ती तिच्या नशीबाची.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

पूर्वा आणि नेहा या गावातल्या शिदेकाकूंच्या दोन मुली.म्हणजे बघणाऱ्यालाही असं वाटायचं, आणि शिंदेकाकूहीसर्वांंना दोघी माझ्या मुली म्हणूनच सांगायच्या. पण हे सगळं तोंडदेखलं होतं. घरी मात्र काही वेगळंच असायचं. घरी लाड व्हायचे पूर्वाचे आणि नेहाला मात्र टोचलं जायचं. घरातली सगळी कामं नेहाला करायला लागायची. आणि पूर्वाला मात्र सर्व करायला भरपूर वेळ मिळायचा. विशेषतः अभ्यास. पूर्वा हिच शिंदेकाकूंची मुलगी होती, आणि नेहा काकांच्या बहिणीची. नेहाचे वडील गेले, तेव्हा नेहा पाच वर्षांची होती. दोन वर्षाने मोठा भाऊ होता. त्यांच्या घरची परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे काकांनी नेहाला आपल्याकडे ठेवायचे ठरवले. तेवढाच बहिणीला हातभार म्हणून. आपल्या पूर्वाशी खेळायला होईल आणि दोघी बरोबरीने वाढतीलही म्हणून.नेहा लहान होती तेव्हा शिंदेकाकू तिचं सर्व पूर्वासारखच आवडीने करायच्या. पण मुली मोठ्या व्हायला लागल्या तसा का कोणास ठाऊक काकूंच्या मनात मत्सर येऊ लागला.पूर्वाचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी तिला अगदी काटेकोरपणे अभ्यास करायला लावत, आणि नेहाला मात्र सतत त्यांच्या हाताखाली काम करायला लावत. नेहा तेवढी हुशार नव्हती, पण तिलाही वाटे अभ्यास करावा. सुट्टीत आईकडे जायची तेव्हा ती आईला सांगायची मला इथेच राहायचय तुझ्या जवळ, पण आईही तिला ठेवायची नाही. तिला वाटायचं, भावाकडे राहूनच हिचं भलं होईल. ती चांगली शिकेल, तिला चांगलं वळण लागेल. आपला भाऊ तिला अगदी पोरीसारखं बघेल. भावाला लाख वाटायचं, पण त्याचं आपल्या बायकोपूढे काही चालायचं नाही. त्याच्या मनात नेहाबद्दल माया होती. तशा शिंदेकाकूही काकांसमोर तेवढं वाईट वागायच्याही नाहीत तिच्याशी. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); पुढे काही वर्षांनी दोघी मोठ्या झाल्या. शिंदेकाकूंची मुलगी पूर्वा चांगली शिकून इंजिनिअर झाली. नेहा मात्र बारावीपर्यत कशीबशी शिकली आणि कुठेतरी साधी नोकरी करू लागली.दोघींना स्थळं शोधताना देखील शिंदेकाकूंच्या मनात मत्सर येत होताच.डावं- उजवं करणं चालू होतच.अर्थातच पूर्वासाठी तिच्या शिक्षणामुळे शिंदेकाकूंना तेवढयाच तोलामोलाचं घर अपेक्षित होतं. बरीचशी शोधाशोध केल्यावर त्यांना तसं मिळालही. एकुलती एक लाडाची मुलगी म्हणून शिंदेकाकूंनी मोठा गाजावाजा करून तिचं लग्न लावून दिलं.नेहालाही हौस होती, पण परिस्थितीमूळे तिला प्रत्येक ठिकाणी ती मारावी लागत होती. तिच्या लग्नासाठी कुणाच्याच फारशा काही अपेक्षा नव्हत्या. ना काका काकूंच्या होत्या, ना तिच्या गरिबीमुळे तिच्या आईच्या होत्या.त्यातल्या त्यात बऱ्या ठिकाणी नोकरीला असलेला मुलगा तिच्यासाठी शोधला आणि साधासा सोहळा करून तिला उजवून टाकली.शिंदेकाकूंना वाटलं चला, आपल्या मुलीच्या जीवनाचं भलं झालं. पहिल्यापासून त्यांच्या मनात असायचंही तेच. आपल्या पोरीचं भलं व्हावं.......पण लग्न झालं आणि दोघींच्या नशिबाने पलटी मारली.झोकात लग्न करून दिलेली पूर्वा एक वर्ष व्हायच्या आतच माहेरी निघून आली. तिचा नवरा लग्नानंतर सतत आजारी असायचा. लग्नाच्या अगोदरपासूनच त्याच्यावर ट्रिटमेंट चालू होती. त्याच्या आजाराला कंटाळूनच तिने त्याला सोडून दिलं. नव्या नवरीचं नवेपण तिला अनुभवता आलंच नाही. संसारसुख काही तिला मिळालच नाही. मुलाच्या घरच्यांनी यांची फसवणुक केली होती. शिक्षण होतं, दिसायलाही चांगला म्हणून खास करून शिंदेकाकूच भुलल्या होत्या. जास्त खोलात कुणी चौकशी केलीच नाही.इकडे नेहाचं मात्र सगळं सुरळीत सुरू होतं. नवरा आणि ती त्याच्या नोकरीच्या ठिकाणी दोघेच राहत असल्याने तिच्या डोक्यावर कोणीच नव्हतं. तिच राणी होती घराची. नवराही प्रेमळ असल्याने पहिल्यांदा असं झालं होतं की तिची मर्जी कोणीतरी राखत होतं. सासु सासरे गावी असत, अधूनमधून येत, पण नेहाचा ऍडजस्ट करायचा स्वभाव, जो तिच्या अंगवळणीच पडला होता आणि काम करायची पद्धत बघून सासू तिच्यावर खूषच असायची. पुढे दोन वर्षानंतर लग्नाच्या वेळी बऱ्यापैकी नोकरीत असणाऱ्या नवऱ्याला खूप प्रयत्न करून का होईना सरकारी नोकरी लागली. तो शिकलेला तर होताच चांगला. पुढच्या पाच वर्षात चौकोनी संसारही झाला. लग्नाच्या वेळी नेहाच वय चोवीस होतं, दोन तप गेले तेव्हा कुठे तिच्या नशिबी सगळ्या बाजूने सुख आलं, आणि कायम तिच्याजवळ राहिलही. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); शिंदेकाकूंच्या मुलीची तर पुन्हा लग्न करण्याची इच्छाच उडाली, त्या खूप मागे लागल्या होत्या तिच्या, रडूनही झालं खूप वेळा तिच्यासमोर; पण तिने दुसऱ्या लग्नासाठी होकार दिलाच नाही.ती तशीच राहिली.किती आटापिटा केला होता आपल्या जीवाचा शिंदेकाकूंनी आपल्या पोरीचं सगळं चांगलं होण्यासाठी!! पण जी डोळ्यात सलली, जिचं कुणी काही बघितलं नाही, तिचं मात्र अनपेक्षितपणे सगळं सगळं चांगल झालं!!काय वाटत असेल ना, शिंदेकाकूंना प्रत्येकवेळी तिच्याकडे बघून? तिचं चांगलं चाललंय ऐकून!!म्हणतात ना, कोणी किती काहीही करा, जे ज्याच्या नशिबात ते त्याच्या पुढ्यात, हो की नाही??©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!