आठवणींतली नाणी

आठवणींतली नाणी

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

" अरे ईशा , अथर्व , चला लवकर उठा. आज आजी आजोबा येतील ना? उठा लवकर आणि आटपा पटपट.खूप कामे आहेत आज "बेडरूम मध्ये गादीवर इथेतिथे अस्ताव्यस्त पडलेल्या चादरीच्या घडया घालत बाजूलाच झोपलेल्या आपल्या दोन्ही मुलांना तेजश्री हाक मारत होती. ईशा आजी-आजोबांचे नाव ऐकताच उत्साहाने उठून बसली. अजूनही आळस देत लोळत पडलेल्या छोट्या अथर्वला उठण्यासाठी प्रवृत्त करत होती. इतक्यात पुन्हा आईचा आवाज कानावर आला ,"अगं तो उठेल तेव्हा उठेल. मी उरकवुन घेईल त्याचे चट्कन .तू आधी जा बरे बाथरूममध्ये. ब्रश कर. अंघोळीचे पाणी काढून ठेवले आहे मी. लगेच अंघोळ करून तू तरी तयार हो."आई-बाबा येणार हे समजल्यापासून तेजश्रीची हि अशी गडबड सुरु होती.आज बऱ्याच वर्षांतून दोघे तिच्या घरी येणार होते. दोन्ही मुले छान तयारी करून आपल्या आजीआजोबांची वाट पाहत बाहेर ओसरीवर बसले  होते. तेजश्रीने दारासमोर रेखलेली सुंदर रांगोळी कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकत होती. घर अगदी टापटीप. दोघे प्रवासातून येतील तेव्हा गरमागरम कांदेपोहे किचनमध्ये तयार होतेच त्यासोबतच तिने दुपारच्या जेवणाची देखील तयारी सुरु केली होती.सुमारे ११ च्या सुमारास मुलांचा अचानक सुरु झालेला कल्ला कानी आला आणि आपल्या आईबाबांना आवडणारे सर्व पदार्थ बनवण्यात मग्न असलेली तेजश्री लगबगीने हात धुवून बाहेर आली. सकाळी उत्साहात केलेली स्वतःची तयारी आता घरकामातल्या गडबडीत पार विस्कटून गेली होती. चेहरा घामाच्या धारांनी काळवंडून गेला असला तरी एक वेगळेच तेज होते त्या चेहऱ्यावर... आनंदाचे तेज... इतक्या वर्षांनी आईबाबांना पाहिल्याचा आनंद. तिने धावत येऊन दोघांच्या पाया पडल्या अन गळ्यातच पडली आईच्या. आणि त्या क्षणापासून इकडच्या तिकडच्या गप्पांनी घर अगदी गजबजून गेले.दुपारची जेवणे झाली आणि सर्व आवरुन तेजश्रीदेखील बाहेर सर्वांसोबत ओसरीवर येऊन बसली. बाबा जावयाच्या तोंडून त्याच्या नव्या व्यवसायाचे कौतुक ऐकण्यात गुंग होते. दोन्ही मुले आजीआजोबांनी आणलेल्या नव्या खेळण्यांसोबत तल्लीन झाले होते. तेजश्री आणि आईसुद्धा या सर्वांत सामील झाल्या. आई-बाबा रिटायरमेंट नंतर सोडाव्या लागलेल्या जुन्या घराबद्दल , तेथील आठवणी , नव्या छोट्याशा घरात सुरु झालेल्या नव्या संसाराबद्दल सांगत होते . मग जशा गप्पा रंगत गेल्या तसे काहीतरी आठवून बाबा तिला म्हणाले," अगं तेजू ,गेल्या महिन्यात जुने घर खाली केले तेव्हा खूप  पसारा निघाला. त्यात  तुझी एक वस्तू मिळाली बघ आम्हाला. आणि आता येताना घेऊन आलो आम्ही.म्हटले असेल काही तुला आवडणारं. प्रभा , त्या माझ्या निळ्या बॅगेतच ठेवली होती ना तू ती? जरा आणतेस का ?"आई तयारच होती. लगेच उठून आत गेली . मी आणखी काही विचारणार त्या आधीच ती घाईघाईत परत आली.