तनुजा - ये दिल तुम बिन कही लगता नही ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

सोबतचा फोटो अभिनेत्री तनुजा यांचा आहे, त्यांची कन्या अभिनेत्री काजोल हीने तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जगात कुणी अशी व्यक्ती नसेल जिला आई नकोशी वाटत असेल, सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही हे गृहीतक लागू पडतं. आपली आई आपल्या डोळ्यापुढं असावी, आपण तिची सेवा करावी. तिला काय हवं काय नको याची वास्तपुस्त व्हावी. तिची बडदास्त ठेवली जावी असं प्रत्येकास वाटतंच. याला अपवाद असणारे मानवतेच्या परिघाबाहेरचेच ठरतात. आपल्या उत्तम अभिनयशैलीमुळे कधी काळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा काही दिवसापूर्वी गंभीर आजारी होत्या. पोटदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.यावेळी त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. तनुजा घरी परतल्यानंतर अभिनेत्री काजोलनं त्यांचा हा फोटो शेअर केलाय. या फोटोत त्या प्रचंड थकलेल्या दिसत असून त्यांना ओळखणंही कठीण झालंय..फोटोत तनुजा प्रचंड अशक्त झाल्याचं दिसतं. तरीही, आजारपणामुळे त्रस्त असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य झळकतेय. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीय असं म्हणण्यास हरकत नाही. कदाचित मायलेकीच्या बॉण्डींगचीही ही किमया असू शकते....आपला आणि बॉलीवूडमधल्या या लोकांचा अर्थाअर्थी कधीही थेट संबंध येत नसतो. तरीही चंदेरी दुनियेतलं कुणी आजारी पडलं वा अत्यवस्थ झालं की आपण कावरे बावरे होतो. यालाही एक कारण आहे. वयाच्या विविध अस्वस्थेत आपल्या मनातल्या भावभावनांची पुष्पवेल बहरण्यात या लोकांचा वाटा मोठा असतो. प्रेमापासून ते विरहापर्यंतच्या विविध भावछटा आपण त्यांच्यासोबत अनुभवलेल्या असतात. आपल्या तारुण्यसुलभ भावना बऱ्याचदा त्यांच्या फिल्मी कारकिर्दीशी निगडीत असतात. कित्येकदा त्यांच्यात आपण कुणाला तरी शोधलेलं असतं. त्यांचं आपलं कसलंही नातं नसलं तरी त्यांच्याबद्दल विशिष्ठ भावना आपल्या मनात रूजलेल्या असतात. त्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या सुखदुःखात आपण आपल्या नकळत सामील होत असतो. त्यांची लखलखती दुनिया आणि आपलं रटाळ सामान्य विश्व यात कोणताही मेळ बसत नसूनही आपण त्यांच्यासाठी हळवे होत जातो त्याची पार्श्वभूमी ही अशी रंजक आहे.जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी न कधी मृत्यूमुखी पडणार आहे, त्याला कुणीच अपवाद नाही. कुणी किती मोठा असला तरी मृत्यू त्याला चुकला नाही, किंबहुना मृत्यू हेच जगातलं सर्व मोठं सत्य आहे. शैशव, तारुण्य आणि वार्धक्य या टप्प्यातून आयुष्य पुढे जात राहतं आणि एके दिवशी श्वास थांबतात. आज तनुजा थकल्या असल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सुखावह वाटतो, त्यांचं जगणं त्यांच्या निकटवर्तीयाना उर्जा देणारं असेल. काजोलच्या आईची एक्झिट जेंव्हा कधी होईल तेंव्हा ती हसत खेळत असताना, चालती बोलती असताना आणि जगण्याची उर्मी संपल्यावरच व्हावी... व्यक्तीशः मला तनुजावर चित्रित केलेलं किशोरदांच्या आवाजातलं "ओ मेरे दिल के चैन.. " हे गाणं खूप आवडतं. १९७२ मध्ये आलेल्या 'मेरे जीवनसाथी' मधलं हे गीत आजही श्रवणीय आहे. हे गाणं पाहताना तेंव्हाच्या तनुजात आपल्या प्रेयसीला पाहणाऱ्या अनेक जणांचा काळजाचा ठोका चुकला असेल. या चित्रपटात राजेशखन्ना कमालीचा देखणा दिसतो. या दोघांची जोडीही सुंदर दिसली होती. मजरूह सुल्तानपुरी आणि आरडी यांचं कॉम्बीनेशन तेंव्हा जोरात होतं. किशोरदा आणि राजेशखन्ना यांचं ट्युनिंग अफाट होतं... तनुजा आणि धर्मेंद्र अभिनित 'इज्जत' या १९६८ मध्ये आलेल्या चित्रपटातलं 'ये दिल तुम बिन कही लगता नही हम क्या करे .... " हे रफी आणि लता यांच्या आवाजातलं युगल गीत अगदी खास होतं. हे आशयघन गीत वेगळ्या अर्थाने भारी होतं. हे गाणं लिहिलं होतं साहीर लुधियानवी यांनी. साहीरला मुंबईत येऊन काही वर्षे लोटली होती, त्याच्या डोक्यात शायरी आणि कविता स्वार झाली होती तर काळीज मात्र अमृता प्रीतमकडेच ओढ घेत होतं. एका अनोख्या कश्मकश मध्ये त्या दोघांचं प्रेम अडकून पडलं होतं. तिच्या विरहाच्या आठवणी साहीरनं शब्दबद्ध केल्या आणि ती अमृतगाणी झाली. "ये दिल तुम बिन कही लगता नही... ' ही साहीरची अमृता प्रीतमसाठीची भगिनी : तनुजा आणि नूतन विराणी होती. अमृता प्रीतम आणि तनुजा यांचा तोंडवळा बऱ्यापैकी सारखा होता. तनुजाचे सिनेमे पाहिले की अमृताच्या आठवणी टोकदार होतात म्हणून साहीरनी तनुजाचे चित्रपट पाहिलेच नाहीत. पण 'इज्जत'साठी गाणी लिहिताना तनुजाचा लीड रोल आहे हे कळताच त्यांनी लिहून दिलेलं हे एक्स्ट्रा सॉन्ग होतं, ज्यासाठी स्क्रिप्टमध्ये खास सिच्यूएशन बनवून गाणं चित्रित केलं गेलं. 'इज्जत' फारसा चालला नाही पण या गाण्यानं कालातीत लोकप्रियता मिळवली... तनुजा खूप जबरदस्त अभिनेत्री होत्या वा खूपच आई, बहिण आणि भावासोबत तनुजा   ग्लॅमरस होत्या असं काही नव्हतं. त्यांनी अफाट हिट्स दिल्या असंही काही नव्हतं. त्यांनी यश अपयश सारखंच पचवलं. तनुजांच्या मातोश्री म्हणजे भारतीय बोलपटाच्या आरंभ काळात काम केलेल्या व पूर्वाश्रमीच्या मराठमोळ्या असलेल्या अभिनेत्री सरोज शिलोत्री या होत. सरोजजींचं विवाहपश्चात नाव शोभना समर्थ असं झालं होतं त्यांच्या नूतन आणि तनुजा या कन्या होत्या. तनुजा आणि नूतन यांच्या कक्षा सर्वच बाबतीत भिन्न होत्या. तनुजांच्या सिनेमांनी छप्परफाड पैसे कमवले होते असाही इतिहास नव्हता. त्यांनी कधी नंबर रेसमध्ये आपलं नाव येऊ दिलं नाही आणि कधीही अफेअर्सही केली नाहीत. त्यांचं स्वतःचं एक वर्तुळ होतं ज्याच्या परिघात त्यांनी कोंडून घेतलं होतं. आपल्या गुण अवगुणांची माहिती आपल्याला असणं खूप महत्वाचं असतं यावर त्यांची श्रद्धा होती. जुन्या पिढीतले यशस्वी निर्माते आणि फिल्मालया स्टूडीओजचे मालक शशधर मुखर्जी यांचे पुत्र शोमु मुखर्जी यांच्याशी १९७३ मध्ये तनुजा विवाहबद्ध झाल्या. काजोल आणि तनिशा या त्यांच्या दोन मुली.शोमु मुखर्जी २००८ मध्ये मरण पावल्यानंतर तनुजांनी सार्वजनिक कार्यक्रमातून निवृत्ती घेतली होती पण  मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्या आग्रहाखातर २०१२ मधल्या 'सन ऑफ सरदार'मधून त्या पडद्यावर आल्या. एके काळी त्यांची मैत्रीण असलेल्या अपर्णा सेन यांची कन्या कोंकणा सेन हिच्या विनंतीवरून 'डेथ इन द गुंज' या बहुभाषिक चित्रपटातही त्यांनी काम केलं. त्या नंतर मात्र त्या कुठं दिसल्या नव्हत्या. आता त्यांचे फोटो पाहून व्यथित व्हायला होतंय... २७ मे २०१९ च्या सोमवारी अजयचे वडील वीरू देवगण यांचं अकस्मात निधन झालं. त्या कुटुंबासाठी हा मोठा पिता वीरू यांच्यासह अजय देवगण  धक्का होता. वीरू देवगण नेहमी अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. काजोलशी त्यांची केमिस्ट्री मुलीसारखी जमली होती. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले. त्यादिवशी काजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून अगदी लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडली होती. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना २८ मे च्या दिवशी संध्याकाळी काजोल लीलावती रूग्णालयाबाहेर दिसली. कारण त्या दिवशी तनुजा यांना तिथं दाखल करण्यात आलं होतं. सासऱ्यांच्या मृत्युच्या घटनेनंतर आईचं आजारपण लगेच उद्भवल्यानंतर हे कुटुंब नक्कीच खचलं असणार ! आता तनुजा धोक्याबाहेर आल्या आहेत तेंव्हा या मायलेकीच्या चेहऱ्यावर नैसर्गिक आनंद फुलणं स्वाभाविकच होतं ! अखेर आई हाच सर्वांचा सर्वात मोठा आधार असतो, याला अपवाद कुणीच नाही... फोटोतलं या दोघींचं निर्मळ मधुर हास्य पाहून असं वाटतं की, आपल्या आईचा फोटो शेअर करताना "ये दिल तुम बिन कही लगता नही हम क्या करे ..." असं तर काजोल म्हणत नसेल ना !- समीर गायकवाडमुली तनिशा आणि काजोलसह तनुजा  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!