तुझं माझं एक स्वप्न........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

एखाद्या पिक्चर मध्ये शोभेल अशी यांची स्टोरी.......तो एका गावातला साधासुधा ग्रॅज्युएट मुलगा, आणि ती, ती कोण ते नंतरच सांगते.तर हा रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यामधला गोरेगाव येथील मुलगा आपली चांगली नोकरी सोडून स्वयंसेवी संस्थेतर्फे खेड्यापड्यातली हृदयरोगी मुलं शोधून त्यांच्यावर इलाज करायला मुंबईला घेऊन यायचं काम करत होता. नुसतं शोधायचं नाही तर त्यांच्या आईवडिलांना पूर्णपणे मार्गदर्शन करण्यापासून ते मुंबईला नेल्यावर त्यांची पूर्ण प्राथमिक तपासणी करून ते ऑपरेशन होईपर्यंत, त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था बघायचं काम करायचा. त्या आजाराचा पूर्ण खर्च त्यांची स्वयंसेवी संस्था करत होती. सहज म्हणून करता करता त्याला ते काम प्रचंड आवडायला लागलं. इतकं की तो स्वतःला अगदी झोकून देऊ लागला. आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक अपंग मुलाला लवकरात चांगले उपचार मिळावेत, हेच काय ते त्याच्या जीवनाचं ध्येय बनलं.त्यासाठी त्याचं नेहमीच मुंबई ते गोरेगाव येणं जाणं असायचं.अशातच मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला 'ती' भेटली. तिला त्याची झोकून देण्याची वृत्ती प्रचंड आवडली. त्याची लहान मुलांना पुढे जाऊन चांगलं आयुष्य जगायला मिळावं, यासाठी वाटणारी तळमळ तिच्या मनाला भावली. असा जीवनसाथी असावा, हे तिच्या मनाने धरलं. तोपर्यंत त्याला ती हॉस्पिटलमध्ये काम करणारी कोणी वाटली होती. मग जास्त ओळख झाल्यावर तिने सांगितलं की ती एक थेरपिस्ट आहे. त्यावेळी त्याला थेरपिस्ट म्हणजे नक्की काय हे ही नीटसं माहीत नव्हतं. तरीही त्याला तिच्याबरोबर लग्नाचा विचार योग्य वाटत नव्हता. त्याला वाटायचं, कुठे मी खेड्यातला मुलगा, आणि कुठे ती मुंबईसारख्या शहरातली मुलगी. कुठेच काही मेळ नाही.पण त्यांचं एकत्र येणं विधिलिखितच होतं!!ते एकत्र आलेच, दोन्ही घरातला विरोध झुगारून त्यांनी लग्न केलं. आणि लग्न झाल्यावर मात्र त्याला आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा तिने सांगितलं मी डॉक्टर आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हो, तिची डिग्री होती M.O.TH, OTR - Master of Occupational Therapy.याला भेटण्याआगोदर ती अमेरिकेची लायसन्स परीक्षा क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करत होती. ती पुढे क्लिअर झालीही. तिचं ठरलेलं होतं, तीन वर्षासाठी अमेरिकेला जायचं. तिथे नोकरी करायची. पण बहुतेक तसं होणार नव्हतं. लहान मुलांसाठी काम करता करता त्याच्या मनात आपल्या जिल्ह्यातील सर्वच अपंग मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का, याबद्दल विचारमंथन सुरू झालं.त्याचा सगळा जीव लहान मुलांमध्ये गुंतला होता. त्याच्या डोळ्यासमोर खेड्यापाड्यातली ती अपंग लहान मुलंच असायची सतत.........जी त्याने आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये खूप पाहिलेली.डोक्यात सतत तेच विचार असायचे त्याच्या, नक्की काय करता येईल त्यांच्यासाठी. त्याच काळात 'ऑक्युपेशनल थेरपिस्ट' म्हणजे नेमकं काय हे तिच्याकडून समजून घेता घेता त्याला लक्षात आलं, आपल्याला जे हवं होतं ते तर आपल्या समोरच आहे. आपण जे लहान मुलांत अपंगत्व बघितलं, त्याच्यावर हिच चांगला इलाज करू शकते. मग त्याने हिलाच रिक्वेस्ट केली, माझ्या गावात येऊन तू या लहान मुलांना उपचार देवू शकते का?तिनेही अगदी सहज 'हो' म्हटलं.मान न पकडणारी मुलं, योग्य वेळेत पलटी न मारणारी मुलं, मतिमंद मुलं, वर्षादिड वर्षापर्यंत उभं न राहणारी मुलं, ऑटिझमच्या समस्या असलेलं मुल ह्या सगळ्यांना ऑक्युपेशनल थेरपीद्वारे उपचार करून लवकरात लवकर बरं करणं शक्य आहे. इतकंच नाही तर लहानांबरोबर मोठ्यांनाही ज्यांना पॅरेलिसिस, संधिवात, हात- पाय मोडलेले पेंशट, कोमामधून बाहेर आलेले पेशंट या सगळ्यांवर ऑक्युपेशनल थेरपीद्वारे खात्रीलायक उपचार शक्य आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  ऑक्युपेशनल थेरपीस्ट  लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे शारीरिक मानसिक आणि  शैक्षणिक विषय किंवा दैनंदिन जीवनाविषयी कोणत्याही प्रकारच्या समस्या असो त्याचे निवारण करून त्यांना त्यांच्या आयुष्यात पूर्ववत आणतो. पण दुर्दैवाने असा कोणी स्पेशालिस्ट असतो, हेच बऱ्याच पालकांंना माहीत नसतं. त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये कोणत्याही आजारामुळे त्यांचे दैनंदिन जीवन थांबले असेल त्यावर उपचार करून त्यांना कामात आणि जीवनात पूर्ववत आणण्याचं काम ऑक्युपेशनल थेरपीस्ट करतो.