एयरटेल कंपनीचा १९९ रूपयांचा नवीन प्लॅन; दररोज एक जीबी डाटा, अमर्याद कॉल्स..

एयरटेल कंपनीचा १९९ रूपयांचा नवीन प्लॅन; दररोज एक जीबी डाटा, अमर्याद कॉल्स..

By atharv on from feedproxy.google.com

एयरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दररोज एक जीबी डाटा आणि अमर्याद कॉल्सची सुविधा प्रदान करणारा प्लॅन अवघ्या १९९ रूपये महिन्यात सादर केला आहे.सेल्युलर कंपन्यांची स्पर्धा आता अत्यंत तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर एयरटेल कंपनीने १९९ रूपये मूल्याचा प्लॅन जाहीर केला आहे. याची वैधता २८ दिवसांची असेल. या दरम्यान, युजरला दररोज एक जीबी डाटा देण्यात येणार आहे. तो हा डाटा फोर-जी/थ्री-जी/टु-जी नेटवर्कवर वापरू शकतो. याच्या जोडीला संंबंधीत युजर लोकल आणि एसटीडी या दोन्ही प्रकारातील अमर्याद कॉल्सदेखील करू शकतो. तथापि, यात ‘अमर्याद कॉल्स’चा उल्लेख असला तरी दररोज ३०० मिनिटे तर आठवड्याला १२०० मिनिटे इतकी मर्यादा यात घालण्यात आल्याचे वृत्त ‘टेलकॉम टॉक’ या पोर्टलने दिले आहे. यासोबत एयरटेल कंपनीने आपल्या नवीन ग्राहकांसाठी १७८ रूपयांचा प्लॅन सादर केला आहे. यातही २८ दिवसांसाठी अमर्याद कॉल्सची सुविधा देण्यात आली आहे. याच्या जोडीला दररोज एक जीबी डाटा देण्यात येणार आहे. मात्र नवीन ग्राहकांना पहिल्या दोन रिचार्जसाठीच हा प्लॅन वापरता येणार आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!