडासा नागमोडी वळणदार मार्गावरुन जाताना केंव्हा बाहेर पडायचो ते कळायचेच नाही. नरसोबावाडीला छतावर अनेक धार्मिक चित्रे / कथा कोरलेल्या होत्या. लहानपणी वाडीला गेल्यावर काका-काकू कडून या गोष्टी सांगण्यात आल्या ज्या कायम मनात कोरल्या गेल्या.मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रदक्षिणा मार्ग समुद्र बघायला मिळायचा म्हणून आवडायचा.ही काही आठवलेली उदाहरणे. तुमची ही अशी खास उदाहरणे असू शकतात.प्रदक्षिणा आपण स्वत: वय्यक्तिक घातलेली एका देवळाच्या गाभाऱ्यापुरती असो, त्या देवाच्या पालखीची नगर प्रदक्षिणा असो किंवा नर्मदा परिक्रमा( प्रदक्षिणा ) सारखी व्यापक असो. याचे मोल पृथ्वी प्रदक्षिणे सारखेच.मेष ते मिन राशीतून मार्गक्रम करुन निरंतर प्रदक्षिणेच्या चक्रात अडकलेले चंद्र, रवि आणि इतर ग्रह हे ही कालचक्राच्या वाटेवरचे भक्तच.लेख संपवता संपवता , काही ठिकाणी प्रदक्षिणा संपल्यावर एक वेगळी वाट जी तुम्हाला देवस्थानाच्या छतावर घेऊन जाते जिथून तुम्हाला सरळगाभा-यातील मुर्तीचे दर्शन होते.नक्की मंदीर आठवत नाही पण बहुतेक चिंचवडचे गणपती मंदीर आणि हो हे मात्र नक्की आठवतयं हरिपूरचे संगमेश्वराचे मंदीर.चला जायचं संगमेश्वराला 'भक्ती संगमावर?अनायसे आज पहिला श्रावणी सोमवार पण आहे. ☺प्रदक्षिणा करुनी देह, भावे वाहिलाश्रीरंगात्मज विठ्ठल पुढे, उभा राहिला????५/८/१९kelkaramol.blogspot.inLoading...
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!