त्याला वाटलं हिची आपल्या गावात जास्त गरज आहे. म्हणून दोघांनीही सहा महिने बघू म्हणून थेरपी सेंटर सुरू केलं. त्याचा त्याने गावागावात जाऊन प्रचार केला. असे थेरपिस्ट मुंबई पुण्यासारख्या शहरात खूप असतात, पण गावामध्ये  ती सुविधा नसते. त्यांना शहरातच पळावं लागतं. एकतर आपल्या मुलांना हे होतंय हेच गावातल्या बऱ्याच पालकांना कळत नाही. त्यांना ते दाखवून द्यावं लागतं. तरीही त्यावर उपचार करून काही होईल, यासाठी त्यांचं मन राजी नसतं. या सगळ्या शक्यता अशक्यतांचा विचार करून अमेरिकेत जायच्या आपल्या इच्छेला पुढे ढकलून आपल्या नवऱ्याची साथ द्यायचं तिने ठरवलं.त्याने पत्रकं छापली, जमता जमेल तेवढा प्रसार केला, अंगणवाडी सेविकांना, शाळांमध्ये, अगदी घराघरात जाऊन पत्रकं वाटली. आपल्या जवळच उपचार आलाय. सुरुवातीला मोफत उपचार देतो, पण मुलाला घेऊन या, इतकं सांगूनही पूर्ण रायगड जिल्ह्यातल्या सर्वांचाच हवा तेवढा प्रतिसाद अजूनही मिळत नाहीये त्यांना. खरंतर पनवेल सोडून संपूर्ण रायगड जिल्ह्यात असं उपचार केंद्र नाही, जिथे तुम्ही त्वरीत संपर्क साधला, तर वेळ जाण्याआधी तुमचं मुलं पूर्ण उपचाराने बरं होऊ शकतं.लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक अपंगत्वावर जेवढ्या लवकर उपचार होतील, तेवढं त्यांचं पुढचं आयुष्य सुकर बनतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  आता त्याच्याबरोबर तिलाही तशी मुलं दिसतात, तिचा जीव हळहळतो, यांना उपचार केला तर सावरतील ही मुलं, असं तिला वाटतं. पण तिथल्या बऱ्याच पालकांना या उपचारांची माहिती नसल्याने आणि सांगून पटत नसल्याने एकतर ते सगळीकडे वेळ घालवून येतात, किंवा लगेच पोरगं धावणार असेल तर ठिक, नाहीतर काही नको असली थेरपी असं म्हणतात. दोघांचही ध्येय पैसे कमावणं नसल्याने, त्यांच्या सेंटरमध्ये कमी पैशातच उपचार होतात. किंवा समोरच्याची परिस्थिती पाहून मोफतही. कुठूनतरी लोकांमध्ये हा अवेअरनेस वाढवा, एवढीच दोघांचीही इच्छा आहे. त्याला वाटतं, एवढी शिकलेली माझी बायको अमेरिकेत, कॅनडामध्ये सहज संधी उपलब्ध असताना, स्वतःची स्वप्नं सोडून या माझ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी माझ्याबरोबर आलीये, तर त्याचा लाभ जास्तीत जास्त जणांनी घ्यावा. यातला तो आहे, संतोष कोमटी आणि ती आहे डॉक्टर विद्या देपगुंडे. माझ्या एका कथेवर संतोष यांनी दिलेल्या कमेंटमुळे, मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा झाली आणि मी जाणलेलं सारं आज तुमच्यापुढे मांडलं आहे.संतोष कोमटी यांना खूप तळमळीने वाटतं, अपंग मुलं मार्गी लागावीत. त्या संस्थेतून बाहेर पडले तरीही आजही कोणी त्यांना मदतीसाठी हाक दिली, तर लागेल तेवढी सगळी मदत करतात, मुंबईतही अगदी त्यांना मोफत उपचार मिळवून देतात. त्यांच्या पत्नीनेही त्यांना खंबीरपणे साथ दिलीये, पण ते मात्र लोकांच्या सहकार्याची वाट बघतायत, त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची वाट बघतायत, पालकांनी लवकरात लवकर जागं होण्याची वाट बघतायत, आपल्याच जिल्ह्यातल्या लोकांनी संपूर्ण विश्वासाने त्यांच्या अपंग मुलांचं जीवन सुरळीत करण्यासाठी, आपल्या अनुभवी आणि उच्च शिक्षित डॉक्टर पत्नीच्या हातात सोपवायची वाट बघातायत.........जमलं तर त्यांंच्या HRC Raigad  या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या !!डॉक्टर विद्या यांंनी या संदर्भातली माहिती विस्तृतपणे सगळीकडे पोहोचावी यासाठी मराठीतून व्हिडीओ तयार करण्याचं कामही सुरू केलं आहे. त्या  महाराष्ट्रातल्या पहिल्याच डॉक्टर आहेत अशा, ज्यांनी यासाठी स्वतःहून पुढाकार घेतलाय. त्यांचे व्हिडीओ तुम्हाला HRC Raigad या पेजवर लवकरच पहायला मिळतील.©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. डॉक्टर विद्या मुलांवर उपचार करताना.......
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!