अधिकातलं वाण दयावं कोणाला.........??

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

काय ग रजनी, या वर्षी अधिक मासाचं वाण कसं देणार आहेत तुझ्या माहेरचे? जावयाचा मान असतो तो, रजनीच्या सासूबाईंना गहन प्रश्न पडला होता.रजनी म्हणाली, तसा आईने केलेला फोन मला, पण मी म्हटलं, तुझ्या जावयाकडे सगळं काही आहे. तुला द्यायचेच असतील तर भरभरून आशीर्वाद दे ........कुणाला विचारून बोललीस तू? रितीभाती काही आहेत की नाही तुम्हाला? लग्नात पण तेच केलंत, आमच्या म्हणण्याप्रमाणे काही झालंच नाही. पहिल्या दिवाळीला मुलाला दिलेली चेन काय जाडसर पण नव्हती. माझी साडीही हलक्यातलीच होती आणि ह्यांना काय तर शर्टपीस दिला नुसता, सासूबाई नेहमीप्रमाणेच तोंड वाकडं करून बोलल्या.तशी रजनी म्हणाली, माझे आईवडील पेन्शनर, झेपेल तसं करणार ना?कमी काय आहे आपल्याला उगीच कशाला मन घालताय?कमी म्हणून नाही, रितभात म्हणून बघतो आम्ही त्याकडे........सासूबाईंनी झटक्यात उत्तर दिलं.मग रितभात कोणी ज्याला जमेल तशी करेल ना, केलं त्याचं महत्व. असं केलं तसं केलं म्हणून नावं कशाला ठेवायची?लग्नात पण तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं, झेपण्यासारखं नव्हतं; तरी केलं. पण तुमचं बिनसलच. पन्नास गोष्टी मनासारख्या केल्या, अन् एक गोष्ट राहिली की तेवढंच धरून बसणारी माणसं तुम्ही. तुम्हाला तरी माहिती आहे का, तुमचं समाधान नक्की कशाने होईल ते?, रजनीनेही आता पडतं घ्यायचं नाही असंच ठरवलं.आम्हाला काय वेडं लागली आहेत का, उगाच नावं ठेवायला, आवडलं असत तर कौतुकही केलं असतं, तिच्या सासूबाईही बोलायला ऐकणाऱ्या होत्या थोड्याच!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); कौतुकाची अपेक्षाच नाहीच तुमच्याकडून, ते टोमणे बंद केलेत तरी पुरे झालं. किती वेळा तेच तेच ऐकवता मला, कधीच्या गोष्टी लक्षात राहतात तुमच्या. आम्ही विसरतो तसं तुम्हीही विसरा की!! माझे आईवडील किंवा मी कधी नावं ठेवलेली आठवतायत का, तुम्ही दिलेल्या कोणत्याही गोष्टीला. आम्ही त्या ठेवतो ना हसतमुखाने, रजनी हे म्हणाली तसं सासूबाई तोऱ्यात म्हणाल्या, आम्ही देतोच हो तसं!! कुणी नाव काय ठेवेल?असं का? आता तुम्ही एवढं बोलताय म्हणून सांगते हा, लग्नात तुम्ही आईला दिलेल्या साडीचा पहिल्याच धुण्यात रंग उतरला बरं का? ती काही बोलली नव्हतीच मला तरीही. मलाच कपाटात  दिसली, तेव्हा कळलं. आणि मला पहिल्या दिवाळसणाला साडी दिलीत ना, ती मी पाहिलेली तुम्हाला आहेरात आलेली. एका शब्दाने बोलले का मी तुम्हाला आजपर्यंत?  तुम्ही मात्र सगळं चांगलं असूनही खुसपटं काढून बोलत बसता.तुम्ही ही अशी नाव ठेवता ना प्रत्येक गोष्टीला म्हणूनच मी यावेळी स्वतःहूनच सांगितलं आईला, तू काही दिलंस, कितीही प्रेमाने दिलंस, तरी त्यात खोट काढली जाणारच. ती काढली की मला खूप वाईट वाटणार. त्यापेक्षा ज्यांना तू काही दिलंस की आनंद वाटेल अशांना खुशाल हवं तेवढं वाण दे तू अधिक मासाचं. आणि फक्त अधिक मासाचं नाही, इथून पुढे कुठल्याही सणांना आमच्या घरातल्या कुणाचाही मान-पान करावा वाटला जरी तुला; तरी एखाद्या सेवाभावी संस्थेला ती रक्कम दान करून टाक. वाटलं तर आमच्या सासूबाईंच्या नावाने दे, ती पावती पाठव हवी तर. पण इकडे हौसेने, चांगल्या मनाने काहीही पाठवू नको. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); वा!! काय तर म्हणे दान करणार, पटलं का तुझ्या आईला?, सासूबाईच्या रागाकडे दुर्लक्ष करत रजनी म्हणली, लगेच नाही पटलं. मी समजावलं खूप. उगीच करायचं म्हणून कशाला कुठेही दान करायचं ना!! ते सत्पात्री असणंही तितकंच गरजेचं आहे. आता अधिकाचं वाण देताना माझ्या घरचे मुलीला आणि जावयाला लक्ष्मी- नारायण मानून वाण देणार. आणि त्याच लक्ष्मी-नारायणाच्या घरी त्या वाणाचे धिंडवडे काढले जाणार. एवढंच दिलं, हातातून सुटलं नाही वाटतं, हे द्यायला हवं होतं, ते द्यायला हवं होतं, काय अन् काय!!रितीत कितीही हे द्या ते द्या असलं, तरी देणारा यथाशक्ती देणार, हे ही कळायला हवं ना समोरच्याला!! त्यापेक्षा जिथे दानाची खरी गरज आहे, ज्यांना किंमत आहे, तिथेच जावं ते दान. अधिकाचं वाण दिलं म्हणजेच जावयाचा मान राखला असं काही नाही. या देण्याघेण्याचा तर आता तिटकारा आलाय मला. यापुढे माझ्या माहेर आणि सासर मध्ये पैशात तोलल्या जाणाऱ्या कुठल्याही वस्तूंची देवघेव होणार नाही, हे मी आता नक्की केलंय. तुम्ही काय समजायचय ते समजा.........पण तरी मला आवडतात म्हणून आई अनारसे घेऊन येणार आहे, नावं न ठेवता खायचे असतील, तर तुम्हीही खाऊ शकता. अच्छा, अनारश्यावर वाण भागवलं जाणार म्हणजे आता!!, सासूबाईंंना न बोलता राहवलं नाहीच.असंच समजा, सासूबाई......वाण त्यांनाच मिळणार, जे त्यासाठी पात्र असणार. तुमच्यासारख्यांना मिळणार सत्पात्री दानाची नुसती पावती..........तिच योग्य आहे तुमच्यासाठी!!एवढं बोलून रजनी सरळ आत निघून गेली, आणि तिच्या सासूबाईं आपली निवड चुकली, सून फारच फटकळ मिळाली, असा विचार करून चुकचुकत बसल्या.©️ स्नेहल अखिला अन्वितफोटो साभार: गुगलकथा आवडल्यास माझं फेसबुक पेज "हल्ला गुल्ला" नक्की लाईक आणि फॉलो करा. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!