कौतुकाची रांगोळी.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

सखी एवढा सगळा रांगोळीचा जामानिमा घेऊन बाहेर गेली तशीच झटकन आत आली, ते पाहून शांभवीने विचारले, अगं काय झालं? रांगोळी काढायला गेली होतीस ना? परत का आलीस?आई, अगं त्या बाजूवाल्या ताईने बघ ना किती सुंदर रांगोळी काढलीये, तिच्यापुढे माझी कशी दिसेल? मला कुठे येते इतकी सुंदर रांगोळी काढता?बाजूवाल्या घरासमोरची मोठी आकर्षक रांगोळी बघून होसेने रांगोळी काढायला गेलेली, बारा वर्षाची सखी फार हिसमूसुन परत आत आली होती.शांभवी तिला समजावत म्हणाली, सखी त्या ताईला सुद्धा एकदम काही नाही जमलं अगं!! तिचीही सुरुवात तुझ्यासारखीच धडपडत झाली असणार ना!! सराव करून करूनच जमलं असेल ना तिलाही. तू सराव केला नाहीस, जमेल तशी काढली नाहीस, तर तुला कधी जमणारच नाही......असं तर प्रत्येक गोष्ट करताना तिथे तुझ्याहून चांगले निष्णात पुढे असणारच, म्हणून काय तू स्वतःची पाऊले सारखी मागे घेणार का?तू काढ तुला येते तशी, तुझं मन ओतून सुंदर काढण्याचा प्रयत्न कर.......पण कोण बघणार आई, त्या रांगोळीपूढे माझी रांगोळी? कुणाssची नजर जाणार त्यावर?, सखी एवढसं तोंड करून म्हणाली.अगं अशी प्रत्येक गोष्ट जर कुणी बघण्यासाठी आपण करायला लागलो तर जगण्यातला आनंद कुणी बघण्याची वाट पाहण्यातच निघून जाईल ना आपला!! सारखं कशाला कुणी आपलं काही बघायला हवं? न का बघेना?तुला तर भारी वाटेल ना स्वतःची निर्मिती बघून? तुला आनंद मिळेल ना दारापुढे रांगोळी काढण्याचा? त्यात तुझे आवडते रंग भरून त्याला मोहक करायचा? बास तर मग!!आणि कुणी नाही बघितलं तर मी बघणारच की ग!! बघून तुझं तोंडभरून कौतुकही करणार!!तुझा बाबाही आपल्या लाडक्या लेकीच्या रांगोळीची नक्की दखल घेणार. तू न सांगताही एक छानसा फोटो काढणारच बघ तो!!शिवाय तुझे आजी आजोबा येतील तेही आल्याआल्या दारात रांगोळी बघूनच ओळखतील आणि विचारतील बघ, सखीने काढली ना रांगोळी? त्यातल्या एकेका वळणाचं आणि अन् एकन् एक रंगाचं कौतुक करतील किती वेळ करत बसतील......हे एवढं पुरेसं नाही का तुझ्यासाठी?? कशाला आणखी कोणी पाहिलं पाहिजे? न का पाहेना!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सखीला आईच सांगणं मनापासून पटलं. तिने पुन्हा रांगोळीचं सामान बाहेर नेलं आणि आपल्याला हवी तशी सुंदर रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न करू लागली. तास होऊन गेला तरी ही कशी घरात येईना म्हणून शांभवी दारात बघायला गेली, तर सखी तल्लीन होऊन आपल्या रांगोळीत रंग भरत होती.तिच्या एकाग्रतेत खंड न पाडता शांभवी नुसतं डोकावूनच आली तशीच आत निघून गेली.वयाच्या मनाने खूपच सुंदर रांगोळी काढलीये माझ्या पोरीने, मनात आलंच शांभवीच्या. सगळी रांगोळी पूर्ण होईपर्यंत आणखी अर्धा तास लागला सखीला. ती पूर्ण झाली तशी तिने आपल्या आईला हाक मारली.बघ आई कशी दिसते? ठिक वाटतेय ना?शांभवी म्हणाली, अगं ठिक काय? झक्कास आहे एकदम!! तरी सखीने बाजूच्या घरासमोरच्या आणि आपल्या रांगोळीकडे पाहिलच. मनात पुन्हा तुलना झाली. शांभवीच्या नजरेतून ते सुटलं नाही, आणि ती म्हणाली, सखी, कुठली स्पर्धा नाही इथे. आपला आनंद आपला, सारखं त्याला तोलून त्याच मोल घालवू नये.सखी दातात जीभ चावून तिला सॉरी म्हणाली. आई, मला आवडली माझी रांगोळी. तू जोर दिला नसतास तर मी काढलीच नसती. पण आता मला खूप छान वाटतय.शांभवीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मग दोघींनी दिव्यांची छान आरास केली रांगोळीच्या भोवताली. त्याने ती रांगोळी आणखीनच झळाळून उठली. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); बघू कशी काढली माझ्या लेकीने रांगोळी, असं म्हणत एवढा वेळ टिव्हीत बघण्यात गुंगलेला तिचा बाबा मुद्दाम ती बघायला गेला आणि अचंबित होऊन म्हणाला, अरे वा सखी!! खरंच तू काढली ही रांगोळी?अजिबात वाटत नाहीये!! फारच सुंदर असं म्हणत त्याने मोबाईल आणून जवळून लांबून, अगदी सगळ्या अँगलने बरेच फोटो काढले तिचे. शांभवी सखीला म्हणाली, बोलले नव्हते का मी? आजपर्यंत माझ्या एकाही रांगोळीचा फोटो नाही काढला कधी तुझ्या बाबांनी!! पोरगी काढायला लागल्यावर न चुकता दरवर्षी फोटो काढतात. बघ कसे आहेत ते.सखीला खूप आवडलं आईचं लटक्या रागातलं बोलणं, तिने पटकन जाऊन तिची पप्पी घेतली.अन् मनात म्हणाली, कित्ती गोड आहेत माझे आई बाबा!! संध्याकाळी आजी आजोबा तर घरात यायच्या अगोदर दारातली रांगोळीच निरखत बसले. आजीने तिथूनच विचारलं, कोणी काढली ग, सखीने का?शांभवी लगेच म्हणाली, अगदी बरोब्बर ओळखलंत तुम्ही. गेली दोन वर्ष मला कुठे काढून देते तुमची नात?हो हो, मागच्या वर्षीचीदेखील आठवतेय ना मला. पण आत्ताची फारच रेखीव आहे हो!! एवढी मोठी झाली का सखी? सुरेख फार फार सुरेख रेखाटली आहे अगदी!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सखी, रंगाची निवड अगदी परफेक्ट केलीस बघ. आजूबाजूला अगदी शोभेसे निवडलेस, कोणी कोणाला मारत नाहीये. सगळे रंग बरोबरीने खुलून आलेत!!, आजोबा आत आले तरी रांगोळीची तारीफ काही संपतच नव्हती त्याची. सखी, तुला काय आणखी साहित्य पाहिजे का? रंग पाहिजेत का? मला सांग मी सगळं आणून देतो. खूप सारे रंग आणतोच उद्या बाजारात जाऊन, किती प्रसन्न वाटलं मनाला, तुझी रांगोळी पाहून!!अहो आजोबा, तुम्हाला वाटतेय तेवढी पण सुंदर नाही हो!! किती कौतुक करताय माझं!! ती बाजूची बघा तशी काढायची आहे मला!!आमचं नाही लक्ष गेलं बाई दुसरीकडे, नातीच्या रांगोळीने मन मोहवून टाकलं आमचं,असं म्हणत आजीने सखीला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळलं.तसं सखीच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिला वाटलं, आई म्हणत होती ते बरोबर होतं. आपल्याला वाटेल ते फारसा विचार न करता करावं. आपली हौस भागवावी. खरंच की, इतर न का कोणी पाहेना माझ्या जवळच्या माणसांनी पाहिलं, आणि किती कौतुकाने न्हाऊ घातलं मला त्यांनी!! मन केवढ्या आनंदाने भरून आलंय आता माझं, नसती काढली रांगोळी तर ह्या साऱ्या क्षणांना मुकले असते मी.सखी लगबगीने उठली आणि दारात जाऊन पुन्हा एकदा आपल्या रांगोळीकडे तिने निरखून बघितलं.आता मात्र तिला ती बाजूच्या रांगोळीइतकीच सुंदर भासली. तिच्या आई-बाबांच्या, आजी-आजोबांच्या कौतुकाने तिच्या नजरेत आत्मविश्वास जो भरला होता.अन् तोच विश्वास तिला बजावून सांगत होता, सखी उद्याची रांगोळी याहून सुंदर असली पाहिजे हं!! तुझ्या अंगात कला आहे, प्रयत्न करून नक्की वाढवता येईल तिला. तुझ्या घरच्यांना फार कौतुक आहे तुझं, कोणी न का पाहीना, पण त्यांना सतत पाहायचं तुझ्या प्रत्येक गोष्टीला. अन् तेच खरं आहे, अगदी मनातून आहे......©️ स्नेहल अखिला अन्वित(फोटोतली रांगोळी माझ्या बहिणीने मधुरा महाजन- सहस्त्रबुद्धे हिने काढलेली आहे.)कथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!