कसा राहू मी घरात?

By vtavate on from vivektavate.blogspot.com

                                                  कसा राहू मी घरात? मित्रानो,कसा मी घरात राहू? अशी घरात बसण्याची सवय नाही.काय करु बैचेन झालो आहे. एक बरं आहे घरातील सगळीच माणसं घरात आहेत.नाहीतर वेड लागलं असतं.पहिले दोन दिवस बरं वाटलं.पण आता वेळ जात नाही. यापुढे २१  दिवस घरात काढावे लागणार या कल्पनेने काही सुचत नाही.दिवस रात्र घरातच.रात्रीही बाहेर पडण्याची संघी नाही.व्हॉटसॅप,फेसबुक   इनस्ट्रावर फिरत   असतो,वाचन केले, संगीत  ऐकले,मोबाईलवर सिनेमे पाहिले.मित्रमैत्रींशी    संवाद साधला,नातेवाईकांशी गप्पा मारल्या. जेवणाचा आस्वाद घेतो, व मस्त धोरत पडतो.पण दिवसभर त्याच  त्याच   बातम्या  ऐकून  कंटाळा आला आहे. नाक्यावरील मित्रांना  भेटता येत नाही.  काहीच काम  नसल्याने घरात मन रमत नाही. आम्हाला निरव शांतता माहित नसल्याने शांतता खायला उठली आहे.    संचारबंदी असल्याने घरातून बाहेर  पडण्याची परवानगी नसल्याने काय करु? बाहेर पडण्याची बरीच कारण सांगून झाली पण डाळ शिजली नाही.कैद झाली असं वाटतं.बातम्या ऐकून व व्हॉटसॅपचे संदेश वाचून आणखी बंधनं वाढली आहेत.मुंबईकराला घरात बसणं कधी जमयलं का? पायाला चाकं लावून घड्याळाच्या काट्यांवर पळणारा मुंबईकर कधी एका जागेवर थांबू शकला नाही.थांबणं त्याच्या  रक्तातच नाही. त्याच्या जीवनात त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरलेल्या असतात.पण त्या शेडुलमध्ये विश्रांतीला वेळ नसतोच.वेळापत्रकच वेगळे असते.पण ही सक्तीची सुट्टी त्याला आता शिक्षा वाटू लागली आहे.तसं पाहिलं तर तो सुट्टी प्रिय आहे.पण घरातली सक्तीची सुट्टी त्याला  अप्रिय आहे.मुंबईकर सामाजिक कार्यांना कमी वेळ देत असले तरी सण-उत्सव साजरे  करण्यात पुढे असतो. पण असा त्रागा करुन जमणार नाही.घरातून बाहेर पडलो तर आपल्यासह इतरांना देखील धोका निर्माण होईल.काहीही झाले तरी घरातच राहणे समाजहिताचे आहे.पावसाळा असो, अपघात असो,दंगल असो,बंद असो  सगळ्यांना  मदत  करण्यास पुढे असतो.कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यास कोणाचीही वाट न पाहता सर्वांच्या मदतीला धावत असतो. देशावर  आलेल्या संकटाशी लढ्ण्यासाठी एकच  गनिमी कावा आहे तो म्हणजे स्वत:ला घरात बंदीस्त करणे. याच हत्याराचा   वापर मी करणार आहे.  आणि इतरांना घरातच राहण्याची विंनती करुन देशाला वाचवणार.गर्व आहे आम्हास आम्ही मुंबईकर आहोत त्याचा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!