ती आणि तिच्या प्रायोरिटीज.........

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

अगं जरा भजी कर ना, चमचमीत काहीतरी खावसं वाटतंय!!तो हे बोलला, आणि इकडे प्राजक्ताची मनातल्या मनात धुसपुस सुरू झाली.व्वा, नुसतं ऑफिसचं काम करून ऑर्डरी बऱ्या सुटतायत.ह्यांना भजी करून घाला, मग जेवणात काय तर पालक पनीर करा, नाहीतर आलू मटर किंवा छोले करा, डिमांड संपत नाहीतच.सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत यांचे बसल्याजागी सर्व चोचले पुरवा, आणि नोकरीही करा.करा आणि फक्त करतच रहा. तरी दिसतं याला डोळ्यासमोर सगळं, कशी धावपळ होते माझी, किती शिणून जाते मी, तरी हे कर ते कर कसं बोलावं वाटतं?काही करणार नाही मी भजी बिजी......!!वर्क फ्रॉम होम दोघांचंही आहे ना? ह्याला काम करताना डिस्टर्बन्स् नको, आणि मी काम करताना, दोन्ही पोरं माझ्या हातापायाशी. एक लॅपटॉपवर बटणं दाबत काय बसेल अन् एक मोबाईल दे म्हणून डोक्याशी भुणभुणत काय बसेल, कधी दोघांची भांडण सोडवा तर कधी, शी-शुचे कार्यक्रम पार पाडा. हयाला कधी बोलावलं तर नेहमी हयाचं काहीतरी अतिमहत्वाचं काम सुरू........माझं काम काय काम नाही का?? बरं सासूबाईंना बोलवावं तर त्याच एक वेगळंच, आता पोरांना सांभाळणं झेपत नाही म्हणे. मी तरी किती गोष्टी डोक्यात ठेवायच्या, ह्याच्या तर ऑफिसच्या कामाशिवाय एक गोष्ट लक्षात राहत नाही.प्राजक्ताची नुसती चिडचिड चिडचिड होत होती. घरातून घरातलं सर्व सांभाळत, ऑफिसचं काम करणं म्हणजे जणू एखाद्या दिव्यातून जाणं असं वाटत होतं तिला. तिची मुलं लहान होती, त्यांना काही कळण्याचं वय नव्हतं. एक चार वर्षाचा तर एक सहा. त्यांना सतत तिच्या आजूबाजूलाच राहायला आवडायचं. तो काम करताना त्याच्या जवळ गेली तर तो खेकसायचा, त्याची भीती वाटायची मुलांना. पण आईची मात्र नाही, ती खेकसली तर पोरं तिला आणखीन त्रास दयायची. पोरांनाही बापाचं काम म्हणजे काम वाटायचं कारण तो अगदी विदाऊट डिस्टर्बन्स करत असायचा ना!! आणि हिला मात्र कितीही महत्वाच्या कामातून घरातलं काही न काही बघायला उठावंच लागायचंच. पोरं सारखी काही न काही मागत बसायची तिच्याकडे. दोघांनी काम करणं त्यांना रुचायचं नाही. थोड्या वेळ एकमेकांशी खेळली की हिच्या मागे लागायची, तू आमच्याशी खेळ म्हणून.हिला प्रचंड इरिटेट व्हायचं, त्याला किती व्यवस्थित काम करायला मिळतंय, आणि माझं काम हे असं चाललंय. ते फ्रस्ट्रेशन बरेचदा मुलांवरही निघायचं. तिला खूप वाईट वाटायचं, राग मुलांवर नसायचा खरंतर त्याच्यावर असायचा, जो फक्त स्वतःच्या कामाला काम समजायचा. आणि हिने सर्व संभाळूनच काम केलं पाहिजे हे त्याने स्वतःची सोय म्हणून गृहीतच धरून टाकलं होतं. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हळूहळू या सगळ्याचा तिला प्रचंड मानसिक तणाव येऊ लागला. तिचंही ध्येय होतं काहीतरी, पण या सगळ्यात तिला नीट कॉन्सन्ट्रेट करताच येत नव्हतं.त्याला सांगितलं तर तुझं तू मॅनेज कर, सर्व करतात तुला जमत नाही, तुझा प्रॉब्लेम आहे म्हणून तो मोकळा व्हायचा.रोज रात्री तिला दिवसभराचं आठवून खूप रडायला यायचं.भजी तर तिने केलीच नाहीत त्या दिवशी. पण जेवणालाही खिचडीच टाकली, वीट आला होता तिला सारखं काहीतरी करतच राहण्याचा.रात्री झोपताना प्राजक्ताच्या मनात परत विचार सुरू झाले, पुन्हा रडू येऊ लागलं, अन्  रडता रडता अचानक तिच्या वाटलं, का करतेय मी हे सगळं जर मला एवढा त्रास होतोय तर? माझं मानसिक स्वास्थ्य किती बिघडत चाललंय या सगळ्याने?हो काम करणं माझी मानसिक गरज आहे, पण त्यासाठी उत्साहवर्धक वातावरण तर असलं पाहिजे, नुसती चिडचिड करत आवडती गोष्ट करण्याचा तरी काय फायदा?आणि मी माझ्या दृष्टिकोनातून विचार करतेय फक्त, मुलांंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यांचं बरोबरच आहे.कामाला बाहेर पडायचे तेव्हा जायचेच ना दोघेही    गुपचूप पाळणाघरात. आता आई-बाबा दोघे समोर आहेत, पण आपल्याशी खेळत नाहीत, बोलत नाहीत, म्हटल्यावर त्यांनी तरी काय करावं? त्यांना काही नकोय, ते काही मागतही नाहीयेत, आपल्यालाच त्यांना सर्वकाही द्यायचंय म्हणून ही सगळी धावपळ. पण खरंतर त्यांना आपला वेळच हवाय फक्त, आणि आपण तोच देत नाही.खेळतं वय त्यांचं, ते त्यांच्या वयाप्रमाणे सर्व करतायत, आणि कितीही नाही म्हटलं तरी माझी सर्वात जास्त चिडचिड त्यांच्यावरच होतीये.एवढं महत्वाचं आहे का काम आपल्यासाठी, आपल्या पोरांपेक्षा जास्त? तो तर असा काही विचार करणारच नाही. आणि त्याने नाही केला, म्हणून मी पण न करणं चुकीचच. पोरं काय आठवतील मोठं झाल्यावर, माझं हे असं वागणं?मी खरंच थांबते आता थोडं!! पैसा एवढाही महत्वाचा नाही मला. माझ्या मानसिक स्वास्थापेक्षा आणि माझ्या पोरांच्या आनंदापेक्षा तर नक्कीच नाही. माझं करियर काय मी थोडी थांबले तर वेस्ट होणार नाही लगेच.माझ्या जिद्दीने मी कधीही भरारी घेऊ शकेन!!मनाशी पक्कं ठरवूनच ती निश्चिंंत मनाने झोपी गेली.दुसऱ्या दिवशी सकाळीच प्राजक्ताने कंपनीत मेल करून टाकला, अजून एक पंधरा दिवस तिला हँडओव्हर करण्यासाठी काम करावं लागणार होतं. बस्स त्यानंतर ती तिच्या लाडक्यांसाठी फ्री होणार होती. मुलं उठल्यावर त्यांना जवळ घेऊन तिने सांगितलं तर, पोरं आनंदाने उड्याच मारायला लागली. वॉव मम्मी, तू आता ऑफिसचं काम नाही करणार, आमच्याबरोबर खेळणार, कित्ती मज्जा!पोरांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून तिच्या डोळ्यात पाणी भरलं. मनात आलं, सारी दुनिया एकीकडे आणि माझ्या या दोन छकुल्यांंचा आनंद एकीकडे!!तिचं काम करणं तसंही त्याच्या खिजगणतीत नव्हतंच, त्यामुळे ते सोडलंय हे आवर्जून त्याला सांगावं असं तिला अजिबात वाटलं नाही.........आणि तसाही तिने तिच्या प्रायोरिटीजचा सिक्वेन्स चेंज करून टाकला होता, आणि त्यात त्याचा नंबर आता शेवटचा ठेवला होता .........!!फोटो साभार: गुगल©️स्नेहल अखिला अन्वितकथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा....... (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!