कैरीची कढी / कैरीचे सार ( Kairichi Kadhi / Kairiche Sar)

कैरीची कढी / कैरीचे सार ( Kairichi Kadhi / Kairiche Sar)

By Purva on from marathifoodfunda.blogspot.com

महाराष्ट्रात कैरीची कढी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. हि आहे खास कोकणातील रेसिपी. कैरीचा आंबटपणा आणि नारळाच्या दुधाचे माधुर्य याच्या सुरेख मिश्रणाने या कढीला एक सुंदर अशी चव मिळते.Read this recipe In English, please click here.साहित्य:कैरी, उकडून- १ माध्यम (कैरीचा गर साधारण १/२ कप होईल. कैरी आंबट असेल तर इतकाच पुरे आंबट नसेल तर जास्त घ्यावा. )हिरवी मिरची- १ ते २जीरे- १ टीस्पूनलसूण- १ ते २ पाकळ्याआले- अर्धा इंचतेल किंवा साजूक तूप- २ टेबलस्पूनहिंग- १/२  टीस्पूनहळद- १/२ टीस्पून (ऐच्छिक)कढीपत्ता- १ डहाळी / ७-८ पानेराई- १ टीस्पूनमेथी दाणे- १/४  टीस्पून  (ऐच्छिक)लाल सुक्या मिरच्या, तुकडे करून- २ (मी ब्याडगी मिरची वापरते)गुळ किंवा साखर- १ टीस्पूनमीठ- चवीप्रमाणेकोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पूनकृती:कैरी उकडून साल आणि बाटा/कोय काढून तिचा गर बाहेर काढा. मिक्सरला फिरवून एकजीव करून घ्या. मिरच्या, आलं, लसूण आणि जीरे शक्यतो पाणी न वापरता किंवा जरासं पाणी घेऊन वाटून घ्या. कढईत तेल/तूप गरम करून राई टाका, राई तडतडली की त्यात मेथीदाणे, कढीपत्ता, लाल मिरच्यांचे तुकडे, हळद आणि हिंग घालून जरासं परता. नंतर त्यात वाटण घालून परता. जरा तेल सुटू लागलं कि त्यात कैरीचा गर टाकून थोडासा परतून घ्या.  त्यात साधारण १ कप पाणी व गुळ  घाला व मिश्रणाला उकळी येऊ द्या. उकळी आली कि त्यात नारळाचे दूध घालून सतत हलवत रहा. गरज असल्यास पाणी घाला. मीठ घाला. फार उकळू नका नाहीतर नारळाचे दूध फाटते. बाजूनी थोडे बुडबुडे दिसले की गॅस बंद करा.  वरून कोथिंबीर टाका. मसालेभात, वालाच्या खिचडी सोबत उत्तम लागते. नाहीतर वाफाळलेला भात त्यावर साजूक तूप आणि वरून गरमागरम कैरीची कढी व या सोबत पापड..... नुसती कल्पना करू नका बनवून पहा.     
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!