आईची ठेव.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

आपल्या दादाला असं अचानक आलेलं पाहून, सुमेधाला प्रश्नच पडला. तसा दोन तासांचाच प्रवास होता. पण एवढं अर्जंट काय काम असावं, सहज भेटायला आला असता, तर वहिनीही असती त्याच्याबरोबर. संध्याकाळी परत जायचंही म्हणतो आहे. नक्कीच काहीतरी कारण असणार, असा विचार करत सुमेधाने जेवणाच्या तयारीला सुरुवात केली. दादा जेवायला, म्हणून अगदी मनापासून छान स्वैंपाक बनवला तिने. तसंही त्याला तिच्या हातचं जेवण आवडायचही खूप.नेहमीप्रमाणे अगदी पोटभर आवडीने जेवला तो.जेवणखाण होऊन निवांत झाल्यावर त्याने सुमेधाला बोलावलं, आणि तिच्या हातात एक डबा ठेवला. तिला वाटलं, दिलं असेल वहिनीने काहीतरी बनवून. म्हणून तिने तो उत्सुकतेने पटकन उघडला. पण त्यात असलेलं बघून ती चाटच पडली आणि म्हणाली, अरे यात तर हे आईचे दागिने आहेत. तिचा दादा म्हणाला, हो तुझ्याचसाठी आहेत ते. आईने मला सांगून ठेवलेलं माझा हार आणि पाटल्या सुमेधाला दे म्हणून, दादा हसून म्हणाला; तशी सुमेधा आश्चर्याने म्हणाली, पण मला तर असं आई कधीच बोलली नव्हती.तुला नसेल बोलली, पण मला आजारपणात दोन- तीनदा बोलली होती ती. तिचा जीव होता तुझ्यावर खूप, तुझ्यासाठी आईची ठेव आहे ती, दादा आश्वासक नजरेने म्हणाला.पण तरीही सुमेधाला कसंतरीच वाटत होतं, एकतर असं काही घडेल, याची तिने अपेक्षाही केली नव्हती.शिवाय तिच्या दादावहिनीने आईचं केलंही बरचं होतं. आणि तिची स्वतःची परिस्थितीही चांगली होती. स्वतःचं मोठं घर होतं, नवरा मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. मुलाचं शिक्षणही पूर्ण व्हायला आलं होतं. त्यामुळे तिला स्वतःहून कशात मन घालायची गरजही वाटली नव्हती.ती दादाला म्हणाली, तू ठेवले असतेस तरी चाललं असतं रे मला. नाहीतरी मला माहीतच नव्हतं. आता तुझ्या घरी सून येणार. तिला दिले असतेस. बाकी तसं फारसं काही नव्हतंच आपल्या आईवडिलांकडे. घरही तुझं तूच घेतलंस. शिवाय दोघांना अगदी शेवंटपर्यंत चांगलं संभाळलस. यावर हक्क तुझाच आहे. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});  सगळं खरं सुमेधा, पण मला काय कमी आहे ते; तुला दिलेलं मी काढून घेऊ? आईने तुझ्या वहिनीला मंगळसूत्र दिलंय तिचं, तोच मोठा मान समजते ती. आपल्या आईला, हार तिच्या आईने दिला होता, म्हणून तो तुला द्यावा असं वाटलं असेल तिला.त्याबरोबर पाटल्या तिच्याकडून द्याव्या वाटल्या असतील. तुझ्या लग्नाच्या वेळी आपली परिस्थिती कुठे तेवढी चांगली होती, आई पाटल्या मोडणार होती, तर तूच हट्टाने मोडू दिल्या नाहीस तिला. जे होतं त्यात भागवलस. तेव्हा ठरवलं असेल तिने, नंतर तुलाच द्याव्या म्हणून.माझ्या मुलीलाही दोन बांगड्या दिल्यात. चार दागिने होते, ते तिच्या जवळच्या माणसात वाटून टाकले तिने, एवढंच.हो पण आताच्या घडीला काय किंमत आहे याची, हिशोब आहे का काही? तुला आणि वहिनीला जराही लोभ नाही वाटला? मी तर बातम्यांत बरेचदा वाचलंय, दागिन्यांसाठी, पैशांंसाठी रक्ताची नाती सुद्धा एकमेकांचा खून पडायला मागे पुढे बघत नाहीत.आणि तू तर अगदी सहज मला हे आणून दिलंस?, सुमेधाचं बोलतानाही मन भरून आलं होतं.अगं आणून केव्हाच द्यायचं होतं, पण या बाहेरच्या परिस्थितीमुळे वेळ लागला. आता कुठे बरं वाटतय मला. आम्हा दोघांनाही चैन पडत नव्हती. तुझी गोष्ट तुला मिळाली, आईची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान आता मिळेल आम्हाला, तिचा दादा मनापासून म्हणाला.पण दादा मला नकोय हे, मला जीवावर येतंय घ्यायला. तू तिचं खूप केलंस तुलाच ठेव हे, सुमेधा अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.तिला समजावत दादा म्हणाला, असं का म्हणतेस? तू तिला प्रेम नाही का दिलस? चांगली होती तेव्हा यायची ना रहायला तुझ्याकडे किती!! सगळ्या हौशी पुरवायचीस की तिच्या!! मग वाटलं तिला आपल्या मुलीला आपल्याकडून काही मिळावं, तर त्यात तुला जीवावर येण्यासारखं काय झालं? तिची ठेव नाकारणार का तू? तिच्या इच्छेचं काहीच नाही का तुला.........?? (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); सुमेधाचे डोळे भरून आले, तिला आपल्या दादा आणि वहिनीच्या मनाच्या मोठेपणाचा खूप अभिमान वाटला. अगदी काही दिवसांपूर्वीच तिला एका मैत्रिणीने फोन केला होता आणि भावाने वडिलोपार्जित जमिनीतला तिचा वाटा हडपल्याबद्दल, त्याला दूषणं देत होती. आपल्याच भावाकडून फसवलं गेल्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. आणि इथे तर सुमेधाच्या स्वतःच्या भावाने मात्र तिला माहीत नसताना देखील आईची इच्छा म्हणून स्वतःहून एवढे किमती दागिने तिला आणून दिले होते. तिला तर विश्वासच बसत नव्हता.सुमेधाच्या मनात आदर तर होताच, दादा- वहिनीबद्दल. पण आता आपणही त्यांच्या मनाची उंची गाठण्याजोगं व्हायला हवं, असं ध्येय तिने मनात योजलं.निघणाऱ्या भावाच्या पाया पडण्यासाठी ती वाकली तेव्हा म्हणाली, दादा तुम्हा दोघांसारखं निर्मोही मन माझंही व्हावं, डोक्यावर हात ठेवून तेवढा एक आशिर्वाद तू देच मला आज.........थोडासा संदर्भ बदललाय, पण कथा खरी आहे!!©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज- हल्ला गुल्ला  नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!