दिवाळीचा साहित्य फराळ

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

 नमस्कार मित्र मैत्रिणींनो ,माझा दिवाळीचा फराळ हा असा आहे:१ सामना दिवाळी अंकात ’चोरीचा मामला’ ही माझी हलकीफुलकी कथा आहे. २ प्रसाद दिवाळी अंकात पाचशे मैल ही गोर्डन वेन (Gordon Wayne) या युवकाच्या जीवनावर प्रेरणादायी कथा आहे.३ अनुराधा दिवाळी अंकात काटशह ही कथा नावाप्रमाणेच एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या काही प्राध्यापक आणि विद्यार्थीनीची आहे.४ मेहता ग्रंथ जगतच्या दिवाळी अंकात मांजर, नवरा आणि मुलं हा ललित लेख आहे. कोणाची, कुणाशी तुलना केलेली आहे हे लेख वाचलात तरच कळेल ५ माझा मराठीचा बोल (मामबो) या इ दिवाळी अंकात ती वही ही पती - पत्नी आणि त्यांच्या मित्राच्या वहीची हलकीफुलकी कथा आहे.६ बृहनमहाराष्ट्र वृत्तच्या दिवाळी अंकात दृष्टी ही कथा विद्यार्थी आणि शिक्षिकेच्या नात्याचे पदर उलगडणारी कथा आहे.७ अभिरुची दिवाळी अंकात त्सुनामी या आमच्या मांजराच्या आगमनाची, तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कथा म्हणजेच माझा ललित लेख आहे.यातले मामबो आणि बृहनमहाराष्ट्र वृत्त आंतरजालावर वाचण्यासाठी हा दुवा - मामबो - https://www.mazamarathichabol.org/ (इथे गेल्या चारवर्षांचे दिवाळी अंक वाचता येतील)बृहनमहाराष्ट्र वृत्त - https://bit.ly/3kvwbENवाचा आणि अभिप्रायही कळवा ही विनंती.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!