चिरोटे

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

दिवाळीच्या फराळासाठी तयार केला  जाणारा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजे चिरोटे. खुसखुशीत चिरोटे त्यावर मस्त साजूक तुप आणि वरुन भुरभुरलेली पीठी साखर असा याचा थाट. बिनसाखरेचा चिरोटा देखील चवदार लागतो . खारी प्रमाने चहा बरोबर किवा नुसताच खाऊ शकता. पण खारीपेखा नक्कीच पौष्टिक आहे. गोड न खाणाऱ्यांसाठी किंवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करून करता येतो. कोणी फक्त मैद्याच्या करतात तर कोणी मैदा आणि रवा मिक्स करून करतात अशा चिरोटे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती  आहेत .लाटण्याच्या ही दोन पद्धती आहेत गोल आणि उभी.  मी गोल  चिरोटे  बनवते. पण जरा वेगळी पद्धत आहे. गुलाब पाकळ्यांचा  पाक म्हणजे इथे आपण मेप्रोचा तयार गुलाब सिरप वापरु शकता. यामध्ये केलेले गुलाबी चिरोटे हे माझ स्पेसीफीकेशन आहे .  तर मी ज्या पद्धतीत चिरोटे बनवते त्याची ही आगळीवेगळी कृती.साहित्य:२ वाटी मैदा ( दोन भागात विभागुन घ्यावे.)१ वाटी पिठी साखर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)२ चमचे कडाडीत गरम तूप  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)२ छोटा चमचा मीठ  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)१/२ चमचा बेकिंग पावडर  ( दोन भागात विभागुन घ्यावे.)३ चमचा गुलाब सिरप १/२ वाटी तांदळाची पिठी (साट्यासाठी)३ चमचे पातळ तूप (साट्यासाठी)पीठ भिजवण्यासाठी थोडे दूधतळण्यासाठी तूप.कृती:१)  विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा फक्त एक भाग येथे घावा. मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर एका भांड्यात घ्यावा. या मधले तूप आधीच कडक तापवावे मग वापरावे,  जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून सर्व साहीत्य घट्ट भिजवावे. २) विभागलेल्या दोन भागापैकी प्रत्येक साहीत्याचा दुसरा भाग येथे घावा.मैदा, पिठी साखर, गरम तूप, मीठ, बेकिंग पावडर , गुलाब सिरप हे सर्व एका भांड्यात घ्यावा.  वरील कृती प्रमानेच दूध घालून घट्ट भीजवावे. दोन्ही तयार पीठाचे गोळे ( १ व २) थोडा वेळ वेगवेगळे झाकून ठेवावे.३) भिजवलेला दोन्ही पीठान्चे वेगवेगळे मध्यम असे पोळी करताना जसे गोळे करतो त्या आकाराचे गोळे करून घ्यावे.   त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. यामध्ये  साधारण ३  पोळ्या सफेद पीठाच्या आणि ३  पोळ्या गुलाब सिरप घातलेल्या गुलाबी पीठाच्या होतील. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.३) एक सफेद पीठाची लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची मध्यमसर घट्ट पेस्ट लावावी. त्यावर एक  गुलाबी पीठाची पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. ४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या २-२ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे. गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायला ही आकर्षक दिसतात. ७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउनतळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.८) मस्त सफेद गुलाबी रंगाचे चिरोटे तयार होतील. फार आकर्षक दिसतात आणि चवीलाही खुसखुशीत लागतात.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!