घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या!

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कोरोनाला आपण पूर्णपणे हरवू शकतो-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)   दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची जगभर आणि भारतातही संख्या वाढत आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. जर एखाद्या रुग्णाचं घरी विलगिकरण केलं तर त्यानं आपल्या कुटुंबातील इतर सादस्यांचीहीखबरदारी घेणं गरजेचं आहे. कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आपल्या घरातील सदस्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास घाबरून न जाता, काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास कोरोनाला आपण पूर्णपणे हरवू शकतो, ही गाठ मनाशी बांधा. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींनी आरोग्य सेतू अँप आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करावं. ज्या रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह अली असेल त्याला घरी ठेवण्यासाठी वातावरण योग्य आहे की नाही हे डॉक्टरांची टीम घरी येऊन तपासते. विलगीकरणासाठी घरात स्वतंत्र खोली आणि बाथरूम आहे का हेसुद्धा तपासण्यात येते. विलगीकरणासाठी घरात योग्य सुविधा उपलब्ध नसल्यास मेडिकल टीमला त्याची कल्पना द्यावी. अशा रूग्णांची जवळच्याच कोव्हीड सेंटरमध्ये राहण्याची सोय करण्यात येते. जे आपल्या घरात गरोदर महिला किंवा ५५ वर्षांपासून जास्त वयाची व्यक्ती आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्यरोगाचे रुग्ण असल्यास त्यांची दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात यावी. रुग्णाची खोली कशी असावी कोरोना रुग्णाच्याखोलीचं वेळोवेळी निर्जंतुकीकरणकरावी.कोरोनाबाधित रुग्णाची खोलीची स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीने पूर्ण कपडे, ग्लोव्हज आणि मास्क घालायला हवे.कोरोना बाधित रुग्णाच्या खोलीतील कचऱ्यावर सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करून योग्य विल्हेवाट लावणे गरजेची आहे. कुटुंबीयांनी घाबरू नये, काळजी घ्यावीआपल्या कुटुंबातीलएखाद्या सदस्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास अशा रुग्णाची काळजी घेण्यासाठीकुटुंबातील एक सदस्याने पुढे यावे. यावेळी त्या व्यक्तीने मास्क, ग्लोव्हज, आणि पुर्ण कपडे घालणे गरजेचे आहे.कोरोना बाधितला ज्या खोलीत विलगिकरणात ठेवले आहे त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या, डायनिंग टेबल, कपड्यांचं कपाट या गोष्टींचं वारंवार निर्जंतुकीकरणकरणे गरजेचं आहे.विलकरणाचा कालावधी संपेपर्यंत कुटुंबीयांनी घराबाहेर पडू नये.  
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!