चाय पे चर्चा

चाय पे चर्चा

By prafulla-s on from prafulla-s.blogspot.com

थांबा ! थांबा !! ...नाही...नाही मी काही कुठल्या राजकीय विषयावर नाही बोलत आहे . ही "ती" वाली  "चाय पे चर्चा " नाहीये , अहो मी तर आपल्या चहा बद्दल बोलतोय . तुमच्या , आमच्या कपातल्या चहा बद्दल . काय म्हणता चहाचं नाव काढल आणि तुम्हाला ही चहा पिण्याची तलफ झाली ? मला ही तसचं वाटल  म्हणून आधीच सोबत चहाचा कप  घेवून बसलोय ..म्हणजे  तुमच्याशी बोलताना सोबत एक-एक घोट चहा असला ना कस मस्त वाटत . आssssssहा काय चहा आहे ....व्वा ....मस्त.चहा बद्दल वेगळ काय सांगायचं ...आपल्या सगळ्यांची सकाळ ज्या गोष्टीविना अधुरी आहे तो म्हणजे चहा . एका हातात सकाळचा वर्तमान पेपर दुसर्या हातात चहाच्या कपाचा कान  ,पेपर ची एक हेडलाईन आणि त्यासोबत चहाचा एक-एक घोट सकाळची आणि दिवसाची छानशी सुंदरशी सुरुवात करून द्यायला पुरेसा आहे .जसं आपण आपल्या दररोज च्या आयुष्यात चहाला स्थान दिलय त्याप्रमाणे चहाने  ही आपल्याला सांभाळून घेतलं आहे ....काय म्हणता ? कस ? अहो बघा ना , बेड-टी च्या नावाखाली आपण न तोंड धुता चहा प्यायची सवय लावली खरी पण चहा नि कधी तुमच्या समोर नाक मुरडलयं का? ...न तोंड धुता का मला पितोस असं कधी विचारलयं का?  नाही ना ?  सकाळचा नाश्त्याला दुसरं काही नाही मिळाल तरी अगदी चहा-चपाती ने ही काम होत आपलं, अगदी कंटाळा आला तरी तो घालवण्यासाठी चहा लागतोच...शाळेच्या दिवसात परीक्षेच्या आदल्या रात्री अभ्यास करताना आईने बनवून दिलेला चहा असो किंवा कॉलेज कट्ट्या वर मित्रांसोबत ची  कटिंग चाय ....थंडी ची लाट किंवा पावसाच्या सरी आल्या की ओघाने चहा आणि भजी चा बेत आलाच ...ऑफिस मध्ये तर चहा नि आम्हाला खूप सांभाळलय , किंबहुना ,ऑफिस ला जाण्याच्या कारणा मध्ये चहा ही एक आहेच ... आमच्या ऑफिस चा चहा जरा वेगळाच असतो...उकळलेलं रंगीत पाणी ;फक्त कैंटीन वाला ते कपात देतो म्हणून त्याला चहा म्हनाव लागतं इतकचं . असो ...पण हाच चहा दुपारच्या जेवना नंतर येनारया सुस्तीला पळवुन लावण्यासाठी पुरेसा होतो.तसं ही आपल्याकडे आजकल चहा फक्त पिण्या पुरता विषय राहिला नाहिये..तुम्हीच बघा ...कुठल्या ही कामाला "चहापाणाला" पैसे द्यावेच लागतात...संसदेच असो किंवा विधानसभेच अधिवेशन...विरोधाकांचा "चहा पाणावर बहिष्कार" ही बातमी वाचल्याशिवाय अधिवेशन सुरु झालयं ते कळतचं नाही. कुणाला सांगू नका पण लोक म्ह्नातायेत की ह्यवेळच्या निवडनुका चहानेच जिंकुन दिल्यात..ते काय म्हणतात ना 'चाय पे चर्चा' करुण. अहो राजकारणच कशाला "गरम चाय की प्याली" असो किंवा "मम्मी ने चाय पे बुलाया है" ह्या गाण्यातून समजतं की चहा नि बोलिवूड़ वर ही मोहिनी घातली आहे ते ..."चाय पे बुलाया" वरुण आठवलं ; डेटिंगच्या वेळी "कॉफ़ी प्यायला जावुया" अस म्हणून जरी सुरुवात होत असली तरी मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात मुलगी जोपर्यन्त चहाचा कप घेवुन येत नाही तोपर्यंत पुढची चर्चा होतचं नाही...तसचं आपल्याकडे एखादे वेळी पाहुण्याला जेवण नाही विचारल तरी चालेल पण चहा विचारलाचं पाहिजे असा अलिखित नियम आहे म्हनुनच की काय चहां आपला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित झालाय.काहीजन म्हणतात चहा शरीराला चांगला नाही बुवा..असेल ही . पण आमच बुवा चहाशिवाय पान ही हालत नाही...अगदी कधीही चहा प्यायला सांगितल तरी आम्ही तय्यार... अगदी झोपेतून उठवलं तरी चालेल. काय म्हणता तुमचं ही असचं आहे का माझ्यासारखं ? तर मग ह्याच गोष्टी साठी होवून जावुद्या आणखी एक कप चहा?-प्रफ़ुल्ल शेंड्गे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!