तिच्या हातात एक पितळेची छोटीशी पेटी होती. पाहताच लगेच मी तिला ओळखले नाही परंतु ती अगदीच अनोळखीही वाटली नाही. ती पेटी जशी हातात घेतली तिची ओळख पटल्याची चिन्हे तिच्या त्या कुतूहल चेहऱ्यावर अचूक उमटली. पेटीवरच्या नाजूक कलाकुसरीवरून हात फिरवताना तिच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळलं. तोपर्यंत ईशा आणि अथर्वची उत्सुकता पार शिगेला पोहोचली होती." आई , कित्ती सुंदर पेटी आहे ना ही? कुणाची आहे बरे ? आणि काय असेल त्यात ? तू उघड ना लवकर. मला पाहायचे आहे काय आहे ते ?म्हणत दोघेजण तेजश्रीच्या हातातल्या पेटीवर अगदी तुटून पडले. ते पाहून तेजश्रीनेही हळूच त्या पेटीची ती इवलीशी पितळी कडी उघडायला सुरुवात केली. कित्ती आकर्षक पेटी होती ती . तिची बिजागिरी बाजूसुद्धा अतिशय रेखीव. फुलापानांची सुंदर नाजूक नक्षी त्या पितळ-पिवळ्या पृष्ठभागावर अगदी उठून दिसत होती. ३०-४० वर्षांपूर्वीची ती पेटी... जरा काळवंडलेली असली तरी होती फार सुंदर.तेजश्री ते सोनेरी दार उघडत असताना सर्वजण या अविर्भावात त्या पेटीकडे पाहत होते जणू आता पुढच्या क्षणाला कुबेर खजिनाच डोळ्यांसमोर प्रकट होणार आहे. पुढच्याच क्षणाला पेटीवरचे झाकण दूर झाले आणि एक आठवणींचा खजिना डोळ्यांसमोर आला. तसे पाहिले तर अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टी होत्या त्यात त्यामुळे इशा आणि अथर्वचा हिरमोड झाला खरा पण तेजश्रीच्या डोळ्यांत केव्हापासून तरळलेले पाणी मात्र आता आवेगाने गालांवरून ओघळू लागले. असे का होत आहे हे समजण्यापलीकडे दोघांचीही वये असली तरी दोघे शांतपणे त्यातील एकेक वस्तू पाहू लागले. त्या प्रत्येक वस्तूपाशी तेजश्रीच्या मनात कितीतरी आठवणी होत्या आणि मुलांच्या डोळ्यांत कितीतरी प्रश्ने उभी होती." आई... ,बाबा... , ही पेटी कशी हो सापडली तुम्हाला ? तुम्हाला आठवतंय का ही पेटी मला आजीने भेट दिली होती बक्षीस म्हणून. आणि तेव्हापासून मी खूप जपायचे तिला. हे बघ लहानपणी आपल्या इथे दारावर तुटलेल्या केसांच्या बदल्यात मिठाई देणारा यायचा ना त्याला देण्यासाठी मी तेव्हा ठेवलेले केस अजून आहेत. या तेव्हा मला मिळालेला नक्षीदार आरसा ... या छोट्याशा अंगठ्या ... हा मला मी पहिली आले म्हणून बक्षीस मिळालेला पहिला पेन ... हे मोरपीस , सर्वजण अशी मोरपिसे वहीत जपून ठेवत आणि मी या पेटीत.आई , हा बघ माझा आणि सईचा बालपणीचा फोटो... जत्रेत काढलेला. आपली छोटी सई तर नेहमी मला पिडायची ही पेटी दे म्हणून. आणि मीही म्हणूनच तिच्यापासून लपवून ठेवायची. " " हो का ? म्हणूनच ही माझ्या अगदी जुन्या अडगळीच्या पेटाऱ्यात सापडली आम्हाला. इतक्या वर्षांत आम्हीपण तो पेटारा कधी उघडला नव्हता. तुझे आणि सईचे लग्न झाले आणि त्यांनंतर तर आम्ही हे सर्व मागच्या खोलीतच ठेवून दिले होते म्हणून इतक्या वर्षांत तर दिसले देखील नाही."भरभरून बोलणाऱ्या तेजश्रीला मध्येच थांबवून ईशाची आजी लगेच काहीतरी गवसल्यागत बोलत होती.तेजश्री अचानक मिळालेल्या या जुन्या आठवणींच्या पुंजक्यामुळे भलतीच भारावून गेली होती. आता तर बालगोपाळांनाही कळले कि नक्की काय घडले ते . "आई , हे गं काय आहे या कापडात? "त्या पेटीतील एक सुंदर रेशमी कापडाचा बटवा दाखवत ईशा पण आता आईला प्रश्न विचारू लागली . " हे ? हीच तर खरी गंमत आहे ईशा. माझी सर्वात लाडकी वस्तू . मला लहानपणी नाणी गोळा करण्याचे भारी वेड होते ."बटव्याचे दोन्ही टोके एकमेकांपासून विलग करत तेजश्री मोठ्या कौतुकाने सांगत होती . त्या बटव्यात खूप जुनी नाणी होती, काही त्या काळातली तर काही त्याच्याही पूर्वीची . एक पैसा ,दोन पैसे , ५ पैसे .... इतक्या वर्षांनी ही  नाणी पाहताना तेजश्रीला भरून येत होते तर कधीही अशी नाणी न पाहिलेल्या चिमुरड्यांना या नाण्यांचे कुतूहल वाटत होते. पण तरी न राहवून छोटया अथर्वने एक नवा प्रश्न विचारला ," आई, पण ही नाणी चॉकलेट घेण्यासाठी बाजारात चालतील का ?" " हो आई, अथर्व म्हणतो ते बरोबरच ना ? जुने झाले कि सर्वच शून्य होते कि नाही ? आता तर अगदी आत्ता आत्ताच बंद झालेल्या ५००-१००० च्या नोटा पण नाही चालत मग याना पाहून तुला का एवढा आनंद होतो आहे ?"दोघांच्याही या बालप्रश्नांवर सर्वानाच हसू फुटले . ते हसू आवरतच  तेजश्री ती नाणी हातात घेऊन काहीशी स्वतःशीच पुटपूट्त होती ," आजच्या बाजारात नक्कीच याना काही किंमत नसेल बाळांनो . पण माझ्या मनात ते अनमोल आहेत, माझ्यासाठी हिराही आज यांच्यापुढे न्यून वाटतोय मला. हा आठवणींचा ठेवा आज असा गवसला ... अगदी स्वर्ग हाती लागल्यासारखे वाटतेय . यात माझ्या अन सईच्या कितीतरी बालआठवणी आहेत . आज सई असायला हवी होती हे सर्व पाहायला . तिलाही खूप आणि असाच आनंद झाला असता . त्यावेळी किती आकांडतांडव मी मांडले होते , जेव्हा हि पेटी हरवली होती . आज सईला ती दयायला मला जराही संकोच झाला नसता, अगदी आनंदाने मी तिला हि दिली असती आणि मला खात्री आहे तिलाही खूप आंनद झाला असता. पण एका नको त्या अपघाताने असे सोनेरी क्षणच जीवनात येण्यापूर्वीच हिरावले आणि ते सुखही नकळत विरले. असो , आज या पेटीने अगदीच जुन्या आठवणींना उजाळा दिला .आणि त्या आठवणींत दडलेला आनंद. ती आठवणींतली नाणी आज माझ्यासाठी सोन्याहुनही प्रिय होती. म्हणूनच पण कि काय लोक म्हणतात " जुने ते सोने ". - रुपाली ठोंबरे.  /*********************************************** * Disable Text Selection script- © Dynamic Drive DHTML code library (www.dynamicdrive.com) * This notice MUST stay intact for legal use * Visit Dynamic Drive at http://www.dynamicdrive.com/ for full source code ***********************************************/ function disableSelection(target){ if (typeof target.onselectstart!="undefined") //IE route target.onselectstart=function(){return false} else if (typeof target.style.MozUserSelect!="undefined") //Firefox route target.style.MozUserSelect="none" else //All other route (ie: Opera) target.onmousedown=function(){return false} target.style.cursor = "default" } //Sample usages //disableSelection(document.body) //Disable text selection on entire body //disableSelection(document.getElementById("mydiv")) //Disable text selection on element with id="mydiv" disableSelection(document.body) //disable text selection on entire body of page
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!