जात्यात भरडलेला खंडेराव

जात्यात भरडलेला खंडेराव

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

खंडेराव खरं सांग...तू ज्या उन्मादात रात्री दारूचे चार घोट नरड्यात ओतून शहरातल्या रस्त्या रस्त्यांवरुन नाचत होतास, बैलासारखा उधळत होतासते नाच गानं खरोखरचं होतं का?खरं सांग खंडेराव...रात्री पॅन्ट गळेपर्यंत पोरा पोरीत नाचताना दूर गावाकडे तुझ्या माळरानातल्या शेताला  तुरीच्या शेंगाच लागल्या नाहीत हि वेदना तुला आतून छळत होती कि नाही?खंडेराव खरं सांग...रात्री एफ सी रोडवर फुगे हवेत सोडताना एखांद्या क्षणी शेतातला बोंड आळ्यानी चिंध्यासारखा जागोजागी पोखरलेला कापूस  तुला मध्येच उडताना दिसला कि नाही? खरं सांग खंडेराव...रात्री व्हिस्कीचा ठसका लागल्यावर दम्याने दिवसरात्र खोकणारा गावाकडचा मोडका बापआणि वेफर्स घशात विरघळताना,वाळक्या भाकरी फोडणारी तुझी तुटकी आईतुला शहरातल्या भर गर्दीत अंधारात दिसली कि नाही?लपवू नकोस आतलं खंडेराव, खरं सांग...तू जे देहभान हरवून नागासारखा रात्री फणा काढून डुलत होतास उधळत होतास, उसना आव आणून मध्येच गर्जत होतास,तेव्हा पस्तीशी गाठूनही दुनियेतला एकही बाप तुझ्या गळ्यात पोरगी बांधेना, हि आतली वेदना अंगावर घेऊनच तू खोट्या उड्या मारल्यास कि नाहीस?खंडेराव...हि वर्षे बिर्षे तुझ्यासाठी कधीच बदलत नसतात इथल्या व्यवस्थेचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी पळविलेली हि नुसती कॅलेंडरवरची पाने असतात.मात्र तू, वरीसभर साठणारी तुझ्या मेंदूतली “समृद्ध दु:खांची अडगळ” अशी वर्षाच्या अखेरीस इथल्या रस्त्या रस्त्यांवरसांडून रिकामा होत जातोस,आणि जुन्यातून पुन्हा नव्यात घुसत राहतोस इतकच...#ज्ञानदेवपोळ  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!