आता केवळ उच्चारणातून मराठी टायपिंग..

आता केवळ उच्चारणातून मराठी टायपिंग..

By atharv on from feedproxy.google.com

तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग डोळे दिपविणारा आहे. आज वापरात असलेले तंत्रज्ञान काही महिन्यांत कालबाह्य होते. पूर्वी हा वेग ऐवढा गतीमान नव्हता. म्हणूनच ‘कॅसेटस्’, ‘व्हीसीआर-व्हीसीपी’, ‘टेप-रेकॉर्डर’, ‘वॉकमॅन’, ‘फ्लॉपी’, ‘सीडी’ इत्यादी वस्तू बऱ्याच काळापर्यंत वापरात राहिल्या. घरात खणखणाऱ्या फोनने तर कमालीची कात टाकली. ‘फोन’, ‘कॅमेरा’, ‘रेकॉर्डर’, ‘अलार्म क्लॉक’, नानाविध अॅप्लिकेशन्स आणि सोयींनीयुक्त असा हा स्मार्टफोन केवळ फोन न राहता एक अत्यावश्यक मदतनीस झाला.स्मार्टफोन दिवसागणिक अधिकच स्मार्ट होताना दिसतो आहे. आपल्या गरजेनुसार वापरकर्ते उपलब्ध विविध अॅप्लिकेशन्समधून आवश्यक असलेली अॅप्लिकेशन्स फोनमध्ये इन्स्टॉल करतात. अगदी किचनपासून ते ऑफिसमधील कामात उपयोगी पडतील, अशी नानाविध अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. स्मार्टफोन निर्जीव असला तरी ‘फिंगर स्कॅन’, ‘आय स्कॅनर’, ‘स्पीच-टू-टेक्स्ट’सारख्या सुविधांनी आपल्या वापरकर्त्याला एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे ओळखतो.याचाच एक भाग म्हणजे स्मार्टफोनवर एखादा मजकूर टाईप करण्यासाठी आपण सध्यातरी मोठ्या प्रमाणावर ‘की-बोर्ड’चा वापर करतो. यासाठी विविध ‘की-बोर्ड’ अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. परंतु ‘स्पीच-टू-टेक्स्ट’ तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनवर टाईप करणे लवकरच कालबाह्य होईल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ‘स्पीच-टू-टेक्स्ट’ तंत्रज्ञानामुळे ज्यांना टायपिंग करण्यात अडचण आहे, अशांनादेखील याचा फायदा होणार आहे.फोन तोंडासमोर धरून टाईप करायचा मजकूर बोलताच तो आपोआप टाईप होतो. ही सुविधा उपलब्ध असलेले ‘लिपिकार’ नावाचे अॅप/की-बोर्ड अॅण्ड्रोइड फोनधारकांसाठी ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. हे अॅप/की-बोर्ड विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठी भाषेसाठी प्ले स्टोअरवर ‘Lipikar Marathi Keyboard’ असे सर्च करा. त्यानंतर हे अॅप/की-बोर्ड अपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल करताना दिलेल्या सूचनांचे पालन करा. सूचनांचे पालन करून अॅप/की-बोर्ड इन्स्टॉल झाल्यावर ‘नोटपॅड’, ‘व्हॉटस्अॅप’, ‘फेसबूक’ इत्यादी ठिकाणी जिथे-जिथे तुम्हाला मराठी टाईप करायचे आहे. तिथे या अॅप/की-बोर्डचा वापर करून केवळ मजकुराचे उच्चारण करून तुम्ही टाईप करू शकता. ही सुविधा सुरू करण्यासाठी लिपिकार मराठी की-बोर्डवरील मराठी पर्याय निवडून माईकच्या आयकॉनवर बोटाने टच करायचे आहे. त्याचबरोबर या सुविधेचा वापर करताना मोबाईलमध्ये इंटरनेट चालू ठेवणे गरजेचे आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!