आज ३ एप्रिल ...तो दुर्दैवी दिवस ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आज ३ एप्रिल ...तो दुर्दैवी दिवस ...कातड्याचे जोडे करून आपल्या पायी दयावेत इतकीही आमची लायकी नाही, नतमस्तक होऊन आपली पायधूळ माथ्याला लावावी इतकाही आमचा माथा उजळ नाही आपल्या ओजस्वी ध्येय विचारांवर अखंड चालावे इतकेही बळ आमच्या पायी नाहीआपल्या पराक्रमी परमप्रातापी धाडसाचा वारसा सांगावा अशी एखादीही  गोष्ट आमच्यापाशी नाहीआपल्या गुणांचे आकलन व्हावे इतकीही बुद्धी नाही अन ध्येयासक्तीची ती अमीट ओढही नाही आपणास आम्ही फक्त मिरवण्यापुरतं डोक्यावर घेतलं पण डोक्यात पुरते घेऊ शकलो नाही,आपलं नाव वापरून आम्ही दुकानंही उघडलीत आणि द्वेषविखार पसरवण्याचं साधनही निर्मिलंय !      मनगटं पिचलेले, लाचारीत लोळणारे काही अजूनही म्हणत असतात की राजे तुम्ही परत या ! कशाला परत या ? सर्व राजांनीच करायचे असेल तर तुम्ही कशाला जन्माला आला आहात असा जाब आता आपणच विचारला पाहिजे !  राजे एक मागणं आहे, तेव्हढाच आशीर्वाद दिलात तरी जन्माचे सार्थक होईल - राजे किमान आपल्या विचारांवर चालण्याची स्फूर्ती-प्रेरणा अखंड प्रदीप्त राहण्याइतकं बळ अंगी यावं आणि मनाचा निग्रह तितका कठोर व्हावा ...तव चरणीची धूळ होण्या मज जन्म पत्थराचा मिळाला तर मी रायगडी पायथ्याशी आजन्म समावेन  कर्तृत्व तव गाण्या लेखणी माझी झिजावी. आशिष असता तुमचा, तव शौर्याची मर्दानी कवने रचेन ! - समीर गायकवाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!