घराघरातून प्रबोधन व्हायला हवे...

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

घराघरातून प्रबोधन व्हावयास हवे...-दादासाहेब येंधे (dyendhe@rediffmail.com)आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.आपल्या समाजातील परंपरागत धारणांमुळे पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेचा परिपोष तर होतोच पण त्यातून स्त्रीबद्दल पुरुषांच्या ठायी असूया निर्माण झाली आहे ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. मी पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी आदराऐवजी असूयेने भरलेली व स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे हमखास दाखविता येईल अशा बलात्कारात व स्त्रीवरील हिंसाचारात होते.यावरील उपायांची सुरुवात स्त्रीने स्वत:पासूनच करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान का तुकवते? मुलांना घडविण्याचे काम स्त्रियांच्या हातात असते. तिने ठरवले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते. मात्र त्यासाठी स्वत:च्या मनातून ही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता  पुसून टाकावयाला हवी.स्त्री-पुरुष भेद नाहीसा करण्यासाठी शिक्षणातून प्रथम शिक्षकांचे व पालकांचे मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन घडवून आणावे लागेल. शाळेत मुला-मुलींच्या वेगवेगळ्या याद्या करणे, मुलींना विशेष सवलती देणे याचाही विपरीत परिणाम होऊ  शकतो. ‘पुरुषी वर्चस्व’या शब्दांतूनच स्त्रियांची दुर्बलता चित्रित होते. घराघरांतून कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचेच नाव असणे हे गृहीत धरलेले आहे. त्याऐवजी पुरुषाचे नाव त्याच्या पत्नीसमवेत संयुक्तपणे घेतले गेले, घरावर पति-पत्नी दोघांचे नाव लावले गेले, तरी पुष्कळ फरक पडू शकेल. दोन स्त्रियांमधील संघर्ष मिटवायचा असेल, तर आधी पुरुषाच्या वर्चस्वाखाली दबलेल्या स्त्रीला मुक्त करणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक विवाहाची सरकारी नोंदणी करून नवविवाहितांसाठी सरकारने लैंगिक शिक्षण सक्तीचे करावे; हे शिक्षण देण्यासाठी चांगल्या डॉक्टरांची नेमणूक करावी; जेणेकरून नवा जन्म हा मुलाचा असो वा मुलीचा; तो केवळ आनंद असेल. शिक्षणातून जबाबदार, सुज्ञ आणि मानसिकरीत्या सुदृढ समाज निर्माण झाल्यास पुरुषी वर्चस्वाची आणि बलात्कारी प्रवृत्ती दूर होऊ  शकेल. 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!