जागृतीच्या वृक्षाखाली

By ramataram on from https://vechitchaalalo.blogspot.com

( कवी: म. म. देशपांडे )मराठी भावकवितेच्या उधाणकाळात मराठी संस्कृती, मराठी वाचक वयात आलेला नव्हता. काहीसा पौगंडावस्थेत होता म्हणू. आजही तो वय वाढून बसलेल्या आणि स्वप्नपाकळ्यांशी खेळत ’शी लव्ज मी, शी लव्ज मी नॉट’ करत बसलेला प्रौढपौगंड दिसतो. आणि कविताही ’आय लव्ह यू, डु यू लव्ह मी’ असे थेट नजरेला नजर भिडवून विचारणार्‍या बेदरकार प्रेमिकापेक्षा, काळजीपूर्वक क्रमवारी लावलेल्या प्रेमगीतांची मिक्स कॅसेट संभाव्य प्रेमपात्राला पाठवणारा किंवा त्याच गाण्यातील शब्दांचा कोट करुन आपली भावना पोचवणारे पत्र- खाली नाव न लिहिता पाठवणारी सलज्ज प्रेमिक अथवा प्रेमिकाच राहिलेली होती.त्यामुळे चित्रपटाच्या उदयकाळात जसे चुंबनाऐवजी दोन फुलांची टक्कर दाखवून संकेताने काम भागवले जाई तसे कवितेतही ’कसा गं गडे झाला, कुणी गं बाई केला राधे तुझा सैल अंबाडा’ म्हणत झाल्या शृंगाराचे पडद्याआडून वर्णन केले जाते. अगदी मॉडर्न होत शायरीच्या माध्यमातून याकडे जाताना ’सांग वा सांगू नको, राधे आम्हाला समजते । सैल व्हाया अंबाडा, काही और व्हावे लागते" असे म्हणतात. थोडक्यात भावकविता अंबाड्याच्या पलीकडे जाऊन बॉबकटपर्यंत उतरायला तयार नव्हती. (अलीकडच्या काही अ-भावकविता मात्र केस पिंजारुन, पुलं म्हणतात तसे ’रुंडमाळा उसन्या आणून, गळ्यात घालून’ थयथया नाचताना दिसतात. पण ते जाऊ द्या.)म.म.ची ही कविता वाचू मला राहून राहून बोरकरांची ’जपान रमलाची रात्र’ आठवत होती. ती कविता जरी अगदी हॉलिवूडी शृंगाराच्या पातळीवर पोहोचली नसली तरी सूचकतेच्या सीमा ओलांडून गेली. तरी ’आणि तरंगत डुलू लागली, नौकेपरी शेज’ किंवा ’स्तनाकार पेले’, ’अभिष्ट चिंतून आम्ही त्यांचे भिडवियले काठ’ म्हणत शृंगारक्रीडेचे सौंदर्यवर्णन करण्यास धजावली.पण वरवर पाहता ही कविता आणि जपान रमलाची रात्र यात काय साम्य आहे असा प्रश्न पडेल. मला त्या जपानी रमलाच्या रात्रीचा उत्तरार्ध म्हणा वा उपसंहार या कवितेमध्ये दिसतो. म्हणून हे सारे अपसव्य.---जागृतीच्या वृक्षाखालीस्वप्न-पाकळ्यांचा सडा :ओठांवर रेंगाळतोस्पर्श ओठांचा तेव्हढाहाले काळजाचे पानयेता झुळूक जराशी;हळुवार कुजबूजआता बसली तळाशी.उन्हे आली वर तरीगात्रांवर स्पर्श-छाया;चांदण्यात न्हाऊनियाकेस वाळवी दुनिया.स्वप्नसडा भवताली :दृष्टी धुंडाळिते वाट;धुके सरता समोरजग उघडे अफाटक्षण ओढी पुढे पणमागे पाठ फिरवेना;सुख सांडले जेथे तीजागा दूर करवेना!-oOo-पुस्तक: अंतरिक्ष फिरलो, पण...कवी: म. म. देशपांडे (संपादक: द. भि. कुलकर्णी, श्याम माधव धोंड)प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशनआवृत्ती पहिली (२००६)पृ. ३१
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!