करोना व्हायरस काही फॅक्ट्स

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

करोना व्हायरस काही फॅक्ट्स एकूण बाधित व्यक्तीपैकी १८ वर्षाखालील मुलांना करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण फक्त २.४ टक्के इतके कमी आहे. १२ वर्षाखालील मुलांचे प्रमाण ०.६५ टक्के आहे. करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांत १८ वर्षाखालील वयोगटाचे प्रमाण एकुणात केवळ ०.२ टक्के आहे.संसर्ग होणाऱ्यात ३० ते ६० वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे, ६७ टक्के !मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीत ८० पेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांची टक्केवारी तब्बल २२ टक्के इतकी आहे. करोनाचा विषाणू हवेतून पसरत नाही. करोनाबाधित व्यक्तीच्या स्त्रावातून तो पसरतो. शिंक, खोकला, शेंबूड व डोळ्यातून वाहणारे स्त्राव त्यात सामील आहेत.बाधित व्यक्तीच्या व त्याच्या स्रावाच्या संपर्कात आल्याशिवाय संसर्ग होत नाही. अकारण कुठेही जळी स्थळी काष्टी पाषाणी मास्क घालून फिरणे अवाजवी आहे, कुठल्या व्यक्तीस करोना झाला असेल हे आपल्याला ज्ञात नसल्याने आपण मास्क परिधान केला असं जरी गृहित धरलं तरी ते ही अस्थानी ठरते.ज्यांना सर्दी, खोकला, ताप याची साधी बाधा झाली आहे त्यांनी मात्र मास्कचा वापर करावा तोही यासाठी की त्यांच्यामुळे इतरांना ही तो त्रास होऊ नये व त्यांना बाधित व्यक्तीपासूनचे संभाव्य संक्रमण होऊ नये.करोना विषाणूचा इन्क्युबेशन कालावधी १ ते १४ दिवसांचा आहे. हे विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती तास जगू शकतात याबाबत जी माहिती प्रसारित होते आहे ती अधिकाधिक संभ्रमित करणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबपेजवरील माहितीनुसार covid १९ हा करोना विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती तास जिवंत राहू शकतो याची कोणतीही कालनिश्चिती नाही. मात्र संक्रमित व्यक्तीच्या स्पर्शाने ते पृष्ठभाग बाधित राहू शकतात त्यामुळे असे पृष्ठभाग मग ते धातू असोत की अधातू असोत त्यांचे निर्जंतुकीकरण करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. संक्रमित पृष्ठभागांना हाताचा स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यावी. अशा कुठल्याही पृष्ठभागास हात लागला तर त्याच हाताने डोळ्याला, तोंडाला वा नाकाला स्पर्श करू नये, संसर्ग होण्याचे हे सर्वाधिक प्रभावी कारण आहे. वेगवेगळे मास्क परिधान करणाऱ्या आणि अकारण प्रतिजैविकांचे (अँटिबायोटिक्स) सेवन करणाऱ्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास त्याला अधिक हानी पोहोचते. करोना विषाणू गटातील सार्स आणि मेर्स यांचे संक्रमण प्राण्यांतून मानवात शक्य होते, covid विषाणूंचे या बाबतीत सध्यातरी प्राण्यातून मानवात संक्रमण झाल्याचे उदाहरण नाही. मात्र काही केसेसमध्ये मानवातून पाळीव प्राण्यात संक्रमण झाल्याचे समोर आलेय. covid विषाणूची बाधा असलेल्या भागातून आपल्याला कुठले पार्सल आलेलं असेल तर त्यातून बाधा होण्याचे प्रमाण अत्यल्प असेल कारण त्या पार्सल पॅकेजवरील विषाणू तापमान व अन्य पर्यावरणीय बदल सहन करून तितके दिवस जिवंत राहिला तरी त्याची मारक क्षमता कमजोर होते. covid विषाणूवर नेमके आणि थेट परिणामकारक औषध अद्यापसंशोधित झालेले नाही, या संबंधीच्या चाचण्या सुरु असून अशा कुठल्याही औषधाला हा लेख लिहीपर्यंत तरी who ने मान्यता दिलेली नाही. ज्यांना करोनाची बाधा होते त्यांना आधीच फुफ्फुसांचे विकार, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग इत्यादी आजार असतील त्यांना अधिक क्षती पोहोचते. ज्यांना यापैकीचे आजार नाहीत त्यांचे बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे त्यामुळेच करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण फक्त ३ टक्के आहे. करोना व्हायरस हा एक मोठा विषाणू गट असून त्याचे अस्तित्व जुने आहे. आता चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेला काहीसा संसर्गजन्य असलेला आजार covid १९ या नावाने नोंद झाला आहे. याची बाधा झालेल्या ६ रुग्णापैकी किमान एका रुग्णास गंभीर आरोग्यस्थितीस सामोरे जावे लागते आणि तीव्र लक्षणे त्याच्यात दिसून येतात. अन्य रुग्णात नाक वाहणे, घशात खवखव होणे, ताप येणे, सर्दीपडसे होणे, कणकण येणे आदी लक्षणे दिसतात. मात्र यापैकी एकही लक्षण न दिसलेलेही काही बाधित आढळून आले आहेत मात्र त्यांचे एकुणात प्रमाण नगण्य आहे. निर्जंतुक सत्व असलेल्या वा अल्कोहोल बेस्ड असलेल्या कोणत्याही साबणाने हात धुतले तरी पुरेसे आहे, सॅनिटायझरचा वापर करण्याची अनिवार्यता व निकड बिलकुल नाही. संभाव्य लक्षणे दिसत असलेल्या व्यक्तीपासून तीन फूट (१ मीटर) अंतरावर उभं राहून संभाषण करावे, त्याच्याशी हस्तांदोलन टाळावे.अकारण डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करू नये. आपण ज्या परिसरात वावरतो तिथे श्वास घेणे अडचणीचे वाटू लागले तर तिथे थांबू नये, तसेच आपल्यात अशी लक्षणे जाणवली तर नजीकच्या इस्पितळात दाखवून केवळ गरजेच्या असलेल्या तपासण्या करून घ्याव्यात. अपप्रचार करू नका, त्याला बळी पडू नका आणि योग्य ती दक्षता घ्या. - समीर गायकवाड माहितीस्रोत - WHO  (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) चे वेबपेज आणि हेल्थ रिव्ह्यू जर्नल      
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!