टार्गेट माणुसकी........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

लायकी नसते पैसे भरायची, तर लोकं कशाला घेतात क्रेडीट कार्ड कुणास ठाऊक? वसुलीसाठी केलेला फोन ठेवता ठेवता नितेशच्या मनात विचार आला खरा. पण दुसऱ्याच क्षणाला त्याच्या मोबाईलवर मॅसेजची बीप वाजली. नितेशने तो वाचला, आणि त्याच्या दुसऱ्यांची लायकी काढण्याबद्दलच्या विचारांची त्याला स्वतःलाच लाज वाटली. त्याने घेतलेल्या कर्जाची इन्स्टॉलमेंट ओव्हरडयू होत असल्याचा मेसेज होता तो!!त्याला वाटलं, आपली तरी कुठे लायकी होती मग कर्ज काढण्याची? असं नको होतं आपल्या मनात यायला........कुणी कुठल्या गरजेला कार्ड वापरलं असेल आपल्याला काय माहित? क्रेडीट कार्ड प्रत्येकजण मजा मारायलाच वापरतो कशावरून? काय माहीत कोणी कोणत्या इमर्जन्सीलाही ते पुढं सरकवलं असेल?आपणही कर्ज काढलं होतं, ते आईच्या ऑपरेशनसाठी. नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाय मोकळे करावे म्हणून बाहेर गेली, तर कशात पाय अडकून पडली तिचं तिलाही कळलं नाही. गुढघ्याचं केवढं दुखणं लागलं मागे. खर्च पण आवाक्याबाहेचा झाला. वेळेला कर्ज मिळालं पैसा उभा राहिला हेच नशीब म्हणायचं!!आता हप्ते फेडणं थोडं होतंय जड, पण माणूस ठिक झाला त्याहून काय मोठं!!पण हा सगळा विचार आज करतोय आपण!! या वसुलीच्या नोकरीत अडकून किती उद्धटपणे बोलतो आपण लोकांशी?? आपल्याला आपलं टार्गेट दिसतं फक्त, तिकडे समोरच्या व्यक्तीचं कारण कधी दिसतच नाही. आणि दिसलं तरी खरंही वाटत नाही. त्याहून मोठं आपलं टार्गेट असतं आपल्यासाठी!!कारण ते कम्प्लिट केल्यावरच माझंही घर चालणार असतं, माझंही कर्ज फेडलं जाणार असतं ना!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); नितेशच्या मनात हे सगळं चालू असतानाच त्याच्या मोबाईलवर फोन आला, त्याने उचलला तसा समोरचा माणूस म्हणाला, तुमच्याकडे चार दिवसाची मुदत मागितली होती, ती संपली आज. माफ करा नाही बंदोबस्त झाला पैशांचा. पण शपथेवर सांगतो ऐशोआरामासाठी नव्हतं मारलं कार्ड. पोराला त्याच्या प्रॅक्टीससाठी लॅपटॉप घ्यायचा होता. त्यातलंच काय काय शिकतोय ना तो. मला जमणारं नव्हतं, एकदम पैसे भरायला, पण शिकणाऱ्या पोराची अडवणूक कशी करायची? कार्ड पडलेलं होतं कधीचं, म्हटलं मारून टाकू. भरू जमेल तसे पैसे. पण तुम्ही तर महिना होतोय तोच अगदी कुत्र्यासारखे मागे लागलात हो. माझेही पैसे अडकलेत कुठं कुठं ते ही मिळेना झालेत लवकर. त्यातून आम्हाला बोलताही नाही येत तुमच्यासारखं!! कितीही झालं तरी सभ्य भाषाच वापरावी लागते.आम्ही बुडवे नाही हो. जरा वेळ द्या, घरी नका येऊ वसुलीसाठी. पंचाईत होईल आमची.नितेशने सगळं ऐकून घेतलं, आणि म्हणाला, नाही येत मी घरी. पण तुम्ही लवकर बंदोबस्त करा. दिवस वाढत जातील तसे त्यावरचे चार्जेसही वाढत जातील. जी रक्कम वापरली होती, तिच्यापेक्षा खूप जास्त रक्कम भरायला नको लागायला त्याची काळजी घ्या. समोरच्या माणसाने चकित होऊन विचारले, तुम्ही मिस्टर नितेशच आहात ना? नितेश त्यावर हो म्हणाला, तेव्हा तो माणूस बोलला, अहो चार दिवसांपूर्वी तर माझ्याशी किती ओरडून बोलत होतात तुम्ही. घरी येऊन धिंगाणा घालू असंही बोलतात, आतासुद्धा तुम्हाला फोन करायचा म्हटल्यावर घाम फुटलेला मला, तुम्ही ऐकून घ्याल की नाही याचीही गॅरेंटी नव्हती मला!!नितेश म्हणाला, इतके दिवस लोकांकडे टार्गेट म्हणून बघायचो फक्त, आता माणूस म्हणूनही बघायला लागलोय एवढंच हो!!फोनवरच्या माणसाला अनपेक्षित असा सुखद धक्का बसला. त्याने पैसे लवकरात लवकर भरण्याचं आश्वासनही दिलंच पण त्याचबरोबर  नितेशला अगदी मनभरुन आशीर्वादही दिला!!नितेशला टार्गेट पूर्ण केल्यावर जेवढं समाधान मिळालं नाही कधी, तेवढं त्या माणसाच्या मनापासून दिलेल्या आशीर्वादाने मिळालं, एवढं खरं..........©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!