ताईच तेवढी तुमची लाडकी..........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

ताईच तुझी जास्त लाडकी, तिलाच जवळ घेतेस सारखी, मी नाही बोलणार तुझ्याशी, जा.????माझ्या पोराकडून असा काही डायलॉग कधी ऐकायला मिळेल असं मला कधीssच वाटलं नव्हतं!!????पण जेव्हा त्याने तो मारला, तेव्हा मला आणि त्याच्या ताईला हसू आवरेनासं झालं. लहान भावंडं एक नंबरची जळकुंडी असतात, हा ही त्यातलाच. कळायला लागल्यापासूनच ती माझ्या जरा जवळ आली की याला खालीवर व्हायला लागायचं, अजूनही होतच. आम्ही एकमेकींना मिठ्या मारायला लागलो, की हा व्हिलन सारखा मधे घुसून आम्हाला जुदाss करून टाकतो.आणि हाच वर तोंड करून बोलतो तू ताईचे जास्त लाड करतेस?? तिला तू काही बोलत नाहीस, मलाच सारखी ओरडतेस.पोराकडून ऐकलं हसायला आलं, पण हेच मुलीकडून ऐकलं असतं ना तर नक्कीच मला खूप रडायला आलं असतं. तो आल्यापासून मला धाकधूक असायची, मुलगी असं कधी म्हणणार तर नाही ना?? तू त्याच्याकडेच लक्ष देतेस, तोच तुझा आवडता, वगैरे वगैरे.त्यावेळी नुकतंच ओळखीच्यातलं उदाहरण देखील ऐकलेलं. लहान बाळ आलं म्हणून पहिलं मुल डॉक्टरांना कन्सल्ट करायला लागावं एवढं विचित्र वागू लागलं. मला मनात सतत भीती वाटत रहायची.तसं तो यायच्या आधी तिला सगळं नीट समजावलेलं. पण खरी परीक्षा तो आल्यावरच सुरू होणार होती.......मी माझ्या परीने तिचं मन जपायचा प्रयत्न करत करतच, तिचा हात धरूनच त्याला वाढवत होते.पण वाटतं तेवढं सहज सगळं घडतच असं नाही, कधी चिडचिडही व्हायची, तिचीही आणि माझीही.कितीही म्हटलं तरी तारांबळ उडतेच ना? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); तसे तर दोघेही माझेच दोन जीव, फरक फक्त लहान मोठयाचा. पण त्यावेळी तोही फारसा जाणवू न देता पुढे जायचं होतं. तिने असं कधी म्हटलं, तर त्यावर काय बोलायचं याची सारखी प्रॅक्टिस सुरू असायची माझ्या मनात. बोलायला जमलंच नसतं म्हणा, ऐकूनच जीवाचं पाणी पाणी झालं असतं.पण पोरगी असं कधी बोललीच नाही. आपला ट्रॅक बरोबर असावा, असं वाटून मलाही मग कॉन्फिडन्स आला दोघांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने हँडल करायचा. ते कठीण दिवस सरले एकदाचे. ज्याची भीती होती ते घडलंच नाही.अन् आता काय तर, हा पाच वर्षांचा बिरमुटलाच फ्रस्टेट होऊन बोलतो, तू फक्त तिचीच, माझी नाहीस. जा तिलाच घेऊन बस.बरं त्याच्या आज्ञेचं पालन करून तिला जवळ घ्यायला जावं तर याला दुःखाचा पहाड कोसळल्यासारखं वाटतं.  आणि त्याचं सांत्वन करायला जावं तर, जा तुझ्या ताईकडे जा, असं म्हणत मला धुत्कारत बसतो.करावं तर नक्की काय करावं??????तशी त्याचीही लाडाची आहे बरं का ताई, जरा कोणी तिला ओरडलं की लगेच तिचा कैवारी असल्यासारखा धावत येऊन ओरडणाऱ्यांशी फाईट सुरू करतो. तिला फटका मारला कधी तर समोरच्यावर धू धू धुवायच्या आवेशात आक्रमण करतो. एखाद्या बॉडीगार्ड सारखा तिला सदैव प्रोटेक्ट करत असतो.????पण याला ओरडलं की नेहमी मात्र पलटी मारून एकच रडगाणं सुरू करतो; तुम्ही ताई अशी वागली की तिला काहीच बोलत नाही, मला मात्र बघावं तेव्हा ओरडत असता !!????बरेचदा अगदी प्रसंगासहीत वर्णन करतो.......ताईने त्या दिवशी पाणी सांडलं तर तिला तुम्ही काहीच बोलला नाहीत, ( खरंतर बोललेलो असतो, पण त्याला त्याच्या सोयीनुसार आठवत नसतं.) मला मात्र उगीच ओरडता?ताईने त्या दिवशी दरवाजा आपटला तिला काहीच नाही ओरडलात ( कधी? ते फक्त त्यालाच माहिती असतं), मी आपटला तर तुम्हाला तेवढा राग येतो.ताईला पाहिजे ते सगळं देता, मला काहीच देत नाही. तिला बरोबर आवडतं चॉकलेट आणता, मला कधी आणत नाहीच. (आता कुठले आईबाप असं पाप करतील सांगा????)थोडक्यात त्याला कशावरूनही ओरडलं की त्याच्या लाडाच्या ताईला मध्ये आणतोच!! आणि ठरलेला त्याचा डायलॉग उगाच आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायला मारतोच, ताईच तेवढी तुमची लाडकी, मी काही तुम्हाला आवडत नाहीच.????सांगा आता हे तिरपांगडं प्रकरण हँडल करायचं तरी कसं........!! तुम्हीही कोणी अनुभवलंय का हो असं.........??फोटो साभार: गुगल©️स्नेहल अखिला अन्वितकथा आवडल्यास माझ्या 'हल्ला गुल्ला' या फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा........ (